
Actress Personal Life Controversy: झगमगत्या विश्वातील अभिनेत्रींचं आयुष्य दिसायला कितीही ग्लॅमरस असलं तरी, पडद्यामागची कहाणी काही वेगळीच असते. असंच आयुष्य टीव्ही विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री जगतेय. पहिलं लग्न अपयशी ठरणल्यानंतर अभिनेत्रीने दुसरा संसार थाटला, पण अभिनेत्रीचं दुसरं लग्न देखील फार काळ टिकलं नाही. अभिनेत्रीच्या दुसऱ्या नवऱ्याने आणि तिच्या लेकीच्या सावत्र बापाने असं काही घाणेरडं कृत्य केलं.. ज्यामुळे अभिनेत्रीला पोलिसांची मदत घ्यावी लागली. सावत्र बापाने लेकीला अश्लील व्हिडीओ पाठवले आणि तिला मानसिक त्रास देखील दिला.
सध्या ज्या अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे, ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री श्वेता तिवारी आहे. पहिल्या लग्नापासून श्वेता हिला एक मुलगी आहे, तर दुसऱ्या लग्नापासून अभिनेत्रीला एक मुलगा आहे. श्वेता हिचं पहिलं लग्न राजा चौधरी याच्यासोबत झालं होतं. लग्नानंतर श्वेता आणि राजा यांना लेक पलक हिचं जगात स्वागत केलं. पण मुलीच्या जन्मानंतर दोघांमधील वाद टोकाला पोहोचले…. 2007 मध्ये श्वेता हिने राजा चौधरी यांच्यावर घरगुती हिंसाचाराचे आरोप केले…. अखेर 2012 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला.
पहिल्या घटस्फोटानंतर श्वेता हिच्या आयुष्यात अभिनव कोहली याची एन्ट्री झाली. लग्नाआधी दोघांना अनेक ठिकाणी स्पॉट देखील केलं. पहिल्या घटस्फोटानंतर श्वेता हिने दुसरं लग्न 2013 मध्ये अभिनव याच्यासोबत केलं. सुरुवातीला श्वेता आणि अभिनव यांच्यामध्ये सर्वकाही ठिक होतं…
पण श्वेता आणि अभिनव यांचं लग्न देखील फार काळ टिकलं नाही. 2019 मध्ये श्वेता हिने दुसरा पती अभिनव याच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केलं. अभिनव याने मुलगी पलक हिच्यासोबत वाईट कृत्य केलं… मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनव कोहलीने मुलगी पलक तिवारीवर अश्लील कमेंट केल्या आणि पलकला आक्षेपार्ह व्हिडिओही दाखवले. . शिवाय, मुलीचा मानसिक छळ देखील केल्याचे आरोपही करण्यात आले. या संपूर्ण वादाच्या संदर्भात अभिनवलाही अटक करण्यात आली.
एवढंच नाही तर, अनेक सेलिब्रिटींसोबत श्वेता तिवारी हिच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी जोर धरला… पण अभिनेत्रीने त्या सर्व फेटाळल्या… आता श्वेता तिच्या आयुष्यात फार पुढे गेली आहे. श्वेता आता लेक पलक आणि मुलगा रेयांश याच्यासोबत आनंदाने आयुष्य जगत आहे.