कपडे-बूट ठेवण्यासाठी या अभिनेत्याने विकत घेतला फ्लॅट, एकेकाळी वापरायचा मामाचे कपडे

Krushna Abhishek House : कृष्णा अभिषेकने एक नवीन 3 BHK फ्लॅट खरेदी केला आहे. पण तो तिथे राहणार नाहीये, तिथे फक्त तो त्याचे कपडे आणि बूट ठेवणार आहे. कोण आहे तो अभिनेता ?

कपडे-बूट ठेवण्यासाठी या अभिनेत्याने विकत घेतला फ्लॅट, एकेकाळी वापरायचा मामाचे कपडे
कपडे-बूट ठेवण्यासाठी या अभिनेत्याने विकत घेतला फ्लॅट
| Updated on: Jan 26, 2025 | 1:16 PM

अभिनेता-कॉमेडियन कृष्णा अभिषेकला वेगळ्या ओळखीची गरज नाही. त्याच्या हरहुन्नरी टॅलेंटने, अभिनयाने तो सर्वांना पोट धरून हसवतो. पण नुकतीच त्याने एक अशी गोष्ट सर्वांमोर शेअर केलीये, ती एकून तुम्हीही अवाक व्हाल. कृष्णाने सांगितलं की त्याने नुकताच एक 3 BHK फ्लॅट खरेदी केला आहे. आता हे वाचून तुम्ही म्हणाल की त्यात काय एवढं खास ? पण पुढे विचार करण्यापूर्वी आधी हे तर ऐका की त्याने तो फ्लॅट खरेदी केला तरी का ? कृष्णा अभिषेकने हा फ्लॅट त्याच्या राहण्यासाठी किंवा इन्व्हेस्टमेंट म्हणून खरेदी केला नाहीये, तर त्या फ्लॅटमध्ये तो त्याचे कपडे आणि बूट ठेवतो. ऐकून आश्चर्य वाटलं ना! पण हे खरं आहे. कृष्णाचं बूट आणि कपड्यांचं प्रेम तर सर्वश्रुत आहे, पण एवढंच नव्हे तर तो दर 6 महिन्यांनी त्याचं कपड्याचं कलेक्शनही अपडेट करत असतो.

कृष्णाची स्वत:ची एक ओळख आहेच, पण तो अभिनेता गोविंदा याचा भाच्चा म्हणूनही प्रसिद्ध आहे. त्यांच्यात आधी काही वाद होते, पण पायाला गोळी लागून गोविंदा जखमी झाल्यानंतर कृष्णाने त्याची भेट घेतली आणि तेव्हापासून त्यांचे मतभेद मिटल्याचे सांगितलं जातं. हाच कृष्णा नुकताच अर्चना पूरण सिंह यांच्या यूट्यूब चॅनलच्या मुलाखतीसाठी गेला होता. तेथे अर्चनाने कृष्णाला जेवणासाठी बोलावले होते. या संवादादरम्यान कृष्णाने शूज आणि कपड्यांबद्दलचे प्रेम व्यक्त केले. त्याच्याकडे एवढा संग्रह आहे की त्याने त्ासाठी एक वेगळ घरंच खरेदी केलं. फ्लॅट विकत घेऊन त्याने त्याचं बुटीकमध्ये रूपांतर केलं.

कृष्णाचे हे प्रेम पाहून अर्चनाचा पती, अभिनेता परमीत सेठी चकित झाला. पण तेव्हा कृष्णाने सांगितले की 6 महिन्यांत तो बरेच कपडे आणि बूट शिफ्ट करेल. यावर अर्चना गमतीने म्हणते की, तिचा मुलगा आयुष्मानही तुमच्या उंचीचा आहे, टाकून देताना जे काही शिल्लक असेल ते आयुष्मानला द्या.

एकेकाळी वापरायचा गोविंदाचे कपडे

कृष्णाने यावेळी एक आठवणही सांगितली. तो म्हणाला की मी लहानपणी मोठा होत असताना मामा गोविंदाचे कपडे घालायचो. या वेळी त्याला एकदा वाटले की DNG फॅशन ब्रँड प्रत्यक्षात डेव्हिड (धवन) आणि गोविंदाच्या नावावर आहे. मला वाटले की हे दोघेही प्रसिद्ध आहेत, त्यांनी स्वतःचा ब्रँड तयार केला असावा, अशी गंमत त्याने सांगितली. माझ्या कॉलेजच्या दिवसात मी सगळ्या मोठ्या ब्रँड्सचे कपडे घालायचो. त्यावेळी मला ब्रँडची कल्पना नव्हती. मी आता कुठे मोठ्या ब्रँडची नावे बरोबर उच्चारायला शिकलो आहे.

 

डेव्हिड धवन आणि गोविंदा यांनी दीर्घकाळ एकत्र काम केले असून 90 आणि 2000 च्या दशकात त्यांनी अनेक उत्कृष्ट चित्रपट दिले. राजा बाबू, कुली नंबर 1, साजन चले ससुराल, शोला और शबनम, हिरो नंबर 1, क्यूंकी में झुठ नहीं बोलता, पार्टनर आणि बडे मियाँ छोटे मियाँ या चित्रपटांचा समावेश आहे. त्यांच्यात तकाही मतभेद होते, पण आता त्यांनी जुना वाद मागे टाकला असून आता सर्व आलबेल आहे.