
मुंबई : उर्फी जावेद ही कधी कशाचा ड्रेस तयार करून घालेल हे सांगणे थोडेसे अवघडच आहे. उर्फी जावेद (Urofi Javed) हिच्या डोक्यामध्ये खतरनाक कल्पना येतात. काही दिवसांपूर्वी चक्क काचेच्या तुकड्यांचा ड्रेस (Dress) तयार करून तिने घातला होता. त्यापूर्वी उर्फी हिने पिझ्झाची बिकिनी घातली आहे. आपल्या या अतरंगी स्टाईल आणि कपड्यांमुळे उर्फी जावेद ही कायमच सोशल मीडियावर (Social media) नेटकऱ्यांच्या निशाण्यावर असते. सतत लोक उर्फी जावेद हिच्यावर टिका करताना दिसतात. इतकेच नाही तर काही दिवसांपूर्वीच बीजेपीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी तर उर्फी जावेद हिच्या विरोधात थेट पोलिसांमध्ये धाव घेतली होती. नेहमीच उर्फी जावेद तिच्या कपड्यांमुळे वादात अडकते.
ईदच्या दिवशी चक्क बिकिनी लूकमधील काही फोटो आणि व्हिडीओ हे उर्फी जावेद हिने सोशल मीडियावर शेअर केले होते. ज्यानंतर उर्फी जावेद हिला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले गेले. अनेकांनी किमान आजच्या दिवशी तरी अशा प्रकारचे फोटो शेअर करायला नको होते हे म्हटले. उर्फी जावेद ही सोशल मीडियावर देखील कायमच सक्रिय असते.
भलेही लोक उर्फी जावेद हिला सोशल मीडियावर तिच्या कपड्यांसाठी ट्रोल करतात. मात्र, सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंगही उर्फी जावेद हिची बघायला मिळते. बऱ्याच वेळा बोल्ड फोटो आणि व्हिडीओ शेअर केल्यामुळे ट्रोल करत लोक उर्फी जावेद हिला चप्पलने आणि बुटने मारण्याचे भाष्य करताना दिसतात.
जे लोक ट्रोल करत उर्फी जावेद हिला चप्पल आणि बुटाने मारण्याची धमकी देतात. अशांना चांगलेच उत्तर हे आता उर्फी जावेद हिने दिले आहे. नुकताच उर्फी जावेद हिने एक व्हिडीओ हा सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना मोठा धक्का बसलाय. या व्हिडीओमध्ये परत एकदा अतरंगी लूकमध्ये उर्फी जावेद ही दिसली आहे.
या व्हिडीओमध्ये चक्क बुटाचा ड्रेस हा उर्फी जावेद हिने घातल्याचे दिसत आहे. इतकेच नाही तर तिने दोन बुट देखील हातामध्ये घेतल्याचे दिसत आहे. उर्फी जावेद हिला चक्क बुटापासून तयार करण्यात आलेल्या ड्रेसमध्ये पाहून चाहत्यांनाही मोठा धक्का बसल्याचे दिसत आहे. या लूकमध्ये उर्फी जावेद ही अत्यंत बोल्ड दिसत असून आता याचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत.