3 वर्षांपूर्वीचा चित्रपट OTT वर होतोय ट्रेंड, IMDb वर 8.2 रेटिंग; अंगावर शहारे आणणारा क्लायमॅक्स

तीन वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला चित्रपट सध्या ओटीटीवर ट्रेंडमध्ये आहे. या चित्रपटाला आयएमडीबीवर आठपेक्षा जास्त रेटिंग मिळाली आहे. या चित्रपटाचा क्लायमॅक्स अंगावर शहारे आणणारा आहे. सध्या त्याचा दुसरा भाग थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे.

3 वर्षांपूर्वीचा चित्रपट OTT वर होतोय ट्रेंड, IMDb वर 8.2 रेटिंग; अंगावर शहारे आणणारा क्लायमॅक्स
अंगावर शहारे आणणारा क्लायमॅक्स
Image Credit source: Youtube
Updated on: Oct 07, 2025 | 1:53 PM

प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट किंवा वेब सीरिजचा मोठा साठाच आहे. दर आठवड्यात विविध ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर प्रेक्षकांच्या पसंतीचा कंटेंट ट्रेंड होत असतो. सध्या ओटीटीवर तीन वर्षे जुना ब्लॉकबस्टर चित्रपट ट्रेंडमध्ये आहे. 2 तास 27 मिनिटांच्या या चित्रपटाची कथा तुम्हाला खिळवून ठेवेल. हा चित्रपट कोणता आहे आणि तीन वर्षांनंतर आता का त्याची इतकी चर्चा होतेय, ते जाणून घेऊयात..

3 वर्षे जुना चित्रपट ट्रेंडमध्ये

प्रदर्शनाच्या तीन वर्षांनंतर एखादा चित्रपट ट्रेंड होत असेल तर नक्कीच ही महत्त्वाची बाब आहे. ज्या चित्रपटाचा इथे उल्लेख होतोय, तो 2022 मध्ये फ्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचा बजेट फक्त 16 कोटी रुपये होता. परंतु संपूर्ण जगभरात त्याने 400 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता.

कथा

या चित्रपटाच्या कथेची सुरुवात एका जंगलातून होते. एका जमीनदाराला त्यावर ताबा मिळवायचा असतो. परंतु त्या जंगलाजवळ राहणारे गावातील लोक त्याचा विरोध करतात. कारण जंगलात त्यांचे देवता निवास करतात, अशी गावकऱ्यांची श्रद्धा असते. आमच्या देवांची जमीन आम्ही कोणालाच हडपू देणार नाही, अशी भूमिका ते घेतात. यावरून मोठा वाद होतो. अखेर त्याच प्रशासनाची एण्ट्री होते, तेव्हा हिरो आणि पोलीस एकमेकांसमोर येतात.

क्लायमॅक्स

या चित्रपटाचा क्लायमॅक्स पाहून तुमच्या अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाही. हा चित्रपट तुम्हाला अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पहायला मिळेल. त्याचं नाव आहे ‘कांतारा’. या ओटीटीवर हा चित्रपट सध्या चौथ्या क्रमांकावर ट्रेंड होतोय. जर तुम्हाला हा चित्रपट हिंदी भाषेत पहायचा असेल तर तुम्ही नेटफ्लिक्सवर तो पाहू शकता.

आयएमडीबीवर 8.2 रेटिंग

ऋषभ शेट्टीची मुख्य भूमिका असलेला ‘कांतारा: चाप्टर 1’ सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. ‘कांतारा’चा हा प्रीक्वेल आहे. ‘कांतारा- अ लेजंड’ या चित्रपटाला आयएमडीबीवर दहापैकी 8.2 रेटिंग मिळाली आहे. ओटीटीवरील हा ‘मस्ट वॉच’ चित्रपट बनला आहे. आयएमडीबीवर प्रेक्षकच रेटिंग देतात. त्यामुळे एखाद्या चित्रपटाला चांगली रेटिंग मिळाली असेल तर तो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे, असं म्हणायला हरकत नाही.