Video | उर्फी जावेद हिचा ‘हा’ व्हिडीओ पाहून डोळ्यांवरही नाही बसणार विश्वास, जुन्या ऑडिशनमध्ये चक्क अभिनेत्रीचा चेहरा…

उर्फी जावेद हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. उर्फी जावेद ही नेहमीच तिच्या कपड्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकते. उर्फी जावेद ही सोशल मीडियावर देखील सक्रिय असून आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. उर्फी जावेद हिचा चाहता वर्गही मोठा आहे.

Video | उर्फी जावेद हिचा हा व्हिडीओ पाहून डोळ्यांवरही नाही बसणार विश्वास, जुन्या ऑडिशनमध्ये चक्क अभिनेत्रीचा चेहरा...
| Updated on: Aug 10, 2023 | 3:44 PM

मुंबई : उर्फी जावेद हे नाव कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. विशेष म्हणजे अगदी कमी कालावधीमध्ये उर्फी जावेद (Uorfi Javed) हिने खास ओळख मिळवली आहे. बाॅलिवूड अभिनेत्रींना देखील उर्फी जावेद फॅन फाॅलोइंगमध्ये आरामात मागे टाकते. उर्फी जावेद हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. उर्फी जावेद हिला खरी ओळख ही बिग बाॅसच्या (Bigg Boss) घरामध्येच मिळालीये. विशेष म्हणजे सोशल मीडियावर उर्फी जावेद ही कायमच सक्रिय असून आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते.

उर्फी जावेद ही नेहमीच ग्लॅमरस आणि बोल्ड लूकमध्ये दिसते. मुळात म्हणजे उर्फी जावेद ही कधी काय घालेल याचा अजिबातच अंदाजा लावला जाऊ शकत नाही. उर्फी जावेद हिने काही दिवसांपूर्वीच पापाराझी यांना बॅगचे वाटप केले होते. विशेष म्हणजे मुसळधार पावसामध्ये पापाराझी यांना बॅग वाटप करताना उर्फी जावेद दिसली.

नुकताच सोशल मीडियावर उर्फी जावेद हिचा एक जुना व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहे. उर्फी जावेद हिचा हा व्हिडीओ पाहून अनेकांना मोठा धक्का बसला आहे. कारण या जुन्या व्हिडीओमध्ये उर्फी जावेदला ओळखणे देखील अवघड झाले आहे. अनेकांना उर्फी जावेद हिचा जुनाच लूक आवडल्याचे दिसत आहे.

उर्फी जावेद हिने काही वेळापूर्वीच हा व्हिडीओ शेअर केला होता. हा व्हिडीओ शेअर करत उर्फी जावेद हिने सांगितले की, मुंबईमध्ये आल्यानंतर हे माझे तिसरेच ऑडिशन होते. उर्फी जावेद हिचा हा व्हिडीओ करिअरच्या सुरूवातीच्या दिवसांमधील दिसत आहे. मात्र, काही वेळापूर्वीच उर्फी जावेद हिने हा व्हिडीओ डिलीट केला आहे.

एका पेजवर उर्फी जावेद हिचा हा व्हिडीओ दिसत आहे. उर्फी जावेद हिने काही वर्षांमध्ये आपल्या लूकमध्ये मोठा बदल केल्याचे स्पष्ट दिसत आहे. या व्हिडीओवर कमेंट करत एकाने लिहिले की, उर्फी जावेद तू अगोदरच किती जास्त सुंदर दिसत होती. सर्जरी करून तू तुझा चेहरा खराब केला आहेस.

अजून एकाने लिहिले की, देवाने इतके चांगले रूप दिले असताना हिने स्वत:च्या चेहऱ्याची पूर्ण वाट लावून टाकली आहे. मला तर उर्फीचा पहिलाच लूक आवडला. आता उर्फी जावेद हिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. युजर्स उर्फी जावेद हिच्या या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत.