AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मी ऑन कॅमेरा सांगतो… पवार गट डिलिमिटेशनच्या बाजूने कि विरोधात? PM मोदींना धक्का देणारं खासदाराचं विधान, सस्पेन्स वाढला

Delimitation Bill : डिलिमिटेशन विधेयकावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात नवी चर्चा सुरू झाली आहे. रोहित पवारांच्या पत्रानंतर खासदार बजरंग सोनवणे यांनी आपली भूमिका मांडली. पक्षाच्या खासदारांशी चर्चा झाली नसल्याचं सांगत त्यांनी काही सवाल उपस्थित केले आहेत.

मी ऑन कॅमेरा सांगतो... पवार गट डिलिमिटेशनच्या बाजूने कि विरोधात? PM मोदींना धक्का देणारं खासदाराचं विधान, सस्पेन्स वाढला
शरद पवार गट डिलिमिटेशनसोबत की विरोधात?Image Credit source: टीव्ही९ मराठी
| Updated on: Nov 29, 2026 | 6:42 PM
Share

डिलिमिटेशन बिलावरून राष्ट्रवादी शरद पवार गटात मतभेद असल्याची चर्चा सुरू झाली आहे. आमदार रोहित पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना पत्र लिहून डिलिमिटेशन विधेयकावर फेरविचार करण्याची मागणी केली आहे. या पत्रात त्यांनी शरद पवारांच्या विचारांचा वारसा जपण्याची भूमिका मांडल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, या पत्राबाबत पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. पक्षात खासदारांची बैठक झालेली नसताना रोहित पवारांना निर्णयाबाबत माहिती कशी मिळाली, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

‘आम्हाला अद्याप पक्षाकडून निरोप नाही’

बजरंग सोनवणे म्हणाले, “पहिल्यांदा तर मी हे पत्र पाहिलेलं नाही. मला ते पत्र बघावं लागेल. मी ऑन कॅमेरा सांगतो, पण खासदारांनी डिलिमिटेशनच्या बाजूने मतदान करायचं की विरोधात, याबाबत पक्षाकडून अद्याप आम्हाला अधिकृत कोणताही आदेश आलेला नाही. मग रोहितदादांना ही माहिती कुठून मिळाली, हे मला माहिती नाही. त्यांची चर्चा झाली असेल तर त्यांनी घरातच बोलायला हवं होतं.”

पक्षाच्या नेतृत्वाकडून किंवा सुप्रिया सुळे यांच्याकडून अद्याप कोणताही निरोप मिळालेला नाही, असंही सोनवणे यांनी स्पष्ट केलं. “मी एकटाच नाही, तर आमच्या पाच-सहा खासदारांपैकी कोणाशीही याबाबत चर्चा झालेली नाही. सोमवारी सर्व खासदारांनी एकत्र भेटून चर्चा करायची, असं आधीच सांगण्यात आलं होतं. त्यामुळे पक्षाचा निर्णय सर्वांशी चर्चा करूनच होईल,” असं ते म्हणाले.

‘रोहित पवारांनी पत्र का दिलं, त्यांनाच विचारा’

रोहित पवारांनी पत्र माध्यमांसमोर आणण्यामागचं कारण विचारलं असता सोनवणे यांनी त्यावर भाष्य करणं टाळलं. “ते पक्षाचे नेते आहेत. त्यांनी सुप्रिया ताईंना पत्र दिलं आहे. त्यांनी ते माध्यमांना का दिलं, यावर मी बोलणं योग्य नाही. तेच याबाबत सांगू शकतील,” असं सोनवणे म्हणाले.

दरम्यान, डिलिमिटेशन विधेयकाचा मसुदा हातात आल्यानंतरच पक्षाची भूमिका स्पष्ट होईल, असं सुप्रिया सुळे यांनी यापूर्वी सांगितलं आहे. त्यामुळे आता खासदारांच्या बैठकीत काय निर्णय होतो आणि रोहित पवारांच्या पत्रावर पक्षाचं नेतृत्व काय भूमिका घेतं, याकडे लक्ष लागलं आहे.

Follow Us
रोहित पवारांच्या पत्रामुळे राजकीय वर्तुळात चर्चा; सुप्रिया सुळेंना...
रोहित पवारांच्या पत्रामुळे राजकीय वर्तुळात चर्चा; सुप्रिया सुळेंना लिहिलेल्या पत्रावर पक्ष चिन्ह नाही अन्...
डिलिमिटेशन विधेयकावरून उद्धव ठाकरे आक्रमक; फडणवीसांना थेट आवाहन,
डिलिमिटेशन विधेयकावरून उद्धव ठाकरे आक्रमक; फडणवीसांना थेट आवाहन, म्हणाले... महाराष्ट्राच्या हक्कांशी तडजोड नको!
मतचोरीच्या आरोपांवर रक्षा खडसे आक्रमक; चंद्रकांत पाटल यांना...
Raksha Khadse : मतचोरीच्या आरोपांवर रक्षा खडसे आक्रमक; चंद्रकांत पाटलांना दिलं प्रत्युत्तर!
एकनाथ शिंदेंचा डीलिमिटेशन आणि महिला आरक्षण विधेयकाला ठाम पाठिंबा; मोदी
एकनाथ शिंदेंचा डीलिमिटेशन आणि महिला आरक्षण विधेयकाला ठाम पाठिंबा; म्हणाले, मोदींचे निर्णय ऐतिहासिक
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाबाबत फडणवीसांचा मोठा निर्णय; कामासाठी...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाबाबत फडणवीसांचा मोठा निर्णय; कामासाठी दिले स्पष्ट निर्देश!
2019 सत्तेसाठी भाजपची साथ सोडली, काँग्रेसची लाचारी केली! नवनाथ बन...
2019 सत्तेसाठी भाजपची साथ सोडली, काँग्रेसची लाचारी केली! नवनाथ बनांचा उद्धव ठाकरेंना थेट सवाल
तर शरद पवार साहेबांची जाहीर माफी मागेन; विजय वडेट्टीवारांचं मोठं विधा
तर शरद पवार साहेबांची जाहीर माफी मागेन; विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान! नेमकं काय म्हणाले?
बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या तर राज ठाकरे मुख्यमंत्री होतील; अविनाश...
बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या तर राज ठाकरे मुख्यमंत्री होतील; अविनाश जाधव यांच्या विधानाची सर्वत्र चर्चा
पैशातून सत्ता अन् सत्तेतून पैसा! राज ठाकरे यांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा
पैशातून सत्ता अन् सत्तेतून पैसा! राज ठाकरे यांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा, थेट म्हणाले...
विधेयकाला पाठिंबा दिला नाही तर खासदार फुटण्याची सुळेंना भीती' राऊतांचा
Sanjay Raut : 'विधेयकाला पाठिंबा दिला नाही तर खासदार फुटण्याची सुळेंना भीती' संजय राऊतांचा दावा