Ujjwal Nikam : ..तर पाकिस्तान म्हणालं असतं, हा तर हिंदू भगवा दहशतवादी, अजमल कसाबबद्दल असं का म्हणाले उज्ज्वल निकम?

Ujjwal Nikam : उज्ज्वल निकम सध्या 'प्रहार' या सिनेमामुळे चर्चेत असून ते अनेक माध्यमांना मुलाखती देत आहेत. अशाच एका मुलाखतीत उज्ज्वल निकम यांनी अजमल कसाबबद्दल भाष्य केलंय.

Ujjwal Nikam : ..तर पाकिस्तान म्हणालं असतं, हा तर हिंदू भगवा दहशतवादी, अजमल कसाबबद्दल असं का म्हणाले उज्ज्वल निकम?
| Updated on: Oct 07, 2026 | 7:34 PM

बॉलिवूड अभिनेता राजकुमार रावचा आगामी चित्रपट, ‘प्रहार: द अनटोल्ड स्टोरी ऑफ उज्ज्वल निकम’ सध्या चर्चेत आहे. या चित्रपटामुळे २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यातील मुख्य आरोपी अजमल कसाब आणि सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्यातील कायदेशीर लढाई पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अजमल कसाबनं न्यायालयात आपल्या वयाबद्दल केलेल्या दाव्यामुळे खटल्याची संपूर्ण दिशाच बदलली. याची एक झलक चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दिसली होती आणि हा चित्रपट त्यावरच आधारित आहे. अशातच आता एका मुलाखतीत उज्ज्वल निकम यांनी अजमल कसाबबद्दल भाष्य केलं आहे.

काय म्हणाले उज्ज्वल निकम?

Loading...

उज्जवल निकम म्हणाले की, ‘आम्हाला लोक म्हणायचे हे प्रकरण का सुरू ठेवताय? कसाबला फाशी का देत नाहीये? त्याचं उत्तर सिनेमाच्या माध्यमातून देण्यात आलं आहे. अनेक दहशतवाद्यांकडे हिंदू असल्याचं ओळखपत्र असतं. जर आम्ही कसाबला फेअर ट्रायल दिलं नसतं, तर पाकिस्तान म्हणालं असतं, हा तर हिंदू भगवा दहशतवादी आहे.’

‘आपल्या देशात एवढं स्वातंत्र्य आहे, लोकशाही आहे, कोणीही सरकार विरोधात बोलतं. पाकिस्तानात ही परिस्थिती नाहीये. त्यामुळे कसाबला फेअर ट्रायल देणं गरजेचं होतं. त्यामुळे लोकांच्या मनातील प्रश्नांची उत्तरं या सिनेमातून देण्यात आली आहेत. राजकुमारनं ती भूमिका उत्तमरित्या साकारली आहे.’ असं उज्ज्वल निकम शेवटी म्हणाले. ‘लोकमत फिल्मी‘ला दिलेल्या मुलाखतीत उज्ज्वल निकम बोलत होते.

दरम्यान, मृत्युदंडाची शिक्षा टाळण्यासाठी, कसाबनं न्यायालयात दावा केला की, तो अल्पवयीन असून केवळ १७ वर्षांचा आहे. एप्रिल २००९ मध्ये खटल्याची सुनावणी सुरू होताच, कसाबचे वकील अब्बास काझमी यांनी त्याच्या वयाबाबत न्यायालयात एक याचिका दाखल केली आणि खटला बाल न्याय न्यायालयात वर्ग करण्याची विनंती केली. जर न्यायालयानं त्याला अल्पवयीन म्हणून मान्यता दिली असती, तर भारतीय कायद्यानुसार त्याला मृत्युदंडाची शिक्षा सुनावता आली नसती. त्याची कमाल शिक्षा बालसुधारगृहातील तीन वर्षांच्या तुरुंगवासापुरती मर्यादित राहिली असती.

सरकारी आणि मेडिकल रेकॉर्डस् यामुळे कसाबचं खोटं उघडकीस आलं. आर्थर रोड तुरुंगाच्या तत्कालीन अधीक्षक स्वाती साठे यांनी न्यायालयात साक्ष दिली की, तुरुंगात दाखल होताना कसाबनं स्वतःचं आपलं वय २१ वर्षे असल्याचं सांगितलं होतं. इतकंच नव्हे तर, २७ नोव्हेंबर २००८ रोजी उपचारादरम्यान, कसाबनं नायर रुग्णालयात डॉ. राघवन यांनाही आपलं वय २१ वर्षे असल्याचं सांगितलं होतं. सर्वात महत्त्वाचा पुरावा म्हणजे कलम १६४ अन्वये दंडाधिकाऱ्यासमोर नोंदवलेला कसाबचा स्वतःचा कबुलीजबाब, ज्यामध्ये त्यानं आपण प्रौढ असल्याचं आणि आपलं वय २१ वर्षे असल्याचं अधिकृतपणे कबूल केलं होतं. त्यामुळे न्यायालयानं कसाब अल्पवयीन असल्याचा दावा फेटाळून लावला.

या सर्व सरकारी कागदपत्रांनी कसाबनं न्यायालयात केलेला अल्पवयीन असल्याचा दावा पूर्णपणे खोडून काढला. विशेष न्यायाधीश एम. एल. ताहिलियानी यांनी फरीदकोट (पाकिस्तान) येथील कसाबच्या जन्म प्रमाणपत्रासाठी बचाव पक्षानं केलेली विनंती फेटाळून लावली आणि वैद्यकीय तपासणीला निर्णायक पुरावा मानलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us