Laxmikant Berde : अस्ताला जाणारा लक्ष्या पाहून…असे होते लक्ष्मीकांत बेर्डे यांचे शेवटचे तीन दिवस, अभिनेत्यानं सांगितलेला प्रसंग

Laxmikant Berde Last Days : प्रसिद्ध मराठी अभिनेत्यानं लक्ष्मीकांत बेर्डे यांचे शेवटच्या दिवसांचा प्रसंग सांगितला होता.

Laxmikant Berde : अस्ताला जाणारा लक्ष्या पाहून...असे होते लक्ष्मीकांत बेर्डे यांचे शेवटचे तीन दिवस, अभिनेत्यानं सांगितलेला प्रसंग
| Updated on: Nov 28, 2026 | 5:06 PM

मराठी चित्रपटसृष्टीतील विनोदाचे बादशहा म्हणून ओळखले जाणारे अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे आजही प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहेत. आपल्या सहजसुंदर अभिनयानं आणि अफलातून विनोदानं त्यांनी अनेक वर्षं प्रेक्षकांना खळखळून हसवलं. ‘अशी ही बनवाबनवी’, ‘धुमधडाका’, ‘थरथराट’, ‘हमाल दे धमाल’ यांसारख्या चित्रपटांमधून त्यांनी प्रचंड लोकप्रियता मिळवली. मात्र, करिअरच्या शिखरावर असतानाच त्यांच्या निधनाची बातमी आली आणि संपूर्ण मराठी मनोरंजनविश्वाला मोठा धक्का बसला. अभिनेते आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांचे जवळचे मित्र विजय कदम यांनी एका मुलाखतीत लक्ष्मीकांत यांच्या निधनावर दुःख व्यक्त केलेलं.

लक्ष्मीकांत यांच्याबद्दल काय म्हणालेले विजय कदम?

Loading...

आपल्या सर्वात जवळच्या मित्राबद्दल बोलताना विजय कदम फार भावुक झाले होते. विजय कदम म्हणालेले की, ‘1978 पासूनची आमची मैत्री. ‘चिसौका’ नाटकात घेतलं, संगीत सुकामेवामध्ये तर सगळे विनोदी कलाकार एकत्र केले आणि एक वर्षी एका गणेशोत्सवात नऊ दिवसांमध्ये आम्ही 11 प्रयोग केले. त्यात आम्ही दोघंच निर्माते, दोघेच काम करणारे. अभिनेता, निर्मात्यापेक्षा तो मित्र म्हणून खूप जास्त खास होता. त्याचं लग्न आधी झालं मग काही वर्षांनी माझं झालं. एकदा नाटकाच्या प्रयोगानंतर त्यानं मला गाडीत घेऊन स्वतःहून विचारलं, ‘गुंतवणूकीचं काही केलं का?’ मग दुसऱ्या दिवशी त्याचा इनवेस्टमेन्टवाला माणूस माझ्या घरी यायचा आणि सांगायचा की मला बेर्डे सरांनी पाठवलंय. इतकं मित्राबद्दलचं प्रेम फार क्वचित पाहायला मिळतं.’

‘शेवटच्या त्या तीन दिवसांमध्ये माझ्या घरापासून 2 मिनिटांवर रुग्णालय होतं. प्रिया इतर गडबडीत असल्यामुळे तिनं मला सांगितलेलं की, लक्ष्मीकांतसाठी दहीभाताचा डबा घेऊन जायला. त्या तीन दिवसांमध्ये जेव्हा मी तो अस्ताला जाणारा लक्ष्या पाहत होतो, तेव्हा आतल्या आत कुढत होतो. पण मी एक गोष्ट शेवटपर्यंत राखली होती. ती म्हणजे ‘तू हे करू नकोस’ असं मी त्याला कधीच बोललो नाही. कारण हे ज्यांनी ज्यांनी त्याला सांगितलं त्या प्रत्येकाशी त्यानं अबोला धरला. फक्त एक मी असा होतो त्याला मी हे काही बोललो नाही. आज मला स्वतःला बरं वाटतंय की मी त्याला कुठे दुखावलं नाही.’ असं विजय कदम यांनी शेवटी म्हटलेलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us