66 वर्षापूर्वी रेडिओकडून मोठी चूक, लता मंगेशकर यांच्या सुपरहीट गाण्यावर घातली बंदी, थेट..

गान कोकिला लता मंगेशकर आज आपल्यात नाहीत. मात्र, त्यांची गाणे कानावर पडली की त्यांचा चेहरा पुढे येतो. लता मंगेशकर यांचे गाणे मनाला स्पर्श करतात. त्यांच्या गाण्यामध्ये एक वेगळाच गोडवा बघायला मिळतो.

66 वर्षापूर्वी रेडिओकडून मोठी चूक, लता मंगेशकर यांच्या सुपरहीट गाण्यावर घातली बंदी, थेट..
Lata Mangeshkar
| Updated on: Nov 16, 2026 | 8:34 AM

बॉलिवूडच्या गान कोकिला लता मंगेशकर आज आपल्यात नाहीत, पण त्यांची गाणे आजही लोकांच्या मनावर राज्य करतात. लता मंगेशकर यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक आयकॉनिक गाणे म्हटले आहेत. आजही त्यांचे गाणे कानावर पडली की, त्यांचा चेहरा पुढे येतो. लता मंगेशकर यांचा एक असा किस्सा आहे, जो फार कमी लोकांना माहिती आहे. 66 वर्ष अगोदर रेडिओने थेट लता मंगेशकर यांच्या गाण्यावर बंदी आणली होती. त्यांनी थेट लता मंगेशकर यांचे गाणे बॅन केले होते. 1960 मधील चित्रपट दिल अपना आैर प्रीत पराईमधील प्रसिद्ध गाणे अजीब दास्तां है ये आणि शीशा ए दिल इतना ना उछालो संबंधित आहे. लता मंगेशकर यांनी या दोन्ही गाण्यांना आपला आवाज दिला होता. या चित्रपटात मीना कुमारी, नादिरा, राज कुमार आणि हेलेन या कलाकारांनी काम केले. या चित्रपटाने मोठा धुमाकूळ घातला.

हीट चित्रपट ठरला होता. चित्रपटातील प्रत्येक गाण्याला प्रेक्षकांनी मोठे प्रेम दिले. शीशा ए दिल इतना ना उछालो या गाण्यावरून मोठा वाद निर्माण झाला. हेच नाही तर 66 वर्षापूर्वी या गाण्यावर बंदी घालण्यात आली होती. हे गाणे लता मंगेशकर यांनी गायले होते. मीना कुमारीच्या चित्रपटाचे हे गाणे होते. गाण्यात समुद्रकिनारी मैत्रिणींची मस्ती बघायला मिळाली.

Loading...

गाण्याच्या शब्दांवर रेडिओ सेंसर बोर्डने आक्षेप घेतला होता. ज्यानंतर या गाण्यावर बंदी घालण्यात आली. ज्यावेळी या गाण्यावर बंदी घालण्यात आली होती, त्यावेळी रेडिओने अस्वीकृततचे लेबल लावले होते. रेडिओ जॉकी या गाण्याला वाजू शकणार नाहीत, याकरिता हे लेबल लावण्यात आले होते. पण इथेच एक मोठी चूक झाली. चुकून क्लर्कने लेबलला लता मंगेशकर यांचे गाणे अजीब दास्तां है यावर लेबल लावले.

शीशा ए दिल इतरना ना उछालो या गाण्याच्या जागी थेट अजीब दास्तां है या गाण्यावर बंदी घालण्यात आली. कित्येक वर्ष शीशा ए दिल इतना ना उछालो वाजत राहिले. ज्यावेळी अधिकाऱ्यांना या चुकीबद्दल कळाले, त्यावेळी त्यांनी आपली चूक सुधारली. मात्र, तोपर्यंत खूप जास्त उशीर झाला होता. प्रत्येक घरात हे गाणे वाजत होते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us