Hema Malini | हेमा मालिनी यांच्या कुटुंबात सर्वकाही ठीक नाही? धर्मेंद्र यांच्यानंतर इशा देओलची भावूक पोस्ट

देओल कुटुंबीय आणि त्यांच्यात दुरावा निर्माण झाल्याचाही अंदाज काहींनी वर्तवला होता. या सर्व घडामोडींनंतर धर्मेंद्र यांनी सोशल मीडियावर हेमा मालिनी आणि त्यांच्या मुलींसाठी भावनिक पोस्ट लिहिली. धर्मेंद्र यांच्या पोस्टविषयी चर्चा होत असतानाच आता इशा देओलनंही भावूक पोस्ट लिहिली आहे.

Hema Malini | हेमा मालिनी यांच्या कुटुंबात सर्वकाही ठीक नाही? धर्मेंद्र यांच्यानंतर इशा देओलची भावूक पोस्ट
Dharmendra, Hema Malini and daughter Esha Deol
Image Credit source: Instagram
| Updated on: Jun 29, 2023 | 2:58 PM

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून देओल कुटुंब चांगलंच चर्चेत आहे. अभिनेता सनी देओलचा मुलगा करण देओल नुकताच लग्नबंधनात अडकला. यावेळी संपूर्ण देओल कुटुंब एकत्र दिसलं होतं. मात्र धर्मेंद्र यांची दुसरी पत्नी हेमा मालिनी आणि त्यांच्या दोन्ही मुली या लग्नसोहळ्याला अनुपस्थित होते. जेव्हा नातवाच्या लग्नातील धर्मेंद्र यांचा पहिल्या पत्नीसोबतचा फोटो व्हायरल झाला, तेव्हा हेमा मालिनी यांच्या गैरहजेरीचीही सोशल मीडियावर चर्चा झाली. देओल कुटुंबीय आणि त्यांच्यात दुरावा निर्माण झाल्याचाही अंदाज काहींनी वर्तवला होता. या सर्व घडामोडींनंतर धर्मेंद्र यांनी सोशल मीडियावर हेमा मालिनी आणि त्यांच्या मुलींसाठी भावनिक पोस्ट लिहिली. धर्मेंद्र यांच्या पोस्टविषयी चर्चा होत असतानाच आता इशा देओलनंही भावूक पोस्ट लिहिली आहे.

लग्नाचा फोटो पोस्ट करून भावना व्यक्त

धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी आणि त्यांच्या दोन्ही मुलींची नावं लिहित भावना व्यक्त केल्या होत्या. वय आणि आजारपणाचं कारण देत त्यांनी पश्चात्तापसुद्धा जाहीर केला होता. आता इशाने तिच्या लग्नाचा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. यामध्ये धर्मेंद्र यांच्या कुशीत इशा बसलेली दिसतेय. तर हेमा मालिनी मागे उभ्या आहेत. या तिघांच्या बाजूलाच इशाचा पती उभा आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलं, ‘बाबा, मी तुमच्यावर खूप प्रेम करते. तुम्ही बेस्ट आहात. तुमच्यावर मी विनाशर्त प्रेम करते आणि हे तुम्हाला ठाऊक आहे. खुश राहा आणि निरोगी राहा. लव्ह यू.’

जावयाचीही कमेंट

इशाने या पोस्टमध्ये आई हेमा मालिनी वडील धर्मेंद्र आणि पती भरत तख्तानीलाही टॅग केलं आहे. या पोस्टवर भरतनेही कमेंट करत ‘लव्ह यू पापा’ असं लिहिलं आहे. याआधी धर्मेंद्र यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर मुलगी इशासोबतचा फोटो पोस्ट केला होता. ‘इशा, अहाना, हेमा आणि माझी सर्व प्रेमळ मुलं… तख्तानी आणि वोहरा यांच्यावर मी खूप प्रेम करतो आणि मनापासून तुम्हा सर्वांचा आदर करतो. वय आणि आजारपण मला सांगतंय की मी तुमच्याशी खासगीत बोलू शकलो असतो पण..’, अशी खंत त्यांनी या पोस्टमध्ये व्यक्त केली.

करिअरच्या शिखरावर असताना हेमा मालिनी या धर्मेंद्र यांच्या प्रेमात पडल्या. त्यावेळी धर्मेंद्र विवाहित आणि चार मुलांचे पिता होते. हेमा आणि धर्मेंद्र यांनी 1980 मध्ये लग्नगाठ बांधली. 1981 मध्ये हेमा यांनी ईशाला जन्म दिला तर 1985 मध्ये अहानाचा जन्म झाला. धर्मेंद्र यांचं पहिलं लग्न प्रकाश कौर यांच्याशी झालं होतं. प्रकाश कौर आणि धर्मेंद्र यांना सनी देओल, बॉबी देओल ही दोन मुलं आणि विजीता- अजीता या दोन मुली आहेत.

Follow Us