AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Thackeray-Uddhav Thackeray : पोलिसांचा प्रताप ! विद्यार्थ्यांच्या खिशात ड्रग्स टाकण्याची धमकी; राज ठाकरेंचा मोठा इशारा

Raj Thackeray-Uddhav Thackeray : मुंबईत आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली."सरन्यायाधीशांमुळे झुरळ सुरु झालं. त्यांनी जन्म दिल्यानंतर या मुलाकडे बघायला नको का?. महाराष्ट्र पोलीस आंदोलनकर्त्यांना सहकार्य करतायत" असं राज ठाकरे म्हणाले.

Raj Thackeray-Uddhav Thackeray : पोलिसांचा प्रताप ! विद्यार्थ्यांच्या खिशात ड्रग्स टाकण्याची धमकी; राज ठाकरेंचा मोठा इशारा
Uddhav Thackeray-Raj Thackeray
| Updated on: Jul 23, 2026 | 12:54 PM
Share

मुंबईत आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. येत्या 26 जुलैला रविवारी दोन्ही ठाकरे बंधु मोर्चा काढणार आहे. शिवाजी पार्क ते सिद्धविनायक मंदिर हा मोर्चा निघणार आहे. या पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरे यांनी त्यांच्याकडे एक व्हायरल व्हिडिओ आलाय. त्याचा किस्सा सांगितला. “सरन्यायाधीशांमुळे झुरळ सुरु झालं. त्यांनी जन्म दिल्यानंतर या मुलाकडे बघायला नको का?. महाराष्ट्र पोलीस आंदोलनकर्त्यांना सहकार्य करतायत” असं राज ठाकरे म्हणाले. त्यानंतर त्यांनी व्हायरल व्हिडिओचा किस्सा सांगितला. “पोलीस आयुक्तांना पाठवतो. मुलं टॅक्सीने चालली होती. पोलीस म्हणतात 50 ग्रॅम पावडर टाकेन. हा पोलीस ड्रग्स सप्लायर आहे का. पोलिसांकडे पावडर मिळायला लागली का. हे काय चाललं ते कळतंच नाही. पेपरफुटीला जबाबदार असतील त्यांचा राजीनामा घ्या. परत होणरा नाही याची शाश्वती द्यावी. त्यानंतर हे प्रकरण झालंच नसतं” असं राज ठाकरे म्हणाले.

“भाजप आजवर काय करत आलं. काँग्रेसच्या काळातही आंदोलन झाली. ते तसे होते म्हणून भाजपला आणलं. हेही तसे. अण्णांच्या टोप्या घालून तुम्हीच फिरत होता ना. यांच्या गडबडी काढल्या तर राजकारण करता म्हणतात” असं राज ठाकरे म्हणाले.

पालकांनीही या मोर्चात यावं

“सकाळी 10ची जमायची वेळ आहे. साधारण 11 साडे अकराला मोर्चा निघेल. आम्हाला धरपकड आणि नोटिशीची सवय आहे. प्रश्न सोडवायचा आहे की चिघळवायचा आहे हे सरकारने पहावं. वंचित बंद पुकारणार हे माहीत नव्हतं. त्यांनी स्वतंत्रपणे केलं आहे. आम्ही मोर्चा काढताना आमच्याकडे राजकीय पक्षाचे झेंडे नसतील. केवळ तिरंगा झेंडे असतील. काँग्रेसशी बोलणं सुरू आहे.विद्यार्थ्यांबरोबर पालकांनीही या मोर्चात यावं” असं राज ठाकरे म्हणाले.

त्याचा राग प्रत्येक राज्या राज्यातून बाहेर येतो

“हा विषय मतपेटीचा नाही. हा न्यायाचा विषय आहे. विद्यार्थी आत्महत्या करत आहेत. समजून घ्या. इथे मतपेटीचा विषय येतो कुठे. ज्या प्रकारे सत्ता राबवली जाते त्याचा राग प्रत्येक राज्या राज्यातून बाहेर येतो. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. त्यांच्याविरोधात तुम्ही काहीही बोलला तर तुम्ही देशद्रोही असता.राष्ट्रविरोधी असता” असं राज ठाकरे म्हणाले.

Follow Us
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांना दिलासा की धक्का? वसंत डावखरे प्रकरणी...
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांना दिलासा की धक्का? वसंत डावखरे प्रकरणी नेमकं काय घडणार?
अमृता फडणवीसांकडून मनोज जरांगेंना जेवणाचं आमंत्रण; म्हणाल्या, माझे भाऊ
अमृता फडणवीसांकडून मनोज जरांगेंना जेवणाचं आमंत्रण; म्हणाल्या, माझे भाऊ...
पीएमओ बनावट ओळखपत्र प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपीच्या वडिलांचा थेट...
पीएमओ बनावट ओळखपत्र प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपीच्या वडिलांचा धक्कादायक प्रकार
अमित ठाकरे यांच्या कृतीवर भाजप आक्रमक, कल्याण सभा दिवसभर तहकूब
अमित ठाकरे यांच्या कृतीवर भाजप आक्रमक, कल्याण सभा दिवसभर तहकूब
बुलढाण्यात भाजप-शिवसेनेचा संघर्ष पेटला, थेट आमनेसामने...
Sanjay Gaikwad : बुलढाण्यात भाजप-शिवसेनेचा संघर्ष पेटला, थेट आमनेसामने...
व्यवस्थेविरुद्ध एकत्र लढा; प्रथमेशच्या घटनेनंतर अभिजीत दीपकेंचं मोठं..
व्यवस्थेविरुद्ध एकत्र लढा; प्रथमेशच्या घटनेनंतर अभिजीत दीपकेंचं मोठं आवाहन, आता...
राष्ट्रवादी पक्षाच्या विलिनीकरणाबाबत... दत्ता भरणेंनी स्पष्ट केली पक्ष
राष्ट्रवादी पक्षाच्या विलिनीकरणाबाबत... दत्ता भरणेंनी स्पष्ट केली पक्षाची भूमिका
पार्थ पवारांच्या भूमिकेवर मुंबई हायकोर्टाचे मोठं स्पष्टीकरण; मुंडवा...
पार्थ पवारांच्या भूमिकेवर मुंबई हायकोर्टाचे मोठं स्पष्टीकरण; मुंडवा गैरव्यवहार प्रकरणाला नवे वळण
केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकी सर्वात मोठा निर्णय; देशातील प्रमुख...
केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकी सर्वात मोठा निर्णय; देशातील प्रमुख महानगरांना जोडणाऱ्या रेल्वे नेटवर्कला मंजुरी
माझे कान 40 टक्के तर डीजेच्या आवाजामुळे खराब झाले; गुलाबराव पाटील....
माझे कान 40 टक्के तर डीजेच्या आवाजामुळे खराब झाले; गुलाबराव पाटलांच्या भाषणाची तुफान चर्चा