लॅपटॉपच्या कीबोर्डमध्ये समस्या जाणवत असेल तर सर्व्हिस सेंटरमध्ये जाण्यापुर्वी करा ‘या’ गोष्टी, वाचतील तुमचे पैसे
तुमच्या लॅपटॉपचा कीबोर्ड काम करत नसेल तर तुम्ही ही किरकोळ समस्या घरी सोडवू शकता. सर्व्हिस सेंटरमध्ये जाण्यापुर्वी या काही सोप्या स्टेप्स करून पहा.

जेव्हा तुम्ही तुमच्या लॅपटॉपवर काम करत असता आणि अचानक कीबोर्ड बटन काम करत नसेल तर तेव्हा एक मोठी समस्या निर्माण होते. एकदा कीबोर्ड खराब झाला की लॅपटॉप वापरण्या योग्य राहत नाही. संपूर्ण कीबोर्ड खराब झाला असो किंवा फक्त एखादा बटन खराब झाली असो, आपण त्वरित तो दुरुस्त करण्यासाठी सर्व्हिस सेंटरमध्ये धाव घेतो. जर तुम्ही अशा लोकांपैकी एक असाल, तर तुम्ही सर्व्हिस सेंटरमध्ये न जाता तुमचा कीबोर्ड दुरुस्त करण्याचे काही सोपे मार्ग आजच्या लेखातून जाणून घेऊयात.
लॅपटॉप रीबूट करा
ज्याप्रमाणे स्मार्टफोनमधील किरकोळ समस्या जाणवली की आपण फोन ऑफ करून पुन्हा चालू करतो तेव्हा समस्या दुरुस्त होते. अगदी त्याचप्रमाणे ही ट्रिक लॅपटॉपवर देखील काम करते. जर तुमचा कीबोर्डचा एखादा बटन काम करत नसेल तर तो खराब झाला नसेल, तर तुम्ही तुमचा लॅपटॉप रीबूट करून किरकोळ त्रुटी लगेच दुरूस्त करू शकता.
बॅटरीमुळे देखील समस्या उद्भवू शकते
बऱ्याच लॅपटॉपमध्ये बॅटरी कीबोर्डखाली ठेवली जाते. जर बॅटरी फुगली तर कीबोर्ड नीट काम करू शकत नाही. हे तपासण्यासाठी बॅटरी काढून टाका आणि अशावेळेस फक्त चार्जर प्लग इन करा, लॅपटॉप चालू करा आणि कीबोर्ड वापरण्याचा प्रयत्न करा. जर कीबोर्ड योग्यरित्या काम करत असेल, तर याचा अर्थ बॅटरीमुळे समस्या निर्माण झाली होती.
कीबोर्ड स्वच्छ करणे महत्वाचे आहे
कधीकधी लॅपटॉप कीबोर्डवर धुळ व घाण साचल्याने नीट काम करत नाही. कीबोर्ड नियमितपणे स्वच्छ करणे महत्वाचे आहे. कधीकधी कीजच्या गॅपमध्ये कचरा जमा होतो, ज्यामुळे कीज दाबता येत नाहीत. अशा परिस्थितीत कीबोर्ड पूर्णपणे स्वच्छ करा.
ही समस्या कीबोर्ड ड्रायव्हरमुळे उद्भवू शकते.
स्टार्ट मेनू उघडा आणि डिव्हाइस मॅनेजर सर्च करा. नंतर कीबोर्ड विभागात जा. जर तुम्हाला पिवळा चिन्ह दिसला तर ते समस्येचे संकेत देते. हे दुरुस्त करण्यासाठी ड्रायव्हर अनइंस्टॉल करा आणि तुमचा लॅपटॉप रीस्टार्ट करा. विंडोज आपोआप ड्रायव्हर इन्स्टॉल करेल. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही नवीन ड्रायव्हर देखील डाउनलोड करू शकता.
