Vicky Katrina | इतर महिलांप्रमाणेच कतरिना कैफ हिला देखील पतीमध्ये दिसतात हजारो चुका, अभिनेता पत्नीला घाबरतो, मोठा खुलासा

| Updated on: Jun 10, 2023 | 4:46 PM

बाॅलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी काैशल हे नेहमीच चर्चेत असतात. राजस्थानमध्ये अत्यंत खासगी पध्दतीने कतरिना कैफ आणि विकी काैशल यांचा विवाह पार पडला. अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर कतरिना कैफ आणि विकी काैशल यांनी लग्नाचा निर्णय घेतला.

Vicky Katrina | इतर महिलांप्रमाणेच कतरिना कैफ हिला देखील पतीमध्ये दिसतात हजारो चुका, अभिनेता पत्नीला घाबरतो, मोठा खुलासा
Follow us on

मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि अभिनेता विकी काैशल हे कायमच चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वीच विकी काैशल आणि सारा अली खान यांचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. विशेष म्हणजे विकी काैशल (Vicky Kaushal) आणि सारा अली खान यांचा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर धमाकेदार कामगिरी करताना दिसत आहे. विकी काैशल आणि सारा अली खान यांनी त्यांच्या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन केले आहे. विकी काैशल आणि सारा अली खान यांच्या चित्रपटाची (Movie) ओपनिंगही जबरदस्त ठरलीये. जयपुरमध्ये सारा अली खान आणि विकी हे शाॅपिंग करताना देखील दिसले.

सोशल मीडियाच्या माध्यमातूनही चित्रपटाचे प्रमोशन करण्यात आले. काही दिवसांपूर्वीच विकी काैशल आणि सारा अली खान हे चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी कपिल शर्मा याच्या शोमध्ये गेले होते. तिथे धमाल करताना विकी आणि सारा हे दिसले. विकी काैशल हा कपिल शर्मा याच्या शोमध्ये सारा अली खान हिचे गुपिते उघड करताना दिसला. कपिल शर्माच्या अनेक प्रश्नांची उत्तरे ही सारा अली खान हिने दिली.

नुकताच विकी काैशल याने एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये विकी काैशल हा कतरिना हिच्याबद्दल सांगताना दिसला. विकी काैशल म्हणाला की, माझ्या काही गोष्टींमध्ये कतरिना हिला अनेक चुका दिसतात. मी ज्यावेळी चित्रपटातील गाण्याचा सराव करतो, त्यावेळीचा व्हिडीओ हा कतरिनाला हवा असतो. ती सतत तो व्हिडीओ मला मागते. मात्र, तिला व्हिडीओ पाठवण्याची मला भीती वाटते.

ज्यावेळी डान्सचा सराव सुरू असतो आणि कतरिना मला त्याचा व्हिडीओ मागते. त्यावेळी मला तो व्हिडीओ तिला पाठवण्याची भीती वाटते. त्याचे कारणही तसेच आहे. माझ्या डान्समध्ये 36000 चुका या कतरिना कैफ हिला दिसतात. मग ती सुरू होते. हाताची स्टेप बरोबर नाही, पायाची स्टेप चुकलीये, हे असे नाही पाहिजे तसे हवे होते वगैरे वगैरे…यामुळे तिला व्हिडीओ पाठवताना मला टेन्शन येते.

कारण कतरिना कैफ ही खूप जास्त चांगली डान्सर आहे. तिला नेहमीच वाटते की, माझ्या डान्समध्ये सुधारणा व्हावी. यामुळे मी नेहमीच डान्सच्या सरावाचा व्हिडीओ कतरिना कैफ हिला पाठवण्यास घाबरतो. म्हणजेच काय तर विकी काैशल याने मोठा खुलासा करत हे मान्य केले आहे की, तो कतरिना कैफ हिला तो घाबरतो. विकीच्या या बोलण्याने अनेकजण हे हैराण झाले आहेत.