
मुंबई : महादेव बेटिंग ॲप प्रकरणात बॉलिवूडच्या कलाकारांची नावे पुढे आल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसल्याचे दिसतंय. या प्रकरणात बाॅलिवूड (Bollywood) अभिनेता रणबीर कपूर याला समन्स पाठवण्यात आल्याने मोठी खळबळ उडालीये. रणबीर कपूर याला ईडीने 6 आॅक्टोबर रोजी चाैकशीसाठी बोलावले. मात्र, रणबीर कपूर (Ranbir Kapoor) हा चाैकशीसाठी उपस्थित राहिला नाही. रणबीर कपूर याने ईडीला मेल करत काही दिवस वेळ मागितला.
आता रणबीर कपूर याच्यानंतर इतरही कलाकारांनी या प्रकरणात चाैकशी होणार हे स्पष्ट आहे. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणात अनेक बाॅलिवूडच्या कलाकारांची नावे आहेत. या कलाकारांनी कोट्यवधी रूपये घेतल्याचे सांगितले जातंय. फक्त बाॅलिवूड कलाकारच नाही तर काही राजकारणी आणि काही खेळाडूंच्या नावाचा देखील समावेश आहे.
या महादेव बेटिंग ॲपचे जाळे फक्त भारतातच नाही तर विदेशात देखील बघायला मिळतंय. महादेव बेटिंग ॲप प्रकरणात रणबीर कपूर याच्यानंतर अभिनेता पुलकित सम्राट याला देखील ईडीने समन्स पाठवल्याचे सांगितले जातंय. रिपोर्टनुसार ईडीने पुलकित सम्राट याला समन्स पाठवलाय. मात्र, यावर बोलताना पुलकित सम्राट हा म्हणाला की, मला याबद्दल फार काही माहिती नाहीये. मलाही याबद्दल आताच कळाले.
पुढे पुलकित सम्राट म्हणाला की, मी मुंबईत आल्यानंतर या प्रकरणाबद्दल माहिती घेईल. मात्र, पुलकित सम्राट याचे हेच हे बोलणे लोकांना फार काही रूचले नसल्याचे दिसतंय. आता एका मागून एक असे ईडीकडून सर्वच कलाकारांना समन्स पाठवले जाण्याची शक्यता आहे. महादेव बेटिंग ॲप प्रकरणात बाॅलिवूडच्या 15 ते 20 कलाकारांची नावे पुढे आलीयंत.
महादेव बेटिंग ॲप कंपनीकडून कलाकारांना कोट्यवधी रूपये दिले गेले असल्याचे सांगितले जातंय. या प्रकरणात काही वेळापूर्वीच कंगना राणावत हिच्याकडून देखील अत्यंत मोठा खुलासा करण्यात आलाय. आता या प्रकरणात ईडीकडून नेमकी काय कारवाई ही पुढे केली जाते हे देखील पाहण्यासारखे ठरणार आहे. मात्र, या प्रकरणात बाॅलिवूड कलाकारांची नावे सतत येत असल्याने चाहते हे हैराण झाले आहेत.