किसिंग सीन होता,अभिनेता ब्रश न करता आला; विद्या बालनने सांगितला शुटींगचा विचित्र किस्सा

विद्या बालन आज टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. जिने अनेक यशस्वी चित्रपट दिले आहेत. एका मुलाखतीत तिने एका चित्रपटात इंटिमेट सीन शुटदरम्यान तिच्यासोबत घडलेला एक विचित्र किस्सा तिने सांगितला. 

किसिंग सीन होता,अभिनेता ब्रश न करता आला; विद्या बालनने सांगितला शुटींगचा विचित्र किस्सा
Vidya Balan recounts the strange experience she had during a kissing scene in a film
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 23, 2025 | 4:18 PM

बॉलिवूडमध्ये शुटींग दरम्यावन असे अनेक प्रसंग येतात जेव्हा कलाकारांना अनक्मफर्ट वाटू लागतं. किंवा सहकलाकारासोबत काम करताना तो सहजपणा येत नाही. असाच एक किस्सा बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनसोबतही घडला होता. एका मुलाखतीत तिने स्वत: याचा खुलासा केला होता. अभिनेत्री विद्या बालनला इंडस्ट्रीमध्ये 20 वर्षे पूर्ण झाली आहेत. तिने परिणीता या चित्रपटातून पदार्पण केले. या चित्रपटात ती सैफ अली खानच्या अपोजिट भूमिकेत होती. या चित्रपटात संजय दत्त देखील एका महत्त्वाच्या भूमिकेत होता.

इंटिमेट सीनदरम्यान विद्याला आलेला एक विचित्र अनुभव

विद्या बालनने इंडस्ट्रीत अनेक उत्तम चित्रपट दिले आहेत. पण तिचा गाजलेला चित्रपट म्हणजे ‘द डर्टी पिक्चर’. या चित्रपटातील तिच्या बोल्ड अभिनयाने सर्वांनाच आश्चर्यचकित केलं होतं. तिच्या अभिनयाने सर्वांना प्रभावित केलं होतं. अलीकडेच एका मुलाखतीत विद्या बालनने चित्रपटातील इंटिमेट सीन्सबद्दल, तसेच ते कशापद्धतीने शूट होतात त्याबद्दल सांगितलं आहे. एवढंच नाही तर एका चित्रपटात इंटिमेट सीनदरम्यान तिला आलेला एक विचित्र अनुभवही सांगितला आहे.

विद्या बालनने इंटिमेट सीन्सबद्दल काय सांगितलं?

एका मुलाखतीत तिने सांगितले की, ‘एका चित्रपटात इंटेमेट सीन होता. आणि त्यावेळी एक अभिनेता चायनीज खाऊन आला होता. आणि सीनच्या आधी त्याने दातही घासले नव्हते. तरीही मी त्याच्यासोबत एक इंटिमेट सीन केला. त्यावेळी मी मनात म्हणाले, हा काया तुझा पार्टनर आहे का? म्हणून मी त्याला मिंट पण दिलं नाही. मी खूप नवीन होते. त्यामुळे मला खूप भीती वाटत होती.’

‘मी एक निर्लज्ज आशावादी आहे’

त्याच मुलाखतीत विद्या बालन म्हणाली की ती एक अभिनेत्री म्हणून असुरक्षित नाही. ती नेहमीच आशावादी असते. विद्या म्हणाली, ‘मला वाटते की मी एक निर्लज्ज आशावादी आहे. माझा स्वतःवर खूप विश्वास आहे. मी माझ्या पूर्ण क्षमतेने काम केले. मी अशा अनेक लोकांना भेटलो ज्यांनी मला स्वतःवर काम करायला सांगितले. मी वजन कमी केले पाहिजे. पण मी स्वतःवर विश्वास ठेवला आणि म्हणाले की माझ्यात काहीही चूक नाही. मला वाटते की ही माझी चांगली वृत्ती आहे कारण त्यामुळे मला मदत झाली.’


कामाबद्दल बोलायचं झाल्यास 

विद्या बालनने आपला प्रवास टीव्हीपासून सुरू केला होता. ती एकता कपूरच्या ‘हम पांच’ या शोमध्ये दिसली होती. यानंतर तिने चित्रपटांमध्ये काम केले. तिने भूल भुलैया, कहानी, हमारी अधुरी कहानी, दो और दो प्यार, द डर्टी पिक्चर, जलसा, इश्किया, किस्मत कनेक्शन यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले.आणि आज ती एक यशस्वी अभिनेत्री आहे.