
मुंबई : रणबीर कपूर हा कायमच चर्चेत असणारा बाॅलिवूड (Bollywood) अभिनेता आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून रणबीर कपूर याच्या अडचणीमध्ये मोठी वाढ झाल्याचे बघायला मिळतंय. महादेव ॲप प्रकरणात रणबीर कपूर (Ranbir Kapoor) याच्यावर गंभीर आरोप करण्यात आले. इतकेच नाही तर या ॲपचे प्रमोशन करण्यासाठी त्याने तगडी रक्कम घेतल्याचे देखील सांगितले जातंय. रणबीर कपूर याचे नाव महादेव ॲप (mahadev app) प्रकरणात आल्यानंतर त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला.
इतकेच नाही तर या प्रकरणात रणबीर कपूर याची चाैकशी ही थेट ईडीकडून केली जाणार आहे. रणबीर कपूर याला 6 आॅक्टोबर रोजी ईडीच्या कार्यालयात हजर व्हायचे होते. मात्र, रणबीर कपूर याने ईडीला मेल करत काही दिवसांचा वेळ मागून घेतला. रणबीर कपूर याला ईडीने थेट समन्स बजावला आहे. फक्त रणबीर कपूर हाच नाही तर अजूनही काही कलाकारांची यामध्ये नाव आलीयेत.
रणबीर कपूर याचा सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. रणबीर कपूर याचा हा व्हिडीओ पाहून लोक हैराण झाल्याचे बघायला मिळतंय. नेहमीच रणबीर कपूर हा पापाराझी यांच्यावर चिडचिड करताना दिसतो. इतकेच नाही तर बऱ्याच वेळा त्यांना फोटोसाठी पोझ न देता निघून जाताना देखील दिसतो.
सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये काहीतरी वेगळेच बघायला मिळतंय. रणबीर कपूर हा गाडीमधून उतरतो. यावेळी रणबीर कपूर याला पाहून पापाराझी हे फोटो आणि व्हिडीओ काढताना दिसत आहेत. मात्र, रणबीर कपूर हा थेट पुढे जाताना दिसतोय. रणबीर कपूर याच्या पुढे एक पापाराझी येतो. या पापाराझीला ढकलत थेट रणबीर कपूर लिफ्टमध्ये घेऊन जातो.
पुढे तो पापाराझी तिथून निघण्याचा प्रयत्न करतो. मात्र, रणबीर कपूर हा त्याच्या पुढे थांबतो आणि त्याला लिफ्टमधून बाहेर पडू देत नाही. पहिल्यांदाच रणबीर कपूर हा पापाराझी यांच्यासोबत अशाप्रकारे मस्ती करताना दिसतोय. यावेळी उपस्थित लोक हसताना देखील दिसत आहेत. आता हाच व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. यावर कमेंट करत एकाने थेट लिहिले की, रणबीर कपूर याने पापाराझीचे किडनॅप केले.