
मुंबई | 03 ऑक्टोबर 2023 : मॉडेल उर्फी जावेद कायम तिच्या फॅशन सेन्समुळे चर्चेत असते. आता देखील एका मोठ्या कारणामुळे उर्फी जावेद चर्चेत आली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त उर्फी जावेद हिचीच चर्चा रंगली आहे. पण रंगणाऱ्या चर्चांमागचं कारण देखील तसंच आहे. आता उर्फी तिच्या कपड्यांमुळे नाही तर खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर उर्फी हिचा एक फोटो तुफान व्हायरल होत आहे. उर्फी हिचा फोटो पाहिल्यानंतर तिने गुपचूप साखरपुडा उरकल्याची चर्चा रंगली आहे. उर्फीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. फोटोंमध्ये ती हवन कुंडाजवळ बसलेली दिसत आहे.
व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये उर्फी पूजा करताना दिसत आहे. उर्फी हिच्यासोबत एक पुरुष देखील बसल्याचं दिसत आहे. उर्फी सलवार सूटमध्ये दिसत असून तिने डोक्यावर ओढणी घेतली आहे. फोटोमध्ये उर्फी बाजूला बसलेल्या व्यक्तीच्या बोटावर काहीतरी घालताना दिसत आहे. फोटो पाहिल्यानंतर अनेकांनी अभिनेत्रीला शुभेच्छा देखील दिल्या आहेत.
Is @urf7i now engaged? New picture suggests the popular personality has gotten engaged through Hindu rituals.
.
.
.
.
.
.#uorfijaved #urfi #roka #urfijaved #engagement #rokaceremony #leaked pic.twitter.com/ztqoRrmSxu— Viral Bhayani (@viralbhayani77) October 3, 2023
एक नेटकरी उर्फीच्या फोटोवर कमेंट करत म्हणाला, ‘अभिनंदन…’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘दोघांना शुभेच्छा…’ तर तिसरा नेटकरी म्हणाला, ‘दोन्ही हातांनी आंगठी कोण घालतं…’ सध्या सर्वत्र उर्फी हिच्या व्हायरल होत असलेल्या फोटोंची चर्चा रंगली आहे. फोटो पाहून उर्फी हिने साखरपुडा उरकल्याची चर्चा रंगली आहे…
एवढंच नाही तर, अभिनेत्रीने साखरपुडा केला नसून, तिच्या आगामी सीरिजच्या शुटिंग दरम्यानचा फोटो असल्याचं देखील सांगण्यात येत आहे. यावर अद्याप उर्फी हिने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे उर्फी हिच्या वक्तव्यानंतर सत्य समोर येईल… शिवाय फोटोमध्ये दिसणार पुरुष कोण आहे? याबद्दल देखील कोणती माहिती मिळू शकलेली नाही.
उर्फी हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, मॉडेल कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. उर्फी जावेद हिला खरी ओळख बिग बॉस ओटीटीमध्ये मिळाली. आपल्या अतरंगी स्टाईलमुळे नेहमीच उर्फी जावेद ही वादाच्या मोठ्या भोवऱ्यात अडकत असते. उर्फी हिच्या फॅशन सेन्सचं समर्थन करणाऱ्यांची संख्या सुद्धा मोठी आहे. तर तिला ट्रोल करणाऱ्यांची संख्या देखील फार मोठी आहे.