Photo : बँकेत नोकरी करुन 4000 रुपये कमवायचा, आता कर्तृत्वाने घराघरात मिळालीय बाघाला ओळख

मालिकेत दिसणारं प्रत्येक पात्र स्वत:मध्ये खास आहे आणि त्यातील एक म्हणजे 'बाघा'. जो जेथलाल चंपकलाल गढा यांच्या दुकानात काम करतो. (Used to earn Rs. 4000 by working in a bank, Bagha from 'Tarak Mehta Ka Ooltah Chashmah')

| Edited By: | Updated on: Jun 06, 2021 | 12:16 PM
1 / 6
टीव्हीचा सर्वात आवडता आणि प्रसिद्ध टीव्ही शो 'तारक मेहता का उलटा चश्मा' ही मालिका वर्ष 2008 मध्ये सुरू झाली आणि ही मालिका 13 वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.

2 / 6
मालिकेत दिसणारं प्रत्येक पात्र स्वत:मध्ये खास आहे आणि त्यातील एक म्हणजे 'बाघा'. जो जेथलाल चंपकलाल गढा यांच्या दुकानात काम करतो. बाघाची भूमिका साकारणार्‍या अभिनेत्याचं खरे नाव तन्मय वेकारिया आहे. मालिकेमधील बाघाच्या भूमिकेला खूप पसंती मिळाली आहे.

3 / 6
तन्मय वेकारिया हे गुजरातचे आहेत. त्यांचे वडील अरविंद वेकरिया देखील अभिनेते आहेत आणि त्यांनी अनेक गुजराती नाटकांमध्ये काम केलं. मिळालेल्या माहितीनुसार, तन्मयनं सुमारे 15 वर्ष गुजराती रंगभूमीमध्ये काम केलं आहे.

4 / 6
तन्मय वेकरियाच्या भूमिकेबद्दल बोलायचं झालं तर त्यांना शोमध्ये बाघाची भूमिका सहज मिळाली नाही, त्याआधी त्यांनी शोमध्ये आणखी चार पात्र साकारले आहेत ज्यात ऑटो चालक, टॅक्सी ड्रायव्हर, इन्स्पेक्टर आणि शिक्षक यांची भूमिका आहे. यानंतर बाघाचं पात्र वर्ष 2010 मध्ये मालिकेत आलं होतं, त्यानंतर त्यांना सतत प्रेक्षकांचं प्रेम मिळत आहे.

5 / 6
तन्मय पूर्वी एका बँकेत नोकरी करत होते. या नोकरीसाठी त्यांना मासिक 4000 रुपये पगार मिळायचा. मात्र तन्मयचे वडील एक अभिनेते होते, म्हणून तन्मयलासुद्धा नेहमीच अभिनेता व्हायचे होते आणि म्हणूनच त्यांनी अभिनयात नशीब आजमावलं आणि आज ते एक सुप्रसिद्ध नाव आहेत.

6 / 6
तन्मयनं यापूर्वी ‘घर घर नी वात’ या गुजराती विनोदी नाटकात काम केले होते. याशिवाय सन 2017  मध्ये प्रदर्शित झालेल्या 'चक्र टाइम स्लॉट' या चित्रपटात ते दिसले होते.