Ranbir Alia Wedding: रणबीर-आलियाच्या प्रेमकहाणीला कधी, कुठे अन् कशी सुरुवात झाली?

येत्या 17 एप्रिल रोजी हे दोघं लग्नगाठ (Ranbir Alia Wedding) बांधणार असल्याचं म्हटलं जातंय. 2014 मध्ये आलियाने एका मुलाखतीत रणबीरवर क्रश असल्याचा खुलासा केला होता. त्यावेळी रणबीर हा संजय लीला भन्साळी यांच्या टीममध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होता.

Ranbir Alia Wedding: रणबीर-आलियाच्या प्रेमकहाणीला कधी, कुठे अन् कशी सुरुवात झाली?
Ranbir Kapoor and Alia Bhatt
Image Credit source: Instagram
स्वाती वेमूल

|

Apr 12, 2022 | 11:02 AM

रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांच्या लग्नाची चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. गेल्या काही वर्षांपासून हे दोघं एकमेकांना डेट करत आहेत. येत्या 17 एप्रिल रोजी हे दोघं लग्नगाठ (Ranbir Alia Wedding) बांधणार असल्याचं म्हटलं जातंय. 2014 मध्ये आलियाने एका मुलाखतीत रणबीरवर क्रश असल्याचा खुलासा केला होता. त्यावेळी रणबीर हा संजय लीला भन्साळी यांच्या टीममध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होता आणि आलिया फक्त 11 वर्षांची होती. आलियाने आतापर्यंत अनेक मुलाखतींमध्ये रणबीरवरील तिचं प्रेम खुलेपणाने व्यक्त केलं आहे. या दोघांच्या प्रेमकहाणीला कधी, कुठे आणि कशी सुरुवात झाली ते जाणून घेऊयात..

  1. आलिया भट्टने संजय लीला भन्साळींच्या एका चित्रपटाच्या सेटला भेट दिली होती. त्यावेळी रणबीर कपूरला पाहताच क्षणी ती तिच्या प्रेमात पडली होती. रणबीर त्यावेळी सेटवर सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होता. विशेष म्हणजे आलिया त्यावेळी फक्त 11 वर्षांची होती.
  2. त्यानंतर काही वर्षांनंतर आलियाने करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये हजेरी लावली. या शोमध्ये तिने रणबीरशी लग्न करण्याची इच्छा बोलून दाखवली होती.
  3. 2017 मध्ये दिग्दर्शक अयान मुखर्जीच्या ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान हळूहळू आलिया-रणबीरच्या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं.
  4. 2018 मध्ये या दोघांनी अभिनेत्री सोनम कपूरच्या रिसेप्शनला एकत्र हजेरी लावली होती. यावेळी आलियाने हिरव्या रंगाचा लेहंगा आणि रणबीरने पांढऱ्या रंगाची शेरवानी आणि त्यावर जॅकेट परिधान केला होता. तेव्हापासून या दोघांच्या अफेअरच्या चर्चांना सुरुवात झाली.
  5. त्यानंतर एका मुलाखतीत रणबीरने अभिनेत्रीला डेट करत असल्याची कबुली दिली. मात्र यावेळी तो आलियाबद्दल फार व्यक्त झाला नाही.
  6. रणबीरचे वडील ऋषी कपूर यांच्यावर अमेरिकेत उपचार सुरू असताना आलियाने त्याच्या कुटुंबीयांना अनेकदा भेट दिली. त्यावेळी आलियाने तिच्या नवीन वर्षाची सुरुवातदेखील कपूर कुटुंबीयांसोबत केली होती. तेव्हापासून रणबीर-आलियाला अनेकदा एकत्र पाहिलं गेलं.
  7. त्याच वर्षी एका पुरस्कार सोहळ्यात मंचावर सर्वांसमोर रणबीर-आलियाने एकमेकांविषयीचं प्रेम व्यक्त केलं. यावेळी दोघांनी स्टेजवर एकत्र डान्ससुद्धा केला.
  8. 2021 मध्ये आलियाने रणबीरच्या वाढदिवसानिमित्त फोटो पोस्ट केला. या फोटोसोबत तिने तिचं रिलेशनशिप जाहीर केलं. रणबीरच्या 39व्या वाढदिवसानिमित्त ते दोघं राजस्थानला गेले होते.

हेही वाचा:

Ranbir Alia Wedding: “लवकरच बाबा हो आणि..”; लग्नाच्या चर्चांवर संजय दत्तचा रणबीर कपूरला सल्ला

“.. म्हणून मी अद्याप ‘द काश्मीर फाईल्स’ पाहिला नाही”; सोनू निगमने सांगितलं कारण

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें