मोबाईलवर क्युआर कोड स्कॅन करताच.. तुम्ही इतिहासकाळात पोहचणार, महाराष्ट्राचे किल्ले स्वत:च आपला इतिहास सांगणार !
साल 2023 मध्ये ASI ने गुजरातच्या वडनगरमध्ये आपली पहिली डिजिटल हेरिटेज वॉक सेवा सुरु केली होती अशी माहिती आंबेकर यांनी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे येथे निवासस्थान आहे.

भारतीय पुरातत्व विभागाने आता त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या १८ स्मारकांवर ऑडिओ गाईड सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता पर्यटकांना पुरातन वास्तू वारसा सांगणाऱ्या स्मारका संदर्भात योग्य आणि विश्वासार्ह माहिती मिळू शकणार आहे. यामुळे आता महाराष्ट्राला भेट देणाऱ्या पर्यटकांना ऑडिओद्वारे ऐतिहासिक माहिती पुरविली जाणार आहे. ही सर्व स्थळे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI)च्या मुंबई सर्कल अंतर्गत येतात आणि येथे मोठ्या संख्येने पर्यटक फिरायला येतात. या पर्यटन आणि ऐतिहासिक किल्ल्यांना भेटायला येणाऱ्या पर्यटकांनी क्युआर कोड स्कॅन करताच त्यांना ऑनलाईन वा ऑफलाईन ऑडिओ टुर करता येणार आहे.
भारतीय पुरातत्व सर्वेक्षणा (ASI) ने महाराष्ट्रातील त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या १८ स्मारकांवर ऑडिओ गाईड सेवा सुरु केली आहे.या मोहिमेमुळे येते येणाऱ्या पर्यटकांना या ऐतिहासिक स्थळांसंदर्भात योग्य आणि विश्वासार्ह माहिती मिळणार आहे.
या स्मारकांना भेट देणाऱ्या नागरिकांनी QR कोड स्कॅन करून ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने ऑडियो टूर सुरु करु शकता. GPS आधारित सिस्टीमचा वापर करुन पर्यटक या जागांना भेटताना तेथील ऐतिहासिक महत्व, त्यांची निर्मिती, आणि प्राचीनता तसेच त्यांची वैशिष्ट्ये जाणून घेऊ शकतात. आता पर्यंत मुंबई सर्कलच्या एएसआयच्या ४० स्थळांना या सिस्टीम अंतर्गत आणले आहे. याच्या नव्या टप्प्यात समुद्र, किनारपट्टी भाग, पर्वत, आणि मैदानी प्रदेशातील किल्ल्यांचा समावेश करण्यात येणार आहे. यात कुलाबा, कोर्लई, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, हैगड, जंजीरा, ताला, विसापुर, सुवर्णदुर्ग आणि सोलापूर किल्ल्यांचा समावेश आहे.
याशिवाय कोंढाणे लेणी, गांधारपाले लेणी, शिवनेरी लेणी, जुन्नरची मनमोडी लेणी, तुळजा लेणी या पाच लेण्यांचाही समावेश करण्यात आल्याची माहिती आंबेकर यांनी दिली आहे. दाभोल मशीद, हब्शी गुम्बज (जुन्नर), दिलावर खान थडगे आणि मशीद या ऐतिहासिक वास्तूंचा देखील समावेश करण्यात आला आहे. सर्वात खास – सिंधुदुर्ग किल्लामालवणपासून 1 किमी अंतरावर कुर्ते बेटावर असलेला सिंधुदुर्ग किल्ला शिवाजी महाराजांनी 1664-1667 मध्ये हिरोजी इंदुलकरांच्या मदतीने बांधला होता. यात शिवराजेश्वर मंदिर आहे. आता येथेही पर्यटकांना त्यांच्या मोबाईलवरुन क्युआर कोड स्कॅन करताच ऑडिओ-व्हिज्युअल गाइड मिळणार आहे.
