Varun Dhawan | वरुण धवन वागला जान्हवी कपूर हिच्यासोबत अत्यंत चुकीचा, थेट दिली ही वागणूक, धक्कादायक खुलासा

वरुण धवन आणि जान्हवी कपूर यांचा बवाल हा चित्रपट याच महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. विशेष म्हणजे या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना वरुण धवन आणि जान्हवी हे दिसत आहेत. जान्हवीची बहीण खुशी कपूर ही यंदाच बाॅलिवूडमध्ये पर्दापण करत आहे.

Varun Dhawan | वरुण धवन वागला जान्हवी कपूर हिच्यासोबत अत्यंत चुकीचा, थेट दिली ही वागणूक, धक्कादायक खुलासा
| Updated on: Jul 13, 2023 | 4:02 PM

मुंबई : वरुण धवन आणि जान्हवी कपूर हे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहेत. वरुण धवन (Varun Dhawan) आणि जान्हवी कपूर यांचा बवाल हा चित्रपट 21 जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे नुकताच या चित्रपटातील एक गाणे रिलीज झाले असून हे त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडले आहे. बवाल हा चित्रपट (Movie) लव्ह स्टोरीवर आधारित आहे. विशेष म्हणजे वरुण धवन आणि जान्हवी कपूर हे त्यांच्या आगामी चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहेत. जान्हवी कपूर हिची लहान बहीण खुशी कपूर ही देखील यंदाच बाॅलिवूडमध्ये पर्दापण करत आहे. खुशी कपूर, शाहरूख खान याची मुलगी सुहाना खान आणि अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा हे एकाच चित्रपटातून बाॅलिवूडमध्ये पर्दापण करतील.

वरुण धवन आणि जान्हवी कपूर यांच्या बवाल या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये कमालीची क्रेझ बघायला मिळत आहे. आता यांचा हा चित्रपट काय धमाका करतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील चित्रपटाचे प्रमोशन केले जात आहे. यापूर्वीच रिलीज झालेला जान्हवी कपूर हिचा चित्रपट फ्लाॅप गेला होता.

नुकताच वरुण धवन याने एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये काही धक्कादायक खुलासे करताना वरुण धवन हा दिसला आहे. वरुण धवन म्हणाला की, मी बवाल चित्रपटाच्या सेटवर जान्हवी कपूर हिला बोलणे टाळत होतो. विशेष म्हणजे मी तब्बल 1 महिना चित्रपटाच्या सेटवर सर्वांसोबतच गप्पा मारत होतो. फक्त मी जान्हवी कपूर हिच्याकडे लक्ष देत नव्हतो.

विशेष म्हणजे जान्हवी कपूर हिला बोलायचे नाही, हे मी अगोदरच ठरवले होते. त्याचे कारणही तेवढेच मोठे आहे. कारण मला माहिती होते की, मी जान्हवी कपूर हिला बोलण्यास सुरूवात केली की आम्ही लगेचच क्लोज होणार. मला ते नको होते कारण चित्रपटामध्ये काही सीन हे नेचरनुसार करायचे होते आणि त्यासाठी हे गरजेचे असल्याने मी ते केले.

एक महिन्यानंतर मग मी सेटवर जान्हवी कपूर हिला बोलण्यास सुरूवात केली. याबद्दल मी अगोदरच नितेश सर यांना सांगितले होते. विशेष म्हणजे हे सर्व जान्हवी कपूर हिने समजून घेतले असेही वरुण धवन हा म्हणाला आहे. या चित्रपटामध्ये वरुण धवन हा अजय याच्या भूमिकेत आहे, तर जान्हवी कपूर ही निशाच्या भूमिकेत आहे. या चित्रपटात जान्हवी आणि वरुण धवन यांचा रोमांन्स बघायला मिळणार आहे.