AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG, Semi Final : अक्षर पटेल आणि शिवम दुबेने घेतलेला झेल ठरला टर्निंग प्वॉइंट, 14व्या षटकात घडलं असं

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताने इंग्लंडला 7 गडी राखून पराभूत केलं. यासह भारताने सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली आहे. खरं तर या हायस्कोअरिंग सामन्यात इंग्लंडने चांगली झुंज दिली. पण अक्षर पटेल आणि शिवम दुबेने घेतलेला झेल टर्निंग प्वाइंट ठरला.

IND vs ENG, Semi Final : अक्षर पटेल आणि शिवम दुबेने घेतलेला झेल ठरला टर्निंग प्वॉइंट, 14व्या षटकात घडलं असं
अक्षर पटेल आणि शिवम दुबेने घेतलेला झेल ठरला टर्निंग प्वॉइंट, 14व्या षटकात घडलं असंImage Credit source: BCCI Twitter
| Updated on: Mar 05, 2026 | 11:11 PM
Share

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताने धडक मारली आहे. उपांत्य फेरीत भारताचा सामना इंग्लंडशी झाला. इंग्लंडने नाणेफेकीचा कौल जिंकल्याने भारतीय क्रीडाप्रेमींच्या मनात भीतीचं वातावरण होतं. कारण या मैदानात आरामात धावांचा पाठलाग होतो, हे सर्वांना माहिती होती. पण संजू सॅमसनच्या 89 धावांच्या जोरावर भारताने 253 धावांपर्यंत मजल मारली आणि विजयासाठी 254 धावा दिल्या. यामुळे गोलंदाजांना थोडं बॅकअप मिळालं. कारण या खेळपट्टीवर 200 धावा आरामात गाठू शकतो अशी स्थिती आहे. इंग्लंडने अपेक्षेप्रमाणे धावांचा पाठलाग करण्यास सुरूवात केली. खरं तर एक वेळ अशी आली होती की भारताच्या हातून हा सामना वाळूसारखा निसटत आहे. त्यामुळे मैदानात भयाण शांतता होती. प्रत्येक चेंडूवर चौकार आणि षटकार बसतो अशी स्थिती होती. त्यामुळे इंग्लंडची धावगती वेगाने पुढे सरकत होती.

इंग्लंडकडून जेकॉब बेथेल आणि विल जॅक्स ही जोड जमली होती. ही जोडी फोडण्याचं मोठं आव्हान होतं. कारण इंग्लंडने 13 व्या षटकात 160 धावांचा पल्ला गाठला होता. पुढच्या 7 षटकात काय होईल याचा अंदाज क्रीडाप्रेमींना येत होता. त्यामुळे हळूहळू मैदानातील प्रेक्षक वर्ग शांत होत होता. काही जणांनी रक्तदाब वाढत असल्याने टीव्ही बंद केला होता. कर्णधार सूर्यकुमार यादवने 14वे षटक वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगकडे सोपवलं. या षटकात चमत्कार घडला. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर 2, तिसऱ्या चेंडूवर 0, चौथ्या चेंडूवर 2, पाचव्या चेंडूवर 1 धावा काढली. सहावा चेंडू टाकताना अर्शदीपने सलग तीन वाइड टाकले. त्यामुळे क्रीडाप्रेमींना गोलंदाजांवर किती प्रेशर आहे याचा अंदाज आला. अर्शदीपने चौथ्यांदा सहावा चेंडू टाकला आणि विल जॅक्स जोरात षटकाराच्या दिशेने मारला. पण अक्षर पटेल वाऱ्याच्या वेगाने धावत आला आणि चेंडू पकडून आत फेकला. हा झेल पकडण्यात शिवम दुबेने चूक केली नाही आणि विकेट मिळाली.

विल जॅक्सच्या बाद होणं किती महत्त्वाचं होतं याचा अंदाच प्रशिक्षक गौतम गंभीरच्या रिएक्शनवरून येतो. हा झेल पकडताच गौतम गंभीर टाळ्या वाजवत उभा राहिला. हा सामन्याचा टर्निंग प्वाइंट ठरला. कारण यानंतर धावगतीला ब्रेक मिळाला आणि टीम इंडियाने सामना सावरण्यास सुरुवात केली. शेवटच्या 30 धावांची आवश्यकता इंग्लंडला होती. पण इंग्लंडने 22 धावा केल्या आणि सामना 7 धावांनी गमावला.

Follow Us
मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर...अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा
Ambadas Danve | मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर... जरांगे पाटलांच्या खालावलेल्या प्रकृतीवर अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा
सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप
सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? रिसोडच्या तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप, नेमकं काय घडलं?
पेपर फोडून अधिकारी पैसे खातात, पण विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय?
Rohit Pawar On MPSC Pepar Leak | पेपर फोडून अधिकारी पैसे खातात, पण विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय? रोहित पवारांचा MPSC व्यवस्थेवर संताप
डीजे बंदीवरून राऊत आक्रमक! मुख्यमंत्री कुंपणावर बसून तमाशा पाहत आहेत
Sanjay Raut | डीजे बंदीवरून संजय राऊत आक्रमक! मुख्यमंत्री कुंपणावर बसून तमाशा पाहत आहेत म्हणत सरकारला घेरलं
आपली मुलं शिक्षण सोडून रस्त्यावर येत आहेत, हे सरकारचं अपयश! सुप्रिया स
MPSC | आपली मुलं शिक्षण सोडून रस्त्यावर येत आहेत, हे सरकारचं अपयश! सुप्रिया सुळे MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आक्रमक
15 दिवसांत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढा! सदावर्तेंचं ठाकरेंना आव्हान
Gunratna Sadavarte | 15 दिवसांत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढा! गुणरत्न सदावर्तेंचं उद्धव-राज ठाकरेंना थेट आव्हान; नाहीतर...
सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य
Nitin Gadkari On Matdar | सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य; राजकीय वर्तुळात चर्चा
लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा
मोठी बातमी! लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा; महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगर पुन्हा सक्रिय
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?