तब्बल 24 तास कळा सोसल्या, वेदना सहन करत अभिनेत्रीने दिला मुलाला जन्म, तिच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट समोर

प्रसिद्ध अभिनेता आणि त्याची पत्नी याला नुकतीच पुत्रप्राप्ती झाली आहे. मुलाच्या जन्माच्या आनंद तर होताच पण अभिनेत्याने त्याच्या पत्नीचे विशेष कौतुक केले आहेत. तिने सोसलेल्या कळांवर भाष्य केले आहे.

तब्बल 24 तास कळा सोसल्या, वेदना सहन करत अभिनेत्रीने दिला मुलाला जन्म, तिच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट समोर
umer shezad bless with baby boy
Image Credit source: SOCIAL MEDIA
| Updated on: Nov 03, 2026 | 3:32 PM

मुलाचा जन्म म्हणजे तो प्रत्येक स्त्रीचा दुसरा जन्म असतो. मग ती स्त्री गरीब असो वा श्रीमंत तो काळ कोणालाही चुकत नाही. एका अभिनेत्याच्या घरी नुकताच पाळणा हलला आहे. पण त्याने त्याच्या पत्नीला झालेल्या वेदना मनमोकळेपणाने मांडल्या आहे. या कपलवर सध्या सोशल मीडियावर प्रेमाचा वर्षाव होत आहे.

हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून प्रसिद्ध पाकिस्तानी मॉडेल आणि अभिनेता उमर शहजाद आहे. उमर शहजाद यांच्या पत्नीने आज एका सुंदर आणि गोंडस मुलाला जन्म दिला आहे. याची माहिती त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत दिली. पण यासोबतच त्याने मुलाच्या जन्मावेळी त्याच्या पत्नीने सोसलेल्या कलेवर भाष्य केले आहे.

Loading...

उमर शहजाद याने सांगितले कि मुलाच्या जन्माच्या पत्नी शानजे लोधीला मुलाच्या जन्मापूर्वी 24 तास प्रसुती कळा सोसाव्या लागल्या. हा प्रवास अत्यंत आव्हानात्मक होता. परंतु प्रार्थना आणि अफाट धैर्याच्या जोरावर ती या परिस्थितीतून बाहेर पडली.

आपल्या पोस्टमध्ये शांजेने उमर शहजादचे भरभरून कौतुकही केले आहे. ती म्हणाली की या कठीण काळात उमर प्रत्येक क्षणी तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा होत. त्याने तिच्या वेदना मनापासून समजून घेतल्या. या जोडप्याने हॉस्पीटलमधील काही फोटो शेअर केले आहेत. त्यामध्ये त्यांच्या नवजात बाळासोबतचा त्यांचा आनंद स्पष्टपणे दिसून येत आहे. मात्र त्यांनी अद्याप त्यांच्या छोट्या राजकुमाराचा चेहरा दाखवलेला नाही.

शानजे आणि उमरने सोशल मिडियावर पोस्ट करत आपल्या मुलाचे नाव जाहीर केले आहे. कपलने आपल्या मुलाचे नाव ‘ इस्माईल’ असे ठेवले आहे. मुलाच्या जन्मानंतर त्यांनी केलेल्या या पोस्टवर चाहत्यांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा मिळत आहे. उमर शहजाद आणि शानजे लोधी यांनी फेब्रुवारी 2025 मध्ये मदिना येथील प्रेषितांच्या मशिदित एका खाजगी समारंभात विवाह केला होता. लग्नानंतर आता दीड वर्षांनी त्यांना पुत्रप्राप्ती झाली आहे. आईची आणि मुलाची प्रकृती स्थिर असून त्या अभिनेत्याने मुलाची पहिली झलक सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us