AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Thackeray: दिल्लीतील मोर्चा सारखं आमच्या मोर्चात केलं तर फटकावून काढेल; राज ठाकरेंचा इशारा

Raj Thackeray Warning: दिल्लीतील जंतरमंतर येथील कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात काही असामाजिक तत्त्व घुसरल्याचे दिसून आले. ते आंदोलन भडकवण्याचा आणि पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करत आहेत. या सर्व घडामोडींवर मुंबईतील मोर्चात असा कोणी प्रयत्न केल्यास त्यांना राज ठाकरे यांनी सज्जड दम दिला आहे.

Raj Thackeray: दिल्लीतील मोर्चा सारखं आमच्या मोर्चात केलं तर फटकावून काढेल; राज ठाकरेंचा इशारा
राज ठाकरेंचा इशारा
| Updated on: Jul 23, 2026 | 12:53 PM
Share

Raj Thackeray Warning: जंतरमंतर येथील कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलना आडून काही असामाजिक तत्व हे पोलिसांवर हल्ला करत आहेत. आंदोलन भडकवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. याविषयाकडे लक्ष वेधले असता २६ तारखेला असे कोणी घुसवण्याचा प्रयत्न केला तर फटकवून काढला. शांततेने मोर्चा होईल. कोणताही गोंधळ नसेल. इथे दिल्ली सारखं करण्याचा प्रयत्न केला तर आमचे लोकं सोडणार नाही, असा सज्जड दम मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी थोड्याच वेळापूर्वी पत्रकार परिषद घेत रविवारी 26 जुलै रोजी मुंबईत आंदोलनाची हाक दिली आहे.

आग भडकाऊ नका

देश भीतीच्या पलिकडे गेला आहे. काल मी विद्यार्थ्यांना भेटलो. मारो मारो म्हणणारा तो मुलगा नागपूरचा आहे. तो भेटला. तो म्हणाला मारून मारून काय करतील. असं जगून काय फायदा. मुलं भीतीच्या पलिकडे गेली आहेत. त्यांची मने तुम्ही नाही ओळखले. त्यांचे कपडे चेक करून काय करणार? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

२०१८ साली जेडी अग्रवाल नावाचे गृहस्थ उपोषणाला बसले होते. त्यांचा मृत्यू झाला. गंगा वाईट झाली. हे सरकार इतकं निर्दयी आहे. मी वांगचुक यांच्याशी बोललो होतो. त्यांना म्हटलं उपोषण सोडा. यांच्याकडे संवेदना नाहीये. सरकारला वाटतं ही माणसं गेलेली बरे. जबाबदार लोकांना सोडणार नाही, असं मोदी म्हणतं. मग धर्मेंद्र प्रधानही जबाबदार आहे. कारवाई करा. आग भडकवू नका. मुलांशी चर्चा करा. शांतता भंग करण्याचं काम सरकारने करू नये, असा इशारा ठाकरे यांनी दिला.

तर फटकवून काढणार

चर्चा आधीच करायला हवी होती. सुरुवातीला करायला हवी होती. हे झालं नसतं. आता आंदोलन घराघरात पोहोचलं. त्यामुळे सरकार बॅकफूटवर गेलं. शेतकरी आंदोलन झालं. तेव्हा त्यांना चर्चेला बोलावलं नव्हतं. कारण ते आंदोलन घराघरात गेलं नव्हतं. आता मात्र, त्यांच्या लक्षात आलंय आपल्या अंगलट आलं. त्यामुळे सारवासारव करत आहे. शेतकरी आंदोलन आणि मणिपूरच्यावेळी त्यांनी ट्विट केलं होतं का, असा सवाल राज ठाकरे यांनी केला. २६ तारखेला असे कोणी घुसवण्याचा प्रयत्न केला तर फटकवून काढणार. शांततेने मोर्चा होईल. कोणताही गोंधळ नसेल. इथे दिल्ली सारखं करण्याचा प्रयत्न केला तर आमचे लोकं सोडणार नाही, असा खणखणीत इशारा राज ठाकरे यांनी दिला.

विरोधात बोलले की राष्ट्रविरोधी

हा विषय मतपेटीचा नाही. हा न्यायाचा विषय आहे. विद्यार्थी आत्महत्या करत आहेत. समजून घ्या. इथे मतपेटीचा विषय येतो कुठे. ज्या प्रकारे सत्ता राबवली जाते त्याचा राग प्रत्येक राज्या राज्यातून बाहेर येतो ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. त्यांच्याविरोधात तुम्ही काहीही बोलला तर तुम्ही देशद्रोही असता. राष्ट्रविरोधी असता, असता असे राज ठाकरे म्हणाले.

Follow Us
राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी...
SMA | राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका!
अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी!
BJP VS Shiv Sena | अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी! शिवसेना-भाजप आमनेसामने
पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर..
MPSC Studant | पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर पडताच गाडीत कोंबलं; नेमकं काय घडलं?
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये; पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट समोर
जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल..
Vikhe Patil on Manoj Jarange | जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल आल्यानंतर...
मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा...
Mumbai | मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा-बिटरूट आणण्यास मनाई; मनसेचं माळा घेऊन आंदोलन
लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
Babasaheb Patil | अश्लीलता नेमकी कशाला म्हणायचं? लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
Jalna | जालन्यात मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली माहिती, तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर ठाकरे संतापले, म्हणाले..
Raj Thackeray | दादासाहेब फाळकेंच्या महाराष्ट्राला डावललं? राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर राज ठाकरे संतापले, म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट शेतात जाऊन...
शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट शेतात जाऊन...