AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mahadev Betting App Case | महादेव बेटिंग ॲप प्रकरणात कंगना राणावत हिचा धक्कादायक खुलासा, मोठा गाैप्यस्फोट, कलाकारांची कोट्यवधीला खरेदी

महादेव बेटिंग ॲप प्रकरणात बाॅलिवूडच्या कलाकारांची नावे आल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला. इतकेच नाही तर या प्रकरणात रणबीर कपूर याला ईडीकडून समन्स देखील पाठवण्यात आलाय. यामुले लोक हैराण झाल्याचे बघायला मिळतंय.

Mahadev Betting App Case | महादेव बेटिंग ॲप प्रकरणात कंगना राणावत हिचा धक्कादायक खुलासा, मोठा गाैप्यस्फोट, कलाकारांची कोट्यवधीला खरेदी
| Updated on: Oct 07, 2023 | 3:42 PM
Share

मुंबई : महादेव बेटिंग ॲप प्रकरणात बॉलिवूडच्या कलाकारांचे पाय खोलात असल्याचे स्पष्ट झालंय. बाॅलिवूडचे अनेक कलाकार हे ईडीच्या रडारवर आहेत. इतकेच नाही तर या प्रकरणात बाॅलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) याला ईडीकडून समन्स देखील पाठवण्यात आलाय. रणबीर कपूर याच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झालीये. फक्त रणबीर कपूर हाच नाही तर अनेक बाॅलिवूडचे नामवंत नावे देखील या महादेव बेटिंग ॲप (Mahadev Betting App Case) प्रकरणात सहभागी असल्याचे सांगितले जातंय. यामुळे सर्वत्र खळबळ उडाल्याचे बघायला मिळतंय.

महादेव बेटिंग ॲप प्रकरणात सोनाक्षी सिन्हा, रणबीर कपूर, मलायका अरोरा, सोनू सूद, सुनील शेट्टी, हार्डी संधू, रश्मिका मंदाना, सारा अली खान, टायगर श्रॉफ, एम्सी दिप्ती साधवानी, गुरु रंधावा, श्रद्धा कपूर, हुमा कुरेशी, कपिल शर्मा यांची नाव पुढे आलीयेत. आता रणबीर कपूर याच्यानंतर यांची देखील चाैकशी ही ईडीकडून होण्याची दाट शक्यता आहे.

आता या प्रकरणामध्येच कंगना राणावत हिच्याकडून मोठा खुलासा करण्यात आलाय. कंगना राणावत हिने थेट बाॅलिवूडच्या या कलाकारांवर निशाणा साधत मोठा गाैप्यस्फोट केलाय. कंगना राणावत हिचे हे बोलणे ऐकून लोक हैराण झाल्याचे देखील बघायला मिळते. या महादेव बेटिंग ॲपमुळे आता बाॅलिवूड कलाकारांची झोप उडाल्याचे बघायला मिळतंय.

कंगना राणावत हिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, हे लोक एका वर्षात सुमारे 6 वेळा माझ्याकडे आले. प्रत्येक वेळी त्यांनी मला विकत घेण्याच्या ऑफर केल्या ते मला कोट्यवधी रुपये देत होते. पण मी प्रत्येक वेळी त्यांना नाही म्हणाले. प्रामाणिकपणा आता फक्त तुमच्या विवेकासाठी उपयुक्त नाही. हा नवा भारत आहे, स्वतःला सुधारा नाही तर सुधारले जाईल.

कंगना राणावत हिने या पोस्टसोबत एक फोटो देखील शेअर केलाय. आता कंगना राणावत हिने शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतंय. लोक कंगना राणावत हिच्या या पोस्टवर मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत. महादेव बेटिंग ॲप प्रकरणात बाॅलिवूड कलाकारांनी नावे इतक्या मोठ्या प्रमाणात आल्याने सर्वत्रजण हैराण झाल्याचे बघायला मिळतंय.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना