काँग्रेसला मोठा झटका! डिलिमिटेशनवरील अधिवेशनाआधीच काँग्रेसच्या खासदाराची प्रकृती बिघडली, थेट आयसीयूमध्ये अॅडमिट
काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. डिलिमिटेशनवरील अधिवेशनाआधीच काँग्रेसच्या एका खासदाराची प्रकृती बिघडली आहे. त्यांना थेट आयसीयूमध्ये अॅडमिट करण्यात आलं आहे.

देशात डिलिमिटेशन विधेयकावरून जोरदार चर्चा सुरू झाली आहे. संसदेच्या विशेष अधिवेशनात हे विधेयक सादर केले जाणार आहे. डिलिमिटेशन विधेयक अधिवेशनात पाडण्यासाठी इंडिया आघाडीने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. इंडिया आघाडीचे सर्व नेते हे एमके स्टॅलिन आणि शरद पवार यांना डिलिमिटेशनच्या विरोधात भूमिका घ्यावी, अशी विनंती करत आहेत. अधिवेशनात प्रत्येक खासदारांचं मतदान महत्वाचं ठरणार आहे. या डिलिमिटेशनच्या चर्चेदरम्यान काँग्रेसच्या एका खासदाराची प्रकृती बिघडल्याचे समोर आलं आहे. काँग्रेसच्या या खासदाराला दुबईतील रुग्णालयात दाखल केलं आहे. अधिवेशनातील मतदानाच्या काही तास आधी खासदाराची प्रकृती बिघडल्याने काँग्रेसला मोठा झटका बसणार असल्याचे बोलले जात आहे.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
