Vandana Gupte : माझं सीकेपीसोबत लग्न झाल्यामुळे बाळासाहेबांना आनंद झालेला, वंदना गुप्तेंनी सांगितला किस्सा

Vandana Gupte : वंदना गुप्ते यांनी एका मुलाखतीत बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणी सांगितल्या आहेत.

Vandana Gupte : माझं सीकेपीसोबत लग्न झाल्यामुळे बाळासाहेबांना आनंद झालेला, वंदना गुप्तेंनी सांगितला किस्सा
| Updated on: Oct 13, 2026 | 8:45 PM

मराठी अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी अनेक नाटकांमध्ये आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे. वंदना गुप्ते स्पष्टवक्तेपणासाठी ओळखल्या जातात. त्याचबरोबर त्या बेधडक वक्तव्यही करतात. अनेकदा त्यांच्या वक्तव्याची चर्चा होते.  वंदना गुप्ते यांचं ठाकरे कुटुंबियांसोबत चांगलं नातं आहे. अनेक मुलाखतींमध्ये त्या ठाकरे कुटुंबाच्या आठवणी सांगतात. अशातच आता एका मुलाखतीत वंदना गुप्ते यांनी बाळासाहेब ठाकरे यांची आठवण सांगितली आहे.

वंदना गुप्ते यांनी सांगितला किस्सा

Loading...

वंदना गुप्ते म्हणाल्या की, ‘माझ्या आईला क्रिकेटची फार आवड होती. एकदा मी आणि आई ब्रेबॉर्न स्टेडियमवर क्रिकेटचा सामना पाहायला जात होतो. तेवढ्यात बाळासाहेब भेटले आणि त्यांनी आम्हाला कुठे चाललात? असं विचारलं. तेसुद्धा मॅच पाहायलाच जात होते. आमची स्टेडियममध्ये तिकिटं दुसरीकडे होती. पण, बाळासाहेब आम्हाला म्हणाले, ‘चला माझ्यासोबत’ मग, त्यानंतर प्रत्येकवेळी जेव्हा ते मॅचला जायचे तेव्हा आम्हाला आवर्जून विचारायचे. मग मी आणि आई जायचो.’

वंदना गुप्ते यांनी सीकेपीसोबत लग्न केल्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांना खूप आनंद झालेला. याबद्दल बोलताना वंदना म्हणाल्या की, ‘पुढे, माझं लग्न झालं आणि मी सीकेपीशी लग्न झाल्यामुळे त्यांना खूप आनंद झालेला. लग्नानंतर मग मी, शिरीष, बाळासाहेब आणि आमच्यासोबत ग्रुपमध्ये आणखी दोघं-तिघं जण होते, आम्ही एक ग्रुप केला होता. आम्ही सगळे मग वर्ल्डकपच्या शेवटच्या ज्या तीन मॅचेस व्हायच्या, त्या एकत्र पाहायचो. कधी बाळासाहेबांच्या घरी, कधी आमच्या घरी, असं प्लॅन करून आम्ही क्रिकेट मॅचेस पाहिल्या आहेत. एकंदर आमचं एकमेकांच्या घरी खूप येणं-जाणं व्हायचं.’

‘आम्ही दरवर्षी बाळासाहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या घरी जायचो. तेव्हा कलानगरला प्रचंड गर्दी व्हायची. त्यांचे माझ्याकडे बरेच फोटो आहेत. त्यांच्यावर लोकांचा खूप जीव होता आणि त्यांनी सुद्धा महाराष्ट्रासाठी खूप केलं’ असंही वंदना यांनी शेवटी सांगितलं. ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन‘ला दिलेल्या मुलाखतीत वंदना गुप्ते बोलत होत्या.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us