AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit Pawar: शरद पवारांच्या राष्ट्रवादीत भाजपचा हस्तक, रोहित पवारांचा खळबळजनक दावा; ‘तो’ नेता कोण?

आपल्या पक्षातील काही खासदार आणि आमदार सत्तेसोबत जाण्याचा विचार करत असल्याने किंवा काहींना सत्तेसोबत जाण्यास भाग पाडलं जात असल्याने त्यांचा आपल्यावर दबाव असणं स्वाभाविक आहे, पण ज्यांना जायचं असेल त्यांना खुशाल जाऊ द्या. त्यांचे खरे चेहरे देखील समोर येऊ द्या कुणी गद्दारी करणार असेल तर असे गद्दार आमदार, खासदार इथली स्वाभिमानी जनता पुन्हा कदापि निवडून देणार नाही, असा इशारा रोहित पवार यांनी दिला आहे.

Rohit Pawar: शरद पवारांच्या राष्ट्रवादीत भाजपचा हस्तक, रोहित पवारांचा खळबळजनक दावा; 'तो' नेता कोण?
Rohit PawarN NCP News
| Updated on: Nov 29, 2026 | 5:54 PM
Share

Rohit Pawar Letter To Supriya Sule:  राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी डिलिमिटेशनच्या विरोधात भूमिका घ्या असे म्हणत खासदार सुप्रिया सुळेंना पत्र लिहिलं आहे. या पत्रामध्ये रोहित पवार यांनी शरद पवार यांच्यावर होणारी टीका अन् पुरोगामी भूमिकेवरुन परखडपणे मत मांडले आहे. त्याचबरोबर रोहित पवार यांनी या विधेयकाला समर्थन देण्यामागे कोणाचा दबाव आहे, असा सवाल करत एक खळबळजनक दावा केला आहे. नेमकं काय म्हणालेत रोहित पवार? वाचा…

‘त्यांचे खरे चेहरे जगासमोर येऊ द्या…’

“साहेब आजारी असताना, त्यांच्यामागं घेतल्या जाणाऱ्या या निर्णयामुळं त्यांच्या आयुष्यभराच्या या तपाचा भंग होऊ नये, हीच माझी अत्यंत प्रामाणिक भावना आहे. साहेबांच्या निष्ठेवर आणि पुरोगामी प्रतिमेवर कोणताही डाग लागू न देण्याची जबाबदारी आज आपल्या सर्वांच्याच खांद्यावर आहे. आपल्या पक्षातील काही खासदार आणि आमदार सत्तेसोबत जाण्याचा विचार करत असल्याने किंवा काहींना सत्तेसोबत जाण्यास भाग पाडलं जात असल्याने त्यांचा आपल्यावर दबाव असणं स्वाभाविक आहे, पण ज्यांना जायचं असेल त्यांना खुशाल जाऊ द्या. त्यांचे खरे चेहरे देखील समोर येऊ द्या कुणी गद्दारी करणार असेल तर असे गद्दार आमदार, खासदार इथली स्वाभिमानी जनता पुन्हा कदापि निवडून देणार नाही, असा इशारा रोहित पवार यांनी दिला आहे.

‘आपल्याच पक्षातील भाजपचा हस्तक…’

तसेच “या विधेयकाला पाठिंबा देण्याबाबतच्या सध्या सुरु असलेल्या चर्चा बघितल्या तर आपल्याला देखील त्यासाठी जबाबदार धरलं जातंय. दुसरीकडं तुमचा चेहरा पुढं करून खऱ्या अथनि यामागे असलेला आपल्याच पक्षातील भाजपचा हस्तक नेता मात्र शांतपणे बसला असून आपली प्रतिमा मात्र खराब होतेय. आदरणीय ताई, मी तुमच्या डोळ्यातली भावना बघितलीय, तुमच्या मनात देखील आमच्याप्रमाणेच विचार आहे, पण तुमच्यावर दबाव येत असावा, असा खळबळजनक दावाही रोहित पवार यांनी केला आहे.

पक्षातील आमदार-खासदारांना आवाहन! 

दरम्यान, मला आमदार आणि खासदारांनाही सांगायचंय की, दबावापुढं झुकून संविधानाशी द्रोह करणार नाही, हे तुम्हीही हिंमत करुन दाखवून द्या. यासंदर्भात तुम्हालाही भूमिका स्पष्ट करावी लागेल. धाडस दाखवावं लागेल. आपला पक्ष लोकशाहीचा आदर करणार आहे. त्यामुळे उघड मतं मांडावीत. पण आपण डोळे झाकले म्हणजे लोकांचं लक्ष आपल्याकडं नाही, असं कुणीही समजू नये. आपण ठाम भूमिका घेतली तर ज्यांनी तुम्हाला निवडून दिलं त्याचा विश्वासघात होणार नाही, शिवाय त्याचे प्रश्नही बाजूला सरणार नाहीत, असं आवाहनही रोहित पवार यांनी केले आहे.

Follow Us
रोहित पवारांच्या पत्रामुळे राजकीय वर्तुळात चर्चा; सुप्रिया सुळेंना...
रोहित पवारांच्या पत्रामुळे राजकीय वर्तुळात चर्चा; सुप्रिया सुळेंना लिहिलेल्या पत्रावर पक्ष चिन्ह नाही अन्...
नवीन वर्ष 2027 मध्ये या 4 राशींचे पूर्ण होऊ शकते घर-गाडीचे स्वप्न;
नवीन वर्ष 2027 मध्ये या 4 राशींचे पूर्ण होऊ शकते घर-गाडीचे स्वप्न; बनतील प्रॉपर्टी खरेदीचे योग
डिलिमिटेशन विधेयकावरून उद्धव ठाकरे आक्रमक; फडणवीसांना थेट आवाहन,
डिलिमिटेशन विधेयकावरून उद्धव ठाकरे आक्रमक; फडणवीसांना थेट आवाहन, म्हणाले... महाराष्ट्राच्या हक्कांशी तडजोड नको!
मतचोरीच्या आरोपांवर रक्षा खडसे आक्रमक; चंद्रकांत पाटल यांना...
Raksha Khadse : मतचोरीच्या आरोपांवर रक्षा खडसे आक्रमक; चंद्रकांत पाटलांना दिलं प्रत्युत्तर!
एकनाथ शिंदेंचा डीलिमिटेशन आणि महिला आरक्षण विधेयकाला ठाम पाठिंबा; मोदी
एकनाथ शिंदेंचा डीलिमिटेशन आणि महिला आरक्षण विधेयकाला ठाम पाठिंबा; म्हणाले, मोदींचे निर्णय ऐतिहासिक
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाबाबत फडणवीसांचा मोठा निर्णय; कामासाठी...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाबाबत फडणवीसांचा मोठा निर्णय; कामासाठी दिले स्पष्ट निर्देश!
2019 सत्तेसाठी भाजपची साथ सोडली, काँग्रेसची लाचारी केली! नवनाथ बन...
2019 सत्तेसाठी भाजपची साथ सोडली, काँग्रेसची लाचारी केली! नवनाथ बनांचा उद्धव ठाकरेंना थेट सवाल
तर शरद पवार साहेबांची जाहीर माफी मागेन; विजय वडेट्टीवारांचं मोठं विधा
तर शरद पवार साहेबांची जाहीर माफी मागेन; विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान! नेमकं काय म्हणाले?
बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या तर राज ठाकरे मुख्यमंत्री होतील; अविनाश...
बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या तर राज ठाकरे मुख्यमंत्री होतील; अविनाश जाधव यांच्या विधानाची सर्वत्र चर्चा
पैशातून सत्ता अन् सत्तेतून पैसा! राज ठाकरे यांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा
पैशातून सत्ता अन् सत्तेतून पैसा! राज ठाकरे यांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा, थेट म्हणाले...