Urmila Matondkar: लग्नाच्या 8 वर्षांनंतर उद्ध्वस्त होणार उर्मिलाचा संसार, नवऱ्याला देणार घटस्फोट!

Urmila Matondkar: उर्मिला मातोंडकर हिचं वैवाहिक आयुष्य कायद्याच्या कचाट्यात, लग्नाच्या 8 वर्षांनंतर मोडणार संसार, होणार घटस्फोट... काय आहे प्रकरण? सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त उर्मिला मातोंडकर हिच्या खासगी आयुष्याची चर्चा...

Urmila Matondkar: लग्नाच्या 8 वर्षांनंतर उद्ध्वस्त होणार उर्मिलाचा संसार, नवऱ्याला देणार घटस्फोट!
| Updated on: Sep 25, 2024 | 8:34 AM

झगमगत्या विश्वात घटस्फोट आता सामान्य गोष्ट झाली आहे. आता अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) हिने देखील पती मोहसिन अख्तर मीर (Mohsin Akhtar Mir) याच्यापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. अभिनेत्रीने लग्नाच्या 8 वर्षांनंतर घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे. उर्मिला हिचं वैवाहिक आयुष्य आता कायद्याच्या कचाट्यात अडकलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्रीने मुंबई न्यायालयात घटस्फोटाची याचिका दाखल केली आहे. अशा परिस्थितीत उर्मिला मातोंडकरचा हा घटस्फोट परस्पर संमतीने होत नसल्याची माहिती देखील समोर येत आहे.

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त उर्मिलाच्या घटस्फोटाची चर्चा सुरु आहे. पण यामागचं नक्की कारण अद्याप समोर आलेलं नाही. अभिनेत्रीने देखील यावर अधिकृत वक्तव्य केलेलं नाही. सर्व बाजूंनी विचार केल्यानंतर उर्मिला हिने घटस्फोटाचा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे.

सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या घटस्फोटाची चर्चा रंगली आहे. पण उर्मिला आणि मोहसिन अख्तर मीर यांनी घटस्फोटाचा निर्णय का घेतला… याचं कारण समोर येऊ शकलेलं नाही. मात्र घटस्फोट परस्पर अटींवर होत नसल्याचे बोलले जात आहे. अभिनेत्रीच्या घटस्फोटाबद्दल कळल्यानंतर चाहत्यांना देखील धक्का बसला आहे.

 

 

उर्मिला आणि मोहसिन अख्तर मीर यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, एका कॉमन मित्रामुळे दोघांची ओळख झाली. पहिल्या ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर उर्मिला आणि मोहसिन अख्तर मीर यांनी 4 फेब्रुवारी 2016 मध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला.

उर्मिला आणि मोहसिन अख्तर मीर यांच्या लग्नाची चर्चा देखील तुफान रंगली आहे. कारण उर्मिला हिंदू तर मोहसिन अख्तर मीर आहे… एवढंच नाही तर, दोघांमध्ये 10 वर्षाचं अंतर आहे. उर्मिला तिच्या नवऱ्यापेक्षा 10 वर्ष मोठी आहे. उर्मिला आणि मोहसिन अख्तर मीर यांनी कुटुंबिय आणि खास मित्रांच्या उपस्थितीत लग्न केलं. दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ देखील तुफान व्हायरल झाले होते.

उर्मिला आणि मोहसिन अख्तर मीर यांची पहिली भेट

उर्मिला आणि मोहसिन अख्तर मीर यांचं नातं आता घटस्फोटापर्यंत पोहोचलं आहे. 2014 मध्ये उर्मिला आणि मोहसिन अख्तर मीर यांची पहिली भेट बॉलिवूडचा प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा याच्या भाचीच्या लग्नात झाली होती. पहिल्या भेटीनंतर दोघांनी एकमेकांना 2 वर्ष डेट केलं. त्यानंतर उर्मिला आणि मोहसीन यांनी अमृतसरच्या सुवर्ण मंदिराला भेट दिली, त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण आता दोघांचा संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.