Satish Kaushik | सतीश कौशिक यांच्या अचानक निधनाचं कारण आलं समोर

| Updated on: Mar 09, 2023 | 8:45 AM

जुहूमधील जानकी कुटीरमध्ये इंडस्ट्रीतील सहकाऱ्यांसोबत होळी साजरी केल्याची माहिती त्यांनी या पोस्टद्वारे दिली होती. सोशल मीडियाद्वारे त्यांनी सर्वांना शुभेच्छासुद्धा दिल्या होत्या. या फोटोंमध्ये त्यांचा हसता चेहरा पाहून चाहते भावूक होत आहेत.

Satish Kaushik | सतीश कौशिक यांच्या अचानक निधनाचं कारण आलं समोर
Satish Kaushik
Image Credit source: Twitter
Follow us on

मुंबई : अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांच्या निधनाने संपूर्ण इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. वयाच्या 66 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सतीश यांचे खास मित्र आणि ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी ट्विट करत निधनाची माहिती दिली. सतीश कौशिक यांच्या निधनानंतर त्यांची सोशल मीडियावरील अखेरची पोस्ट व्हायरल होत आहे. 7 मार्च रोजी म्हणजेच दोन दिवसांपूर्वी त्यांनी ही पोस्ट अपलोड केली होती. इंडस्ट्रीतील सहकाऱ्यांसोबत ते यामध्ये मनमुराद होळी खेळताना दिसले. त्यामुळे दोन दिवसांपूर्वीच धडधाकट दिसणाऱ्या सतीश यांचं अचानक निधन कशामुळे झालं, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्यांच्या निधनाचं कारण नुकतंच समोर आलं आहे.

एनसीआरमध्ये असताना सतीश कौशिक यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती मिळत आहे. त्यांचं पार्थिव सध्या गुरुग्राममधील फोर्टीज रुग्णालयात आहे. शवविच्छेदनानंतर त्यांचं पार्शिव मुंबईत आणलं जाईल. गुरुग्राममध्ये ते कोणाला तरी भेटण्यासाठी गेले होते, मात्र कारमध्येच त्यांना हार्ट अटॅक आला.

हे सुद्धा वाचा

गेल्या काही काळात हार्ट अटॅकमुळे इंडस्ट्रीतील बऱ्याच कलाकारांचं निधन झालं. कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना जिममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराचा झटका होता. बरेच दिवस रुग्णालयात उपचारानंतर त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते तारका रत्न यांना एका रॅलीदरम्यान हृदयविकाराचा झटका आला होता. वयाच्या 39 व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. तारका रत्न हे ज्युनियर एनटीआरचे चुलत भाई होते. ‘मिर्झापूर’ या वेब सीरिजमध्ये भूमिका साकारलेले अभिनेते शाहनवाज प्रधान यांचंही निधन हृदयविकाराच्या झटक्याने झालं.

सतीश कौशिक हे अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते, कॉमेडियन आणि पटकथालेखक होते. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा आणि फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया इथून त्यांनी अभिनयाचे धडे घेतले. सतीश कौशिक यांनी रंगभूमीवरून करिअरची सुरुवात केली होती. ‘मिस्टर इंडिया’, ‘दिवाना मस्ताना’, ‘ब्रिक लेन’, ‘साजन चले ससुराल’ यांसारख्या बऱ्याच चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. तर ‘रुप की रानी चोरों का राजा’, ‘प्रेम’, ‘हम आपके दिल मे रहते है’, ‘तेरे नाम’ यांसारख्या चित्रपटांचं त्यांनी दिग्दर्शन केलं.