AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amol Kolhe: रोहित पवारांचं सुप्रिया सुळेंना पत्र, संविधान बदलाच्या मुद्द्यावर अमोल कोल्हेंकडून शंका व्यक्त, नेमकं काय म्हणाले?

Amol Kolhe Responds to Rohit Pawar Letter: डिलिमिटेशनच्या मुद्द्यावर राष्ट्रवादीत उद्या महत्त्वाची बैठक होणार आहे. रोहित पवारांच्या पत्रावर चर्चा होणार आहे. अमोल कोल्हेंनी निर्णयाचे संकेत दिले आहेत.

Amol Kolhe: रोहित पवारांचं सुप्रिया सुळेंना पत्र, संविधान बदलाच्या मुद्द्यावर अमोल कोल्हेंकडून शंका व्यक्त, नेमकं काय म्हणाले?
Amol Kolhe on Rohit Pawar's Letter to Supriya Sule
| Updated on: Nov 29, 2026 | 6:07 PM
Share

शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सुप्रिया सुळेंना एक पत्र लिहिले आहे. या पत्रात रोहित पवारांनी डिलिमिटेशवरील भूमिकेवरुन भूमिका स्पष्ट केली आहे. यावर आता अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी रोहित पवारांच्या पत्रावर चर्चा होईल, असं सांगितलं आहे. तसेच राष्ट्रवादीने घेतलेल्या भूमिकेनंतर त्यांच्यावर टीका होत आहे, या टीकेला उत्तर देण्यावर मोठं वक्तव्य केलं आहे.

अमोल कोल्हे म्हणाले की, रोहित पवारांनी सुप्रिया सुळेंना लिहिलेलं पत्र मी वाचलं नाही आहे. यासंदर्भात आमच्या पक्षाने भूमिका स्पष्ट केली आहे. उद्या सकाळी आम्ही एकत्र बसू. बिलाचा ड्राफ्ट येईल. बिलावर आक्षेप का आहे, यावर चर्चा होणार आहे. ती उद्या सकाळी होईल. त्यानंतर निर्णय घेतला जाईल. त्यामुळे रोहित पवारांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या असतील. प्रत्येकाला ही मुभा आहे. त्यांनी व्यक्त केलेल्या भावना आम्ही विचारात घेऊ. रोहित पवारांचा रोख कुणाकडे आहे हे मला माहिती नाही.

ते म्हणाले की, सर्वांनी बिलचा अभ्यास केलेला नसतो. ही वस्तूस्थिती असते. त्यामुळे एखादा नरेटीव्ह हा नरेटिव्ह असणं आणि त्याविषयी विचार करून त्या बिलात काय आहे, यावर चर्चा करणं गरजेचं असतं. शरद पवारांवर टीका होताना वाईट वाटणं स्वाभाविक आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवारांचे योगदान फार मोठं आहे. हे डिलिमीटेशन बिल होऊदे नंतर जे टीका करणारे आहेत त्यांना आम्ही उत्तर देऊ. रोहित पवार आमचे नेते आहे. ते आमदार आहेत.

उद्याच्या बैठकीत ते आहेत की नाही याची मला कल्पना नाही. लोकसभेत जेव्हा बिल येत तेव्हा ते केवळ ऐकीव माहितीच्या आधारे नाही तर बिलमधील गोष्टी कशा आहेत, याचा अभ्यास होणं गरजेचं आहे. हा आक्षेप पाहता त्यात तथ्य आहे, असं वाटत नाही. रोहित पवारांना हे पत्र पीए वैगरे कुणीतरी लिहून दिलं असेल. त्यात संविधान बदलाचा आक्षेप नोंदवला गेला आहे तो बिलच्या ड्राफ्टमध्ये दिसत नाही आहे. रोहित पवारांच्या पत्राचा विचार होणार आहे, असं अमोल कोल्हे म्हणाले आहेत.

Follow Us
रोहित पवारांच्या पत्रामुळे राजकीय वर्तुळात चर्चा; सुप्रिया सुळेंना...
रोहित पवारांच्या पत्रामुळे राजकीय वर्तुळात चर्चा; सुप्रिया सुळेंना लिहिलेल्या पत्रावर पक्ष चिन्ह नाही अन्...
नवीन वर्ष 2027 मध्ये या 4 राशींचे पूर्ण होऊ शकते घर-गाडीचे स्वप्न;
नवीन वर्ष 2027 मध्ये या 4 राशींचे पूर्ण होऊ शकते घर-गाडीचे स्वप्न; बनतील प्रॉपर्टी खरेदीचे योग
डिलिमिटेशन विधेयकावरून उद्धव ठाकरे आक्रमक; फडणवीसांना थेट आवाहन,
डिलिमिटेशन विधेयकावरून उद्धव ठाकरे आक्रमक; फडणवीसांना थेट आवाहन, म्हणाले... महाराष्ट्राच्या हक्कांशी तडजोड नको!
मतचोरीच्या आरोपांवर रक्षा खडसे आक्रमक; चंद्रकांत पाटल यांना...
Raksha Khadse : मतचोरीच्या आरोपांवर रक्षा खडसे आक्रमक; चंद्रकांत पाटलांना दिलं प्रत्युत्तर!
एकनाथ शिंदेंचा डीलिमिटेशन आणि महिला आरक्षण विधेयकाला ठाम पाठिंबा; मोदी
एकनाथ शिंदेंचा डीलिमिटेशन आणि महिला आरक्षण विधेयकाला ठाम पाठिंबा; म्हणाले, मोदींचे निर्णय ऐतिहासिक
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाबाबत फडणवीसांचा मोठा निर्णय; कामासाठी...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाबाबत फडणवीसांचा मोठा निर्णय; कामासाठी दिले स्पष्ट निर्देश!
2019 सत्तेसाठी भाजपची साथ सोडली, काँग्रेसची लाचारी केली! नवनाथ बन...
2019 सत्तेसाठी भाजपची साथ सोडली, काँग्रेसची लाचारी केली! नवनाथ बनांचा उद्धव ठाकरेंना थेट सवाल
तर शरद पवार साहेबांची जाहीर माफी मागेन; विजय वडेट्टीवारांचं मोठं विधा
तर शरद पवार साहेबांची जाहीर माफी मागेन; विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान! नेमकं काय म्हणाले?
बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या तर राज ठाकरे मुख्यमंत्री होतील; अविनाश...
बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या तर राज ठाकरे मुख्यमंत्री होतील; अविनाश जाधव यांच्या विधानाची सर्वत्र चर्चा
पैशातून सत्ता अन् सत्तेतून पैसा! राज ठाकरे यांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा
पैशातून सत्ता अन् सत्तेतून पैसा! राज ठाकरे यांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा, थेट म्हणाले...