AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Margashirsh 2026 : मार्गशीर्ष महिना केव्हा सुरू होणार? यंदा किती गुरुवार असणार? महालक्ष्मी व्रत कसे करावे? पूजा विधी जाणून घ्या.

दिवाळी संपली आता मार्गशीर्ष महिन्याला सुरूवात होईल, या महिन्यात महालक्ष्मी व्रत केले जाते. गुरूवारचे उपवास असतात. त्यामुळे कधी सुरू होतोय मार्गशीर्ष? महालक्ष्मी व्रत कसे करावे? गुरुवार किती असणार? याबद्दल जाणून घ्या सविस्तर

Margashirsh 2026 : मार्गशीर्ष महिना केव्हा सुरू होणार? यंदा किती गुरुवार असणार? महालक्ष्मी व्रत कसे करावे?  पूजा विधी जाणून घ्या.
| Updated on: Nov 29, 2026 | 7:48 PM
Share

दिवाळी संपताच मार्गशीर्ष महिन्याची सुरूवात होते.. हा महिना पवित्र मानला जातो. महालक्ष्मी व्रत याच महिन्यात केले जाते. त्यामुळे हा महिना कधी सुरू होणार याची अनेकजण वाट पाहत असतात. याशिवाय भगवान श्रीकृष्णाचीही या महिन्यात उपासना केली जाते. या महिन्यातील प्रत्येक गुरूवार या महालक्ष्मी यांच्या उपासनेसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. या महिन्यातील प्रत्येक गुरुवार देवी महालक्ष्मीच्या पूजेसाठी महत्त्वाचा मानला जातो. घरात समृद्धी, संपत्ती आणि शांतता यावी यासाठी महिला घरात घटस्थापना करतात. महालक्ष्मीची पूजा, व्रत आणि कहाणी वाचन करतात. यंदा म्हणजेच 2026 मध्ये 9 डिसेंबर, बुधवारपासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होत आहे. विशेष म्हणजे यंदा महालक्ष्मी व्रतासाठी एकूण 5 गुरुवार येणार आहेत? व्रत कसं करायचं तारखा, पूजा विधी जाणून घ्या…

यंदा मार्गशीर्ष गुरुवार किती?

मराठी पंचांगानुसार, 9 डिसेंबर 2026 रोजी मार्गशीर्ष महिन्याचा प्रारंभ होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून म्हणजेच 10 डिसेंबरपासून मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रताला सुरुवात होणार आहे.

मार्गशीर्ष गुरुवार 2026-27 च्या तारखा

 पहिला गुरुवार : 10 डिसेंबर 2026 दुसरा गुरुवार : 17 डिसेंबर 2026 तिसरा गुरुवार : 24 डिसेंबर 2026 चौथा गुरुवार : 31 डिसेंबर 2026 पाचवा गुरुवार : 7 जानेवारी 2027

महालक्ष्मी व्रत कसे करावे?

मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत हे दर गुरुवारी चौरंगावर  पूजा मांडून केले जाते. यासाठी तुम्हाला गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान झाल्यानंतर स्वच्छ वस्त्र घालावे लागतील. त्यानंतर आपल्या घरातील देवांची पूजा करावी. महालक्ष्मी व्रत पूजेसाठी देवघराच्या बाजूला चौरंग ठेवावा. चौरंगावर लाल रंगाचे वस्त्र अंथरावे. चौरंगाच्या बाजूला रांगोळी काढावी. चौरंगावर महालक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो ठेवावा. चौरंगावर गोलाकार तांदूळ पसरून त्यात तांब्याचा कलश ठेवावा.

त्यात एक रुपयाचे नाणे टाकावे. कलशाला हळदकुंकू लावावे व त्यात एक नारळ ठेवावा. नारळाभोवती पाच वेगवेगळी झाडांची पाने ठेवून त्यावर नारळ ठेवावा. काहीजण त्या नारळाला सजवून देवीच रूप देतात. चौरंगावर एका ठिकाणी पाच फळे ठेवावीत. एकीकडे विड्याची पाने व त्यावर देवीचा शृंगार ठेवावा. त्यानंतर महालक्ष्मी व्रत कथा पुस्तक देखील ठेवून त्याची पूजा करावी. देवीला हळदीकुंकू व्हावे. हार घालावा फुले अर्पण करावीत व फुलांची वेणी देखील घालावी. मग धूप दीप अगरबत्ती लावावी. अशा प्रकारे पूजेची मांडणी केली जाते.

पूजेची मांडणी झाल्यांनतर देवीसमोर हाथ जोडून आपली मनोकामना सांगावी. आपण हे व्रत संपूर्ण संपूर्णाने विश्वास आणि श्रद्धेने करू असे देवीला सांगावे. त्यानंतर देवीच्या मंत्राचा एक माळा जप करावा व महालक्ष्मी व्रत कथा वाचण्यास सुरुवात करावी. मनोभावे कथेचे वाचन करावे. कथा झाल्यानंतर देवीची आरती करावी व नैवेद्य दाखवून सर्वांना प्रसाद वाटावा.

Follow Us
रोहित पवारांच्या पत्रामुळे राजकीय वर्तुळात चर्चा; सुप्रिया सुळेंना...
रोहित पवारांच्या पत्रामुळे राजकीय वर्तुळात चर्चा; सुप्रिया सुळेंना लिहिलेल्या पत्रावर पक्ष चिन्ह नाही अन्...
डिलिमिटेशन विधेयकावरून उद्धव ठाकरे आक्रमक; फडणवीसांना थेट आवाहन,
डिलिमिटेशन विधेयकावरून उद्धव ठाकरे आक्रमक; फडणवीसांना थेट आवाहन, म्हणाले... महाराष्ट्राच्या हक्कांशी तडजोड नको!
मतचोरीच्या आरोपांवर रक्षा खडसे आक्रमक; चंद्रकांत पाटल यांना...
Raksha Khadse : मतचोरीच्या आरोपांवर रक्षा खडसे आक्रमक; चंद्रकांत पाटलांना दिलं प्रत्युत्तर!
एकनाथ शिंदेंचा डीलिमिटेशन आणि महिला आरक्षण विधेयकाला ठाम पाठिंबा; मोदी
एकनाथ शिंदेंचा डीलिमिटेशन आणि महिला आरक्षण विधेयकाला ठाम पाठिंबा; म्हणाले, मोदींचे निर्णय ऐतिहासिक
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाबाबत फडणवीसांचा मोठा निर्णय; कामासाठी...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाबाबत फडणवीसांचा मोठा निर्णय; कामासाठी दिले स्पष्ट निर्देश!
2019 सत्तेसाठी भाजपची साथ सोडली, काँग्रेसची लाचारी केली! नवनाथ बन...
2019 सत्तेसाठी भाजपची साथ सोडली, काँग्रेसची लाचारी केली! नवनाथ बनांचा उद्धव ठाकरेंना थेट सवाल
तर शरद पवार साहेबांची जाहीर माफी मागेन; विजय वडेट्टीवारांचं मोठं विधा
तर शरद पवार साहेबांची जाहीर माफी मागेन; विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान! नेमकं काय म्हणाले?
बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या तर राज ठाकरे मुख्यमंत्री होतील; अविनाश...
बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या तर राज ठाकरे मुख्यमंत्री होतील; अविनाश जाधव यांच्या विधानाची सर्वत्र चर्चा
पैशातून सत्ता अन् सत्तेतून पैसा! राज ठाकरे यांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा
पैशातून सत्ता अन् सत्तेतून पैसा! राज ठाकरे यांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा, थेट म्हणाले...
विधेयकाला पाठिंबा दिला नाही तर खासदार फुटण्याची सुळेंना भीती' राऊतांचा
Sanjay Raut : 'विधेयकाला पाठिंबा दिला नाही तर खासदार फुटण्याची सुळेंना भीती' संजय राऊतांचा दावा