Sanjay Mone : ‘नाटक चाललं की व्यवसाय, बुडालं की कला! आमने- सामने नाटकावर केलेल्या पोस्टसंबंधित, संजय मोने स्पष्टच बोलले
सगळ्या घडामोडी सुरू असतानाच संजय मोने यांनी केलेल्या पोस्टमुळे या वादाला पुन्हा एकदा चर्चेचा विषय मिळाला होता. त्या पोस्टव्दारे त्यांनी कोणाचेही नाव न घेता व्यावसायिक नाटकांच्या नफा - तोट्याच्या समीकरणावर प्रश्न उपस्थित केले होते. आता त्यांनी एका मुलाखतीत त्यांनी केलेल्या या पोस्टमागचे त्यांचे म्हणणे सांगितले आहे.

गेले काही दिवस ‘आमने सामने’ हे नाटक आणि त्याभोवती निर्माण झालेला वाद चर्चेत होता. या प्रकरणामुळे मराठी रंगभूमीवरील कलाकरांचे मानधन, त्यांचे हक्क आणि नाटकांच्या आर्थिक व्यवहारांबाबत चर्चा सुरू झाली होती. याच संपूर्ण प्रकरणावर अभिनेते आणि लेखक संजय मोने यांनी एक सूचक पोस्ट शेअर केली होती.
सगळ्या घडामोडी सुरू असतानाच संजय मोने यांनी केलेल्या पोस्टमुळे या वादाला पुन्हा एकदा चर्चेचा विषय मिळाला होता. त्या पोस्टव्दारे त्यांनी कोणाचेही नाव न घेता व्यावसायिक नाटकांच्या नफा – तोट्याच्या समीकरणावर प्रश्न उपस्थित केले होते. आता त्यांनी एका मुलाखतीत त्यांनी केलेल्या या पोस्टमागचे त्यांचे म्हणणे सांगितले आहे.
संजय मोने म्हणाले, ‘मला असं म्हणायचं होतं जेव्हा एखादं नाटक चालतं. त्यातून मग उत्पन्न मिळतं तेव्हा लगेच तो व्यवसाय होतो आणि जेव्हा एखाद्या नाटकाचं उत्पन्न कमी होतं तेव्हा त्या निर्मात्याला कला आठवते. कलाकरांनाही अस होतं, जेव्हा एखादं खूप चांगलं नाटक आहे मला माहिती आहे थोडी कळ सोसा ते चालेल . बरेच वेळेला कलाकार सुद्धा 75% ५० टक्के मानधन घेऊ करतात. मग समजा सुदैवाने ते नाटक चालयाल लागलं,जेवढे पैसे कमी घेतले होते कलाकारांनी तितके ताबडतोब निर्मात्याकडून सुटत नाहीत, हाताच्या बोटांवर वगळण्याइतके निर्माते सोडले तर. त्यामुळे याला काय अर्थ नाही. असे संजय मोने म्हणाले
संजय मोने यांनी नुकतीच माझा कट्टाला मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीत संजय मोने यांनी केलेल्या पोस्टचा अर्थ त्यामागचे त्यांचे म्हणणे स्पष्ट केले. आमने सामने नाटकातील अभिनेता रोहन गुजर आणि अभिनेत्री केतकी पालव यांनी आपले मानधनासंबंधीचे म्हणणे सोशल मीडियावर मांडले होते. मानधनात वाढ मागितल्यामुळे निर्मात्यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता आपल्याला नाटकातून काढून टाकल्याचा आरोप दोघांनी केला होता.
यानंतर नाटकाचे निर्माते मंगेश कदम आणि लीना भागवत यांनीही आपली बाजू मांडली. कलाकारांकडून वाारंवार अवास्तव मानधनवाढीच्या मागण्या केल्या जात असल्यामुळे हा निर्णय घ्यावा लागल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
