Vaishali Takkar: वैशाली ठक्कर आत्महत्येप्रकरणी ‘हा’ अभिनेता बनणार मुख्य साक्षीदार?

| Updated on: Oct 21, 2022 | 6:04 PM

"मी पोलिसांना सर्वकाही सांगेन"; वैशालीच्या आत्महत्येप्रकरणी होणार महत्त्वपूर्ण खुलासे?

Vaishali Takkar: वैशाली ठक्कर आत्महत्येप्रकरणी हा अभिनेता बनणार मुख्य साक्षीदार?
वैशाली ठक्कर, निशांत
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई- टीव्ही अभिनेत्री वैशाली ठक्कर (Vaishali Thakkar) आत्महत्या प्रकरणात दररोज कोणता ना कोणता खुलासा होतोय. या प्रकरणात राहुल नवलानी (Rahul Navlani) आणि त्याची पत्नी दिशाचं नाव समोर आलं होतं. वैशालीने तिच्या सुसाईड नोटमध्ये या दोघांच्या नावाचा उल्लेख केला होता. यानंतर दोघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी राहुलला अटकसुद्धा केली, मात्र त्याची पत्नी अद्याप फरार आहे. तर दुसरीकडे वैशालीसोबत काम केलेला एक अभिनेता याप्रकरणी मुख्य साक्षीदार बनू शकतो. या सहकलाकाराने वैशालीबद्दल काही महत्त्वपूर्ण खुलासे केले आहेत.

रक्षाबंधन या मालिकेत वैशाली ठक्कर आणि निशांत सिंह मलकानी यांनी ऑनस्क्रीन पती-पत्नीची भूमिका साकारली होती. निशांतने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत असा खुलासा केला की त्यांना वैशाली आणि राहुल यांच्यातील प्रकरण माहीत होतं. वैशाली तिच्या लग्नाबाबत खूप खूश होती. नोव्हेंबरमध्ये ते दोघं लग्न करणार होते, असं निशांतने सांगितलं.

ई टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत निशांत म्हणाला, “वैशाली माझी खूप चांगली मैत्रीण होती. तिच्या आत्महत्येच्या वृत्ताने मला खूप मोठा धक्का बसला. मी एक आठवड्याआधी तिच्याशी बोललो आणि तेव्हा तिने तिच्या होणाऱ्या पतीचे फोटो मला दाखवले होते. ती खूप खूश होती. ती नोव्हेंबरमध्ये लग्न करणार होती. तिने मला तिच्या लग्नाचं आमंत्रणसुद्धा दिलं होतं. मी प्रार्थना करतो की ती जिथे कुठे असेल तिथे खूश राहो.”

हे सुद्धा वाचा

राहुलबद्दल बोलताना निशांत पुढे म्हणाला, “मला राहुलबद्दल बरंच काही माहीत होतं. वैशालीने तिच्या खासगी गोष्टी मला सांगितल्या होत्या. त्यामुळे त्या गोष्टी बाहेर पडू नये यासाठी मी बांधिल होतो. पण आता जर तिने त्याच व्यक्तीसाठी टोकाचं पाऊल उचललं असेल तर मी तिच्यासाठी लढणार. माझ्या मैत्रिणीच्या न्यायासाठी मी आवाज उठवणार. मी चौकशीत सहकार्य नक्कीच करेन.”

वैशाली ठक्कर आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी आरोपी राहुल नवलानीला अटक केली आहे. इंदूर पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासासाठी तीन पथकं तयार केली आहेत.