
तामिळ चित्रपटाचा सुपरस्टार विजय याने ३० वर्षे चित्रपटांद्वारे चाहत्यांचे मनोरंजन केले. त्याचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर पैशांची बरसात करण्यासाठी ओळखले जातात. त्याची दमदार फिल्मोग्राफी आणि बॉक्स ऑफिस रेकॉर्ड्समुळे तो लोकांचा हिरो बनला आणि थलपती नावाने ओळखला जाऊ लागला. परंतू आता थलपती विजय आता चाहत्यांना त्याच्या शेवटच्या चित्रपटाद्वारे चाहत्यांसमोर येत आहे.
थलपती विजयची शेवटची फिल्म ‘जन नायगन’ रिलीज होण्याच्या वाटेवर आहे. चाहते त्यामुळे भावूक झाले आहेत. कारण त्याचा आवडता स्टार आता पडद्यावर अभिनय करताना दिसणार नाही. ‘जन नायगन’काही दिवसात रिलीज होत आहे. या चित्रपटाची एडव्हान्स बुकींग सुरु झाली आहे. ज्याचे आकड्यांवर नजर टाकली तर आश्चर्यकारक माहिती उघडकीस आली आहे.
‘जन नायगन’चित्रपटाची एडव्हान्स बुकींग कर्नाटकातील बंगळुरु शहरात सुरु आहे. तेथे खिडक्या सुरु होताच तिकीटांची आगाऊ बुकींग संपत असून अनेक शोज हाऊस फुल झाले आहेत. HT च्या बातमीनुसार तामिळ भाषेतील शोज ज्यांच्या तिकीटांचे दर 2000 रुपयांपर्यंत होते. ते देखील हाऊसफुल होत आहेत. बंगलुरु येथील अनेक थिएटर्सचे सकाळचे सर्व शोज फुल झाले आहेत. तर दुपारचे शो देखील फुल होण्याच्या वाटेवर आहेत. या शोजच्या तिकीटांची किंमत 1800 ते 2000 रुपयांदरम्यान आहे.
काही थिएटर्समध्ये असेही शोज लागले आहेत ज्याची किंमत 800 रुपये आहे. यात जनता भरभरुन प्रेम देत असून तिकीटांची खरेदी जोरदारपणे सुरु आहे. थलपती विजय याच्या चित्रपटाची प्रतिक्षा लागली असून चाहते एक्सायटेड झाले आहेत. तर कोची येथील काही शोची तिकीटांची किंमत 350 रुपयांपर्यंत ठेवलेली असून ती बहुतांशी तिकीटे संपली आहेत. मात्र, या चित्रपटाची आगाऊ बुकींग मुंबई, हैदराबाद, चेन्नई आणि दिल्लीत सुरु झालेली नाही.
ट्रेड वेबसाईट सॅकनिल्कच्या बातमीनुसार, ‘जन नायगन’ ची आगाऊ बुकींग चेन्नईत सर्टीफिकीट मिळाल्यानंतर सुरु होईल. सेंसॉर बोर्ड चित्रपटाला प्रमाणपत्र देण्यासाठी थोडा उशीर करत आहे. याची अनेक कारणे सांगितली जात आहेत. थलपती विजय याचा राजकीय पक्ष TVK चे नेते सी. टी. निर्मल कुमार यांनी सेन्सॉर बोर्डावर अनेक आरोप लावले आहेत.
ते म्हणाले की आम्हाला संशय आहे की चित्रपट जन नायगनला जाणून बुजून सेन्सॉर प्रमाणपत्र देण्यास उशीर करत आहे. सेन्सॉर कमिटीने १९ डिसेंबरला चित्रपट पाहण्यासाठी घेतली होती.तरी देखील आतापर्यंत सेन्सॉर प्रमाणपत्र मिळालेले नाही.यामुळे कळते की मुद्दामहून काम उशीराने केले जात आहे. आता आम्ही आज सायंकाळपर्यंत वाट पहातोय की काय निर्णय होतो आहे.
चेन्नईत थलपती विजय याचा फॅन फॉलोईंग सर्वात जास्त आहे. त्याची एक झलक पाहण्यासाठी तेथील चाहते खूप उत्सुक आहेत. त्यामुळे शेवटचा चित्रपट पाहाण्यासाठी थिएटर्समध्ये चाहत्यांची गर्दी उसळु शकते. थलपती विजय याचा ‘जन नायगन’चित्रपट येत्या ९ जानेवारी रोजी रिलीज होणार आहे. त्याच दिवशी प्रभास याचा चित्रपट ‘द राजा साब’देखील रिलीज होणार असून जी आणखी एक पॅन इंडिया चित्रपट आहे.