Urfi Jawed: मी टाईम म्हणत उर्फी जावेदचा क्लबमध्ये डान्स ; video viral

उर्फीचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती एका क्लबमध्ये डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल भयानी या इंस्टाग्रामच्या पेजवर पोस्ट करण्यात आला आहे.

Urfi Jawed: मी टाईम म्हणत उर्फी जावेदचा क्लबमध्ये डान्स ; video viral
Urfi Jawed
Image Credit source: Instagram
| Updated on: Sep 18, 2022 | 1:47 PM

बिग बॉस फेम उर्फी जावेद(Urfi Jawed) नेहमीच चित्रविचित्र फॅशन व बोल्ड अंदाजासाठी ओळखली जाते. सोशल मीडियावर(Social Media) उर्फी सतत सक्रिय असलेली दिसून येते. एवढंच नव्हे तर तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. आता उर्फीचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  ज्यामध्ये ती एका क्लबमध्ये डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल भयानी या इंस्टाग्रामच्या (Instagram) पेजवर पोस्ट करण्यात आला आहे. तिच्या या डान्सवर चाहत्यांनी भरपूर कमेंट करत लाईक्सचा पाऊस पडला आहे.

किती प्रेम कराल पुणेकर…

या व्हिडिओमध्ये उर्फी पुण्यातील एका क्लबमध्ये डान्स करताना दिसून आली आहे. यावेळी उर्फीने लाईट हिरव्या रंगाच्या शॉर्ट ड्रेस परिधान केला होता. उर्फीचे चाहते मोठ्या संख्येने तिथे उपस्थित असलेले या व्हिडीओमध्ये दिसून येत आहेत. क्लबमध्ये उर्फीने बॉलिवूडच्या ‘इटस टाईम टू डिस्को’ गाण्यांवर जबरदस्त डान्स करताना दिसून आली आहे. यावेळी उर्फीने चाहत्यांसोबत पोझ देत फोटोही काढले.

उर्फीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर या लुकचे काही फोटोही शेअर केले आहेत. उर्फी हा व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिला आहे. ‘किती प्रेम कराल ‘ पुणेकर असे म्हणत तिने काही फोटोही आपल्या इंस्टाग्रामर शेअर केले आहेत. नेटकऱ्यांनी उर्फीला अनेकदा तिच्या कपड्यावरुन ट्रोल केले जाते. गेल्या काही दिवसांपूर्वी उर्फीला तिच्या कपड्यांवरून कमेंट करत तिला विचारले. यावरून ती चांगलीच संतापली होती. तिने त्या संबधीत पापाराझीला चांगलेच सुनावले होते. यांनतर तिने पुन्हा चाहत्यांची माफी मागितली होती .