Urfi Javed: बोल्ड कपड्यांमुळे उर्फी जावेद अडचणीत? दुबई पोलिसांनी घेतलं ताब्यात, नेमकं काय आहे प्रकरण?

उर्फी जावेदला दुबईत पोलिसांनी घेतलं ताब्यात? अभिनेत्रीने सोडलं मौन, दिली संपूर्ण घटनेची माहिती

Urfi Javed: बोल्ड कपड्यांमुळे उर्फी जावेद अडचणीत? दुबई पोलिसांनी घेतलं ताब्यात, नेमकं काय आहे प्रकरण?
Urfi Javed
Image Credit source: Instagram
| Updated on: Dec 22, 2022 | 9:15 AM

दुबई: आपल्या चित्रविचित्र कपड्यांमुळे नेहमीच चर्चेत असणारी उर्फी जावेद हिच्यावर दुबईत कारवाई झाल्याचं समजतंय. बोल्ड कपडे परिधान करत व्हिडीओ शूट केल्याप्रकरणी दुबईत उर्फीला ताब्यात घेतल्याची माहिती समोर येतेय. दुबईतील ओपन एरियामध्ये उर्फी बोल्ड कपडे घालून शूट करत होती. याप्रकरणी तिथल्या काही लोकांनी आक्षेप नोंदविला. त्यानंतर तिला पोलिसांनी ताब्यात घेतलं.

उर्फीची दुबई ट्रिप गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चेत आहे. आधी दुबईत पोहोचल्यानंतर तिची तब्येत बिघडली आणि आता तिला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. नेमकं तिथे काय घडलं, याविषयीचा खुलासा खुद्द तिनेच केला आहे. दुबई पोलीस सेटवर आली होती, मात्र बोल्ड कपड्यांमुळे नाही असं तिने सांगितलं.

“पोलीस सेटवर शूटिंग थांबवण्यासाठी आले होते, कारण लोकेशनची समस्या होती. आम्हाला शूटिंग करण्यासाठी मर्यादित वेळ देण्यात आला होता, कारण ती शूटिंग सार्वजनिक ठिकाणी होती. प्रॉडक्शन टीमने वेळ वाढवून घेतली नव्हती, त्यामुळे आम्हाला तिथून निघावं लागलं. जेवढी शूटिंग बाकी होती, ती आम्ही दुसऱ्या दिवशी पूर्ण केली. सेटवर पोलिसांचं येणं आणि माझे कपडे यांचा काहीच संबंध नव्हता”, असं तिने स्पष्ट केलं.

बिग बॉस ओटीटीमुळे सर्वांत आधी चर्चेत आलेली उर्फी तिच्या कपड्यांमुळेच नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेते. साखळ्या, कागर, पिशव्या, गोणी यांसारख्या वस्तूंपासून ती तिचे कपडे तयार करते आणि त्यावर फोटोशूट करते. चित्रविचित्र फॅशन सेन्समुळे तिला अनेकदा ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. इन्स्टाग्रामवर तिचे चार दशलक्षांहून अधिक फॉलोअर्स आहेत.