Uorfi Javed | उर्फी जावेदने खास व्यक्तीला केलं किस, नवा कारनामा पाहून फॅन्स झाले अवाक्..

उर्फी जावेदचा नवा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये ती एका खास व्यक्तीला किस करताना दिसत आहे. त्यावर विविध कमेंट्स आल्या आहेत.

Uorfi Javed | उर्फी जावेदने खास व्यक्तीला केलं किस, नवा कारनामा पाहून फॅन्स झाले अवाक्..
Image Credit source: Twitter
| Updated on: Aug 18, 2023 | 3:07 PM

मुंबई | 18 ऑगस्ट 2023 : बोल्ड आऊटफिट असो किंवा बोल्ड वक्तव्यं, आपल्या बिनधास्त अंदाजामुळे उर्फी जावेद (Urfi Javed) नेहमी चर्चेत असते. सोशल मीडिया सेन्सेशन असणारी उर्फी नवनव्या वादात सापडते, ट्रोलही होते, पण तिला त्याने काहीच फरक पडत नाही. नवनव्या , अतरंगी पोशाखातील फोटो ती नेहमी सोशल मीडियावर शेअर करते, ज्याची बरीच चर्चा होते. आता तिचा एक नवा फोटो व्हायरल झाल्याने ती पुन्हा चर्चेत आली आहे.

या फोटोमध्ये उर्फी एका मुलीला किस (Kiss) करताना दिसत आहे. नेहमीप्रमाणे या फोटोमुळेही अनेकांनी उर्फीला ट्रोल करण्यास सुरूवात केली आहे. काही लोकं तर उर्फीच्या सेक्शुॲलिटीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. पण या ट्रोलिंगवर उर्फीने काहीच रिॲक्शन दिलेली नाही.

 

खरंतर उर्फीने नुकतंच तिच्या ट्विटर अकाऊंटवर आणि इन्स्टा स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती एका मुलीला किस (Kiss) करताना दिसत आहे. यामध्ये उर्फीचा चेहरा तर दिसत आहे, पण त्या मुलीचा चेहरा नीट दिस नाही. या फोटोत उर्फीने कोणताही अतरंगी ड्रेस नाही तर साधा, फुल स्लीव्हचा टॉप घातला असून दुसऱ्या मुलीने काळ्या रंगाचा स्लीव्हलेस ड्रेस घातला आहे. आणि तिचा केसांनी झाकला गेला आहे. त्या दोघीही एखाद्या हॉटेलच्या बाहेर उभ्या असलेल्या दिसत आहेत.

उर्फी जावेदचा हा फोटो पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. स्टायलिश आणि खुलवणाऱ्या कपड्यांऐवजी उर्फीचा साधा ड्रेस पाहून काही लोकांना आश्चर्य वाटले. तर काही लोकांनी मात्र मर्यादा ओलांडून उर्फीच्या सेक्शुॲलिटीवरही चर्चा सुरू केली. अनेकांनी उर्फीला बायसेक्शुअल ठरवले आहे. ट्रोल्सच्या या टीकेवर उर्फीकडून काहीच रिॲक्शन दिलेली नाही. फोटोमध्ये दिसणारी मुलगी ही उर्फीची बेस्ट फ्रेंड असल्याचे समजते.