कोयना जलाशयात सांबर आणि त्याच्या पिल्लाचे ‘स्विमिंग’; पर्यटकांच्या कॅमेऱ्यात दृश्य कैद
निसर्गातील प्राणी आणि मानव यांच्यातील अंतर आता वाढत्या शहरीकरणाने कमी होत चालाले आहे. अनेकदा प्राणी मानवी हद्दीत शिरतात त्यामुळे एकच गोंधळ केला जात असतो. खरे तर आपणच त्याच्या अधिवासात शिरलेलो असतो.

सातारा: सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोनलगत कोयना जलाशयात एक सांबर (मादी) आपल्या पिलांसह पोहताना आढळून आली आहे. वासोटा किल्ल्याच्या नजीक बोटिंगदरम्यान पर्यटकांना सांबरांच्या पोहण्याचे हे अनोखे दृश्य पाहायला मिळाले.पर्यटकांनी या घटनेचा व्हिडिओ आपल्या कॅमेऱ्यात कैद केला असून, तो सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. दरम्यान पर्यटन आणि वन्यजीव संरक्षण यामध्ये योग्य समन्वय राखण्याचे आव्हान सह्याद्री व्याघ्र प्रकल्पासमोर आहे. सध्या वन्यजीवांचा विणीचा हंगाम सुरू असल्याने त्यांच्या हालचालींमध्ये वाढ झाली असण्याची शक्यता वन्यजीव अभ्यासकांतून व्यक्त केली जात आहे.
सातारा येथील कोयना जलाशयात बोटिंग करायला परवानगी दिली आहे. परंतू यामुळे निसर्ग आणि मानव यांच्यात योग्य समन्वय राखण्याचे आव्हान सह्याद्री व्याघ्र प्रकल्पासमोर आहे. येथील कोयना जलाशयात बोटिंग करताना पर्यटकांनी एक सांबर माता आणि तिची पिल्ले पाण्यातून मार्गक्रमण करतांना दिसली. या सांबराने मान तेवढी श्वास घेण्यासाठी पाण्याच्या बाहेर काढली असल्याचे दिसत आहे. अनेकदा प्राण्यांचे कळप पाण्यातून अशा प्रकारे पोहत पलिकडचा किनारा गाठत असतात. ही त्यांची अत्यंत नैसर्गिक प्रक्रिया असून त्यांचे जीवन जगण्यासाठी त्यांना मिळालेली निसर्ग दत्त देणगी आहे. नील गाय तसेच म्हशी किंवा गवे देखील अशा प्रकारे पाण्यातून पोहत किनारा गाठत असतात. माथेराण येथील तलावात अनेकदा म्हशींचे कळप पोहत किनारा गाठताना दिसत असतात. सुरुवातीला त्यांची केवळ शिंगे दिसतात नंतर त्यांचा कळप निदर्शनाश येतो.
सातारा हे सह्याद्रीच्या कुशीत वसलेले ठिकाण असून येथे कास पठारावर फुललेली पाहण्यासाठी जगभरातून लोक येत असतात. कास पठाराची नोंदणी जागतिक वारसा स्थळात करण्यात आली आहे. मात्र आता तेथील शहरीकरण मानवी वावरामुळे फुलांचा बहर कमी होत चालला आहे. कोयना जलाशयाला देखील पर्यटनासाठी वापर करताना तेथील संरक्षित प्राण्याचे अधिवासाला धक्का पोहचता कामा नये असे या सांबराच्या व्हिडीओ चित्रीत केल्याने म्हटले जात आहे.
