
मुंबई : बिग बॉस 17 धमाका करताना दिसतंय. विशेष म्हणजे बिग बॉस 17 (Bigg Boss 17) चा प्रिमियर होऊन आठ दिवस देखील झाले नाहीयेत. मात्र, असे असताना देखील बिग बॉस 17 च्या घरात मोठा घमासान बघायला मिळतोय. बिग बॉस (Bigg Boss) 16 टीआरपीमध्ये टाॅपला असल्याने या सीजनकडून निर्मात्यांना आणि प्रेक्षकांना नक्कीच मोठा अपेक्षा आहेत. बिग बॉस देखील या सीजनमध्ये चांगलेच सक्रिय झाल्याचे बघायला मिळतंय. बिग बॉस 17 च्या घरात नुकताच मोठा हंगामा झाला.
बिग बॉस 17 च्या घरात प्रियांका चोप्रा आणि परिणीती चोप्रा यांची बहीण मनारा चोप्रा ही टार्गेटवर असल्याचे बघायला मिळतंय. कारण नसताना देखील घरातील सदस्य हे मनारा चोप्रा हिला टार्गेट करताना दिसत आहेत. मनारा चोप्रा ही थेट बिग बॉस 17 च्या घरात रडताना देखील दिसलीये. या आठवड्यात मनारा हिला नाॅमिनेट देखील करण्यात आलंय.
दुसरीकडे अंकिता लोखंडे आणि ऐश्वर्या शर्मा यांच्यामध्ये वाद बघायला मिळतोय. बिग बॉस 17 च्या घरात यांच्यामध्ये सतत खटके उडताना दिसत आहेत. अंकिता लोखंडे हिने देखील टीव्ही मालिकांमध्ये मोठा काळ गाजवलाय. दुसरीकडे ऐश्वर्या शर्मा हिने देखील गुम है किसी के प्यार में मालिकेतून एक वेगळी ओळख नक्कीच मिळवलीये.
नुकताच आता अंकिता लोखंडे हिचा पती विकी जैन याने ऐश्वर्या शर्मा आणि नील भट्ट यांच्या लग्नाबद्दल अत्यंत हैराण करणारे भाष्य केले आहे. ज्यामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसल्याचे बघायला मिळतंय. इतकेच नाही तर विकी जैन याने थेट म्हटले की, ऐश्वर्या शर्मा ही नील भट्ट याला कंट्रोल करत असते.
विकी जैन हा मुनव्वर याला बोलताना थेट म्हणाला की मला असे वाटते की, ऐश्वर्या नीलवर कंट्रोल ठेवते. बिचारा नील लग्नानंतर फार जास्त वाईट अडकला आहे. यावेळी विकी हा नीलची नकल करताना देखील दिसतोय. पुढे विकी म्हणाला, या वयामध्ये कोण इतके बच्चा बच्चा म्हणतो का…नेहमीच तो ऐश्वर्या हिला प्रोटेक्टिव करताना दिसतो, असेही विकी म्हणताना दिसतोय.