AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uddhav- Raj Thackeray: मोठी बातमी, NEET पेपरफुटीविरोधात ठाकरे बंधूंचा एल्गार! 26 जुलैला मुंबईतून आंदोलनाची हाक

Thackeray Agitation on 26 July in Mumbai: ठाकरे बंधू रविवारी 26 जुलै रोजी सीजेपीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मैदानात उतरले आहे. मुंबईत रविवारी सकाळी आंदोलनाला सुरूवात होणार आहे. या आंदोलनात कोणत्याही पक्षाचे झेंडे नसतील असे स्पष्ट करण्यात आले आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्षही या मोर्चात दाखल होऊ शकतात.

Uddhav- Raj Thackeray: मोठी बातमी, NEET पेपरफुटीविरोधात ठाकरे बंधूंचा एल्गार! 26 जुलैला मुंबईतून आंदोलनाची हाक
राज ठाकरे - उद्धव ठाकरे, सीजेपी आंदोलन
| Updated on: Jul 23, 2026 | 12:27 PM
Share

Raj Thackeray – Uddhav Thackeray: कॉक्रोच जनता पार्टीच्या जंतरमंतरवरील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ठाकरे बंधू मैदानात उतरले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी 26 जुलै रोजी रविवारी आंदोलनाची हाक दिली आहे. मुंबईत हे आंदोलन होईल. या आंदोलनात महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षही सहभागी होण्याची शक्यता आहे. NEET पेपरफुटी, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याविरोधात या मोर्चात आवाज उठवण्यात येणार आहे. ठाकरे बंधुंनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी ही घोषणा केली.

शिवाजी पार्क ते सिद्धीविनायक मंदिरापर्यंत मोर्चा

आम्ही 26 तारखेला शक्तीप्रदर्शन मोर्चा या मुलांना घेऊन करायचं ठरवलं आहे. मुंबईतही ही सर्व मुले एकत्र येत आहेत. आपला राग रोष व्यक्त करत आहेत. हे केंद्रालाही कळणं गरजेचं आहे. 26 तारखेला रविवारी सकाळी आम्ही मोर्चा काढत आहोत. शिवाजी पार्क ते सिद्धीविनायक मंदिरापर्यंत मोर्चा जाईल, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. तर देवाला साकडं घालणार आहोत. सरकारला सुबुद्धी मिळो असं साकडं घालू. तिथे मोर्चाची सांगता होईल, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

देशभरात राग आहे

शेतकरी आंदोलनावेळीही ते भेटायला तयार नव्हते. मणिपूरच्यावेळीही तेच झालं. आताही तेच होतं. ही कोणती सत्ता कोणत्या सत्तेचा माज. ही मुलं काय मागत होती. नीटसाठी किती त्रास होतो हे त्या मुलांना विचारा. मी पूर्वीच मोदींना बोललो होतो नीटबाबत. आज शेतकरी आत्महत्या करत आहेत. उद्या मुलं आत्महत्या करतील हे सांगितलं होतं. माझा जुना व्हिडिओ आहे. आज तेच झालं. आज सिस्टिमच्या विरोधातील राग आहे. देशात जे काही सुरू आहे त्याविरोधातील राग आहे. आज प्रत्येक घरातील ज्यांची मुले परीक्षेला बसलेली नाही त्या आया आणि वडिलांनाही त्रास होतो, असे राज ठाकरे म्हणाले.

हा उद्दामपणा कशासाठी? राज ठाकरेंचा सवाल

मुंबईवरील हल्ल्यानंतर बडे बडे शहरो में ऐसी घटना होती है असं आर. आर. पाटील म्हणाले होते तेव्हा त्यांचा राजीनामा घेतला गेला, याची आठवण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी करून दिली. त्यामुळे या प्रकरणात तुम्हीच जबाबदारी घेतली पाहिजे. हीच मागणी मुलांची आहे. तिसऱ्यांदा पेपर फुटले होते. आम्ही केंद्रीय पद्धतीने परीक्षा घेऊ नका म्हटलं होतं. पण त्यावेळी सत्तेमुळे त्यांची ऐकण्याची तयारी नव्हती. आजही नाही. प्रधानांच्या राजीनाम्यापुरती गोष्ट मर्यादित राहिली नाही. ती पंतप्रधान आणि गृहखात्यांपर्यंत गेली. मोदींनी आज ट्विट केलं. त्याला काही अर्थ नहाी. या मुलांना बोलवून चर्चा केली असती. प्रकरण समजून घेतलं असतं तर एवढं प्रकरण झालं नसतं. सत्तेचा उद्दामपणा कशासाठी आहे, असा सवालही राज ठाकरे यांनी केला.

Follow Us
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच