
बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या त्यांच्या चित्रपट कारकिर्दीपेक्षा, कामापेक्षा, त्यांची फॅशन, स्टाईल आणि ड्रेसिंग सेन्समुळेच जास्त चर्चेत येतात. उर्वशी रौतेला ही त्यांच्यापैकीच एक अभिनेत्री. बॉलिवूडची “फॅशन क्वीन” मानली जाणारी ही सौंदर्यवती अनेकदा तिची स्टेटमेंट्स आणि बोल्ड लूकमुळे प्रसिद्धी मिळवते, लाइमलाइटमध्ये असते. आता ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. उर्वशीच्या नव्या आणि बोल्ड लूकने ऑनलाइन धुमाकूळ माजवला आहे. महागडे पोशाखा, आणि आलिशान जीवनशैलीमुळे अनेकदा चर्चेत राहणाऱ्या या अभिनेत्रीने यावेळी साडी नेसण्याची पद्धत पूर्णपणे बदलली आहे.
उर्वशीने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला होता. तिच्या या लेटेस्ट व्हिडिओमध्ये, उर्वशीने अतिशय सुंदर अशी बनारसी साडी नेसली आहे, पण साडीपेक्षाही सगळ्यात चर्चेत आहे तो तिचा नो ब्लाऊज लूक. यामध्ये तिने ब्लाऊज शिवायच साडी नेसली असून ती स्टायलिशपणे तिची टोन्ड बॅक आणि रुबी नेकलेस फ्लॉन्ट करताना दिसत्ये. या नवीन आणि हॉट फोटोशूटवर अनेकांनी तिचं कौतुक केलं आहे.
उर्वशीचा ‘नो-ब्लाउज’ एक्सपेरिमेंट
निळसर रंगाची, अतिशय सुंदर साडी , केसांची आकर्षक हेअरस्टाईल असा उर्वशीचा सुंदर लूक आहे. पण यात पटकन लक्ष वेधलं जातं ते तिच्या नो ब्लाऊज लूकमुळे आणि तिने पाठीवर घातलेल्या नेकलेसकडे. तिने साडी इतक्या स्टायलिश पद्धतीने नेसली की ती एकदम हॉट आणि क्लासी दिसत होती. व्हिडिओमध्ये, उर्वशीने निळ्या आणि सोनेरी रंगाची बनारसी सिल्क साडी परिधान केली होती ज्यामध्ये सोनेरी धाग्यांचा वापर करून फुलांचं भरतकाम करण्यात आलं होतं.उर्वशीने तिची साडी उलटा पल्लू स्टाईलमध्ये नेसली होती. व्हिडिओमध्ये ती तिची पाठ उघडी ठेवून पोज देताना दिसत आहे. तिचा लूक खूपच ग्लॅमरस दिसत होता.
बॅकलेस लूक आणि रूबी नेकलेस
खरंतर आपण एखादी ज्वेलरी, हार घालतो तो गळ्याच्या पुढच्या बाजूला असतो. परंतु उर्वशीने एक अनोखा लूक निवडला आहे. अतिशय मौल्यवान माणिक आणि हिऱ्याचा हार उर्वशीने घातला, पण तो गळ्याच्या पुढच्या बाजूला नव्हे तर तो तिच्या पाठीवर रुळत होता. लाल स्टोन्स आणि हिऱ्यांनी जडवलेला हा हार तिच्या पाठीचे सौंदर्य आणखी वाढवत होता. एवढंच नव्हे तर तिने मॅचिंग कानातले देखील घातले होते, ज्यामुळे तिच्या चेहऱ्यावरील चमक आणखी वाढली होती.
तिचा हा सुंदर लूक पूर्ण करण्यासाठी, उर्वशीने तिचे केसांचा हाय बन घातला आणि त्यावर पांढरी फुलं माळली होतीय. या विंटेज स्टाईलने तिचा रॉयल लूक वाढवला. मेकअपसाठी, तिने तिच्या पोशाखावर आणि दागिन्यांवर लक्ष केंद्रित करून, ड्यूई बेस, विंग्ड आयलाइनर आणि न्यूड लिपस्टिक निवडली. तिच्या या व्हिडीोवर हजारो लाईक्स आले असून अनेकांनी कमेंट करत तिच्या स्टाईलचे कौतुकही केलं.