The Kerala Story | ‘द केरळ स्टोरी’च्या कलाकारांना किती मिळाली फी? जाणून घ्या चित्रपटाचा बजेट

| Updated on: May 05, 2023 | 9:56 AM

निष्पाप हिंदू मुलींना फसवून त्यांचं ब्रेनवॉश करून कसं धर्मपरिवर्तन केलं जातं, याची झलक चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पहायला मिळाली. हिजाब घालणाऱ्या मुलींवर कधीच बलात्कार किंवा गैरवर्तन होत नाही, असं त्यांना सांगितलं जातं.

The Kerala Story | द केरळ स्टोरीच्या कलाकारांना किती मिळाली फी? जाणून घ्या चित्रपटाचा बजेट
The Kerala Story
Image Credit source: Twitter
Follow us on

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्याच अडकलेला ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट अखेर आज प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाकडे अनेकांचं लक्ष लागून राहिलं होतं. ‘द केरळ स्टोरी’चा ट्रेलर पाहिल्यानंतर काहींमध्ये चित्रपटाच्या कथेविषयी उत्सुकता निर्माण झाली. तर काहींनी निर्माते-दिग्दर्शकांवर केरळची प्रतिमा मलिन केल्याचा आरोप केला. मात्र नेमकं सत्य काय आहे आणि केरळमध्ये 30 हजारहून अधिक मुली कशा गायब झाल्या, हे अनेकांना जाणून घ्यायचं आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये म्हणून कोर्टात याचिकासुद्धा दाखल करण्यात आली होती. मात्र ही याचिका न्यायालयाने फेटाळली. या चित्रपटाचा एकूण बजेट किती आहे आणि त्यातील कलाकारांना किती मानधन मिळाली याची माहिती आता समोर आली आहे.

चित्रपटाचं बजेट

‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाचा बजेट जवळपास 50 कोटी रुपयांपेक्षाही कमी असल्याचं कळतंय. या चित्रपटावर 40 ते 45 कोटी रुपयांपर्यंतचा खर्च करण्यात आला आहे. यामध्ये कलाकारांच्या मानधनाचाही समावेश आहे. ‘द केरळ स्टोरी’ची मुख्य अभिनेत्री अदा शर्माला सर्वाधिक मानधन मिळालं आहे. या चित्रपटातील भूमिकेसाठी तिला एक कोटी रुपये मिळाले आहेत.

कलाकारांचं मानधन

अदा शर्माशिवाय चित्रपटात इतर तीन अभिनेत्रींच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. मिळालेल्या माहितीनुसार सोनिया बलानी, सिद्धी इडनानी आणि योगिता बिहानी या तिघींना समान मानधन दिलं गेलंय. या तिन्ही अभिनेत्रींना 30 लाख रुपये फी मिळाली आहे. तर विजय कृष्णाला 25 लाख रुपये आणि प्रणय चौधरीला 20 लाख रुपये देण्यात आले आहेत.

हे सुद्धा वाचा

या चित्रपटात केरळमधल्या त्या मुलींची कथा दाखवण्यात आली आहे ज्यांना खरंतर नर्स व्हायचं होतं, पण त्या झाल्या ISIS च्या दहशतवादी. या हजारो मुलींचं धर्मपरिवर्तन करण्यात आलं होतं. केरळमधल्या हिंदू आणि ख्रिश्चन मुलींना लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकवून त्यांना मुस्लीम बनवण्यात आलं होतं. हा चित्रपट हिंदीसोबतच तमिळ, तेलुगू आणि मल्याळम भाषांमध्येही प्रदर्शित झाला आहे.

निष्पाप हिंदू मुलींना फसवून त्यांचं ब्रेनवॉश करून कसं धर्मपरिवर्तन केलं जातं, याची झलक चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पहायला मिळाली. हिजाब घालणाऱ्या मुलींवर कधीच बलात्कार किंवा गैरवर्तन होत नाही, असं त्यांना सांगितलं जातं. इस्लाम धर्म स्वीकारल्यानंतर त्या मुलींना ISIS दहशतवाद्यांच्या मधे आणून उभं केलं जातं. त्यानंतर या मुलींनी कधी कल्पनाही केली नसेल असा प्रवास सुरू होतो. ही कथा केरळमधल्या अशा 32 हजार महिलांची आहे, ज्या केरळमधून अचानक गायब झाल्या होत्या.