AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुरुंगात महिला कैद्यांवर होते बळजबरी? लेस्बियन महिलांना मारहाण; प्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा…

प्रसिद्ध अभिनेत्री मनी लॉन्ड्रींग प्रकरणात तब्बल चार महिने तुरुंगवास भोगला. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर अभिनेत्री तुरुंगातील वातावरण कसं असतं यावर मोठा खुलासा केला. सध्या सर्वत्र अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे.

तुरुंगात महिला कैद्यांवर होते बळजबरी? लेस्बियन महिलांना मारहाण; प्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा...
| Updated on: Sep 09, 2026 | 11:29 PM
Share

झगमनत्या विश्वातील सेलिब्रिटी कायम त्याच्या रॉयल आणि आलिशान लाईफस्टाईलमुळे चर्चेत असतात. पण कधीतरी त्यांच्या आयुष्यात एक भयानक वळण येतं आणि सर्वकाही होत्याचं नव्हतं होतं. असंच काही एक प्रसिद्ध अभिनेत्री आणि सोशल मीडिया स्टारमुळे झालं आहे. अभिनेत्री मनी लॉन्ड्रींग प्रकरणात तब्बल चार महिने तुरुंगवास भोगला. तेव्हा तुरुंगात अभिनेत्रील अनेक भयानक परिस्थितीचा सामना करावा लागला. एका मुलाखतीत अभिनेत्रीला तुरुंगात महिलांवर बळजबरी होता का? असा प्रश्न विचारण्यात आला? यावर मोठा खुलासा करत अभिनेत्री लेस्बियन महिलांबद्दल देखील मोठं वक्तव्य केलं.

सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे, ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री संदीपा विर्क आहे. सांगायचं झालं तर, संदीपा विर्कला मनी लाँड्रिंगच्या एका प्रकरणात काही महिने तुरुंगवास भोगावा लागलेला. पण एका पॉडकास्टमध्ये संदीपाने तिहार तुरुंगातील वास्तव सांगितलं. तिथे समलिंगी संबंध म्हणजे लेस्बियन रिलेशनशिप्स होतात का? असं विचारलं असता अभिनेत्री काय म्हणाली ते जाणून घ्या.

अभिनेत्री म्हणाली, “महिलांच्या तुरुंगात लैंगिक संबंध ठेवण्यासाठी कोणावरही सक्ती केली जात नाही. मात्र, तिहार तुरुंगातील समलिंगी लैंगिक संबंधांबद्दल मी खूप काही ऐकलं आहे. तिथे अनेक महिला वर्षानुवर्षे राहत आहेत; जर एखादी महिला समलिंगी संबंधांकडे वळली, तर वॉर्डन येऊन तिला लाठीने मारहाण करते.”

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘जर कोणती महिला समलिंगी आहे, तर त्यावर काय करणार. मी लेस्बियन कायद्याचं समर्थन करत नाही. पण कोणाला एखाद्या गोष्टीमध्ये आनंद मिळत असेल तर, त्यामध्ये वाईट काय आहे …’ संदीपाने सांगितल्यानुसार, तुरुंगातील भारतीयांवर अत्याचार केले जातात, तर नायजेरियन कैद्यांना मात्र त्यांच्या गरजेच्या सर्व गोष्टी मिळतात.

नायजेरियन कैद्यांबद्दल अभिनेत्री म्हणाली, ‘तुरुंगातील महिला अधिकारीही त्या नायजेरियन कैद्यांना घाबरतात. त्यांना त्यांची भीती वाटते. अशात, ते त्यांचा सर्व राग केवळ आमच्यावरच काढतात.” या मुलाखतीत संगीता विर्क हिने तुरुंगातील निकृष्ट दर्जाचे अन्न आणि अस्वच्छ शौचालयांबद्दलही मोठा खुलासा केला. परिस्थिती इतकी बिकट होती की, अभिनेत्रीने आयुष्यात टोकाचा निर्णय घेण्याचा देखील विचार केलेला.

Follow Us
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांना दिलासा की धक्का? वसंत डावखरे प्रकरणी...
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांना दिलासा की धक्का? वसंत डावखरे प्रकरणी नेमकं काय घडणार?
अमृता फडणवीसांकडून मनोज जरांगेंना जेवणाचं आमंत्रण; म्हणाल्या, माझे भाऊ
अमृता फडणवीसांकडून मनोज जरांगेंना जेवणाचं आमंत्रण; म्हणाल्या, माझे भाऊ...
पीएमओ बनावट ओळखपत्र प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपीच्या वडिलांचा थेट...
पीएमओ बनावट ओळखपत्र प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपीच्या वडिलांचा धक्कादायक प्रकार
अमित ठाकरे यांच्या कृतीवर भाजप आक्रमक, कल्याण सभा दिवसभर तहकूब
अमित ठाकरे यांच्या कृतीवर भाजप आक्रमक, कल्याण सभा दिवसभर तहकूब
बुलढाण्यात भाजप-शिवसेनेचा संघर्ष पेटला, थेट आमनेसामने...
Sanjay Gaikwad : बुलढाण्यात भाजप-शिवसेनेचा संघर्ष पेटला, थेट आमनेसामने...
व्यवस्थेविरुद्ध एकत्र लढा; प्रथमेशच्या घटनेनंतर अभिजीत दीपकेंचं मोठं..
व्यवस्थेविरुद्ध एकत्र लढा; प्रथमेशच्या घटनेनंतर अभिजीत दीपकेंचं मोठं आवाहन, आता...
राष्ट्रवादी पक्षाच्या विलिनीकरणाबाबत... दत्ता भरणेंनी स्पष्ट केली पक्ष
राष्ट्रवादी पक्षाच्या विलिनीकरणाबाबत... दत्ता भरणेंनी स्पष्ट केली पक्षाची भूमिका
पार्थ पवारांच्या भूमिकेवर मुंबई हायकोर्टाचे मोठं स्पष्टीकरण; मुंडवा...
पार्थ पवारांच्या भूमिकेवर मुंबई हायकोर्टाचे मोठं स्पष्टीकरण; मुंडवा गैरव्यवहार प्रकरणाला नवे वळण
केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकी सर्वात मोठा निर्णय; देशातील प्रमुख...
केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकी सर्वात मोठा निर्णय; देशातील प्रमुख महानगरांना जोडणाऱ्या रेल्वे नेटवर्कला मंजुरी
माझे कान 40 टक्के तर डीजेच्या आवाजामुळे खराब झाले; गुलाबराव पाटील....
माझे कान 40 टक्के तर डीजेच्या आवाजामुळे खराब झाले; गुलाबराव पाटलांच्या भाषणाची तुफान चर्चा