The Kerala Story फेम अभिनेत्री कास्टिंग काऊचच्या जाळ्यात; अनुभव सांगत म्हणाली, ‘कोणीही जबरदस्तीने काहीही करायला…’

'कोणीही जबरदस्तीने काहीही करायला...', The Kerala Story फेम अभिनेत्रीने कास्टिंग काऊचबद्दल सांगितला धक्कादायक अनुभव... सध्या सर्वत्र अभिनेत्रीची चर्चा...

The Kerala Story फेम अभिनेत्री कास्टिंग काऊचच्या जाळ्यात; अनुभव सांगत म्हणाली, कोणीही जबरदस्तीने काहीही करायला...
The Kerala Story
| Updated on: Jun 11, 2023 | 4:39 PM

मुंबई | अभिनेत्री अदा शर्मा स्टारर ‘द केरळ स्टोरी’ (The Kerala Story) सिनेमाने फक्त भारतातच नाही तर, परदेशात देखील अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. बॉक्स ऑफिसवर सिनेमाने २५० कोटी रुपयांचा गल्ला ओलांडला आहे. सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर मात्र मोठा नफा झाला. ‘द केरळ स्टोरी’ सिनेमानंतर सिनेमात झळकलेल्या अभिनेत्रींच्या लोकप्रियतेत देखील मोठी वाढ झाली. पण ‘द केरळ स्टोरी’ सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रींपैकी एका अभिनेत्रीने कास्टिंग काऊचबद्दल आलेला धक्कादायक अनुभव सांगितला आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीने आलेल्या अनुभवाची चर्चा रंगत आहे.

अभिनेत्री योगिता बिहाणीने कास्टिंग काऊचबद्दल आलेला धक्कादायक अनुभव सांगितला आहे. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली, ‘मी जेव्हा इंडस्ट्रीमध्ये आले, तेव्हा अनेक गोष्टी मला कळत देखील नव्हत्या. कास्टिंग काऊच सारखं काही असतं याबद्दल देखील मला माहिती नव्हतं. मी अत्यंत साठी आणि सरळ होती.. जेव्हा मला प्रोजेक्टसाठी फोन यायचे तेव्हा मी माझ्या माझ्या इंडस्ट्रीतील मित्रांनी विचारायची..’

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘ऑडिशनसाठी फोन आल्यानंतर मी प्रत्येक गोष्ट तपासून घ्यायची. एकदा मला एका प्रोजेक्टसाठी बोलावण्यात आलं होतं. मला आठवत आहे, कोणत्यातरी प्रोजेक्टसाठी करार करायचा होता. करार करण्यासाठी त्याने मला एका हॉटेलमध्ये बोलावलं होते. कोणत्याही गोष्टीसाठी हॉटेलमध्ये जायचं नाही, असा माझ्या निर्णय होता..’

‘माझा निर्णय त्याला माहित असताना देखील त्याने मला हॉटेलमध्ये बोलावलं. पण मी माझ्या एका मित्राला घेवून गेली. तो एका टेबलावर बसला होता. मी त्याच्याबरोबर वेगळ्या टेबलावर बसून बोलत होती. तेव्हा ती व्यक्ती मला म्हणाली, ‘तुझं करियर बनवणार आहे. हे ऐकल्यानंतर माझा मित्राने तेथून निघण्यास सांगितलं.’

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘मला कोणीही जबरदस्तीने काहीही करायला सांगितलं नव्हतं.. शिवाय ज्याठिकाणी मला योग्य वाटत नाही, त्या ठिकाणी मी अधिक काळ थांबत नाही किंवा जात देखील नाही…’ असं देखील योगिताने सांगितलं.. यागिताच्या आधी देखील अनेक अभिनेत्रींनी त्यांना आलेल्या कास्टिंग काऊचच्या अनुभवाबद्दल सांगितलं आहे..

अनेक अभिनेत्रींनी बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण करण्याआधी कास्टिंग काऊचचा अनुभव सांगितला आहे. कास्टिंग काऊचमुळे तर अनेक अभिनेत्रींनी इंडस्ट्रीला राम राम देखील ठेकला… पण काही अभिनेत्रीं मात्र जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर इंडस्ट्रीमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली आहे…