AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डिलिमिटेशनवरुन वातावरण तापलं, पवारांवरील पोस्ट तर फक्त झलक, राज ठाकरे उद्या तोफ डागणार, मोठी अपडेट समोर

डिलिमिटेशन बिलवर शरद पवार यांच्याबाबत केलेल्या पोस्टनंतर राज ठाकरे पुन्हा चर्चेत आले आहेत. उद्याच्या पत्रकार परिषदेत ते कोणता नवा मुद्दा मांडणार? त्यांच्या वक्तव्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

डिलिमिटेशनवरुन वातावरण तापलं, पवारांवरील पोस्ट तर फक्त झलक, राज ठाकरे उद्या तोफ डागणार, मोठी अपडेट समोर
Raj Thackeray Press Conference Image Credit source: टीव्ही९ मराठी
| Updated on: Nov 28, 2026 | 4:57 PM
Share

मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या, 29 नोव्हेंबर रोजी कल्याणमध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत. डिलिमिटेशन बिलवरून शरद पवार यांच्याबाबत केलेल्या पोस्टनंतर राज ठाकरे काय भूमिका मांडणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दोन दिवसांच्या कल्याण-डोंबिवली दौऱ्यात राजकीय घडामोडींना वेग आला असून, उद्याच्या पत्रकार परिषदेत ते कोणत्या मुद्द्यांवर भाष्य करणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज आणि उद्या अशा दोन दिवसांच्या कल्याण-डोंबिवली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान उद्या 29 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता ते कल्याणमध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत. खडकपाडा येथील स्प्रिंग टाईम क्लबमध्ये ही पत्रकार परिषद होणार असल्याची माहिती मनसेचे कल्याण जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांनी दिली.

शरद पवारांबाबतच्या पोस्टनंतर राज ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष

डिलिमिटेशन बिलच्या मुद्द्यावरून राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्याबाबत केलेल्या पोस्टची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर उद्याच्या पत्रकार परिषदेत राज ठाकरे या विषयावर काही भूमिका मांडणार का, याकडे लक्ष लागले आहे. तसेच राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडी आणि अन्य मुद्द्यांवर ते काय बोलणार, याबाबतही उत्सुकता आहे.

राज ठाकरेंची पोस्ट काय?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या डिलिमिटेशन बिलावरील भूमिकेवरुन टाकास्र डागलं आहे. त्यांनी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं की, 2 जुलै 2023 ला जेंव्हा राष्ट्रवादीची एक टीम फुटून भाजपच्या दिशेने सरकली होती त्यावेळेस मी हे बोललो होतो. अर्थात पुढे 3 वर्ष दोन्ही राष्ट्रवादी पक्षांनी यथोचित भांडणाचं नाटक केलं आणि मी म्हणलं तसं सत्तेच्या सोपानासाठी दुसरी टीम आता हलकारे देत निघाली आहे. मी मध्ये एकदा म्हणलं होतं की हे पवारांचं जंतरमंतर आहे, जे फार थोड्या लोकांना कळतं. असो, अशी पोस्ट लिहित त्यांनी यासोबत त्यांची जुनी एक पोस्ट जोडली आहे. ज्यामध्ये २०२३मधील राज्यातील राजकारणाचे चित्र त्यांच्या दृष्टीकोनातून त्यांनी मांडले होते. या पोस्टमध्ये त्यांनी पवारांविषयी त्यांच्यी जुनी भूमिका मांडलेली दिसून आली.

त्यामुळे आता उद्याच्या पत्रकार परिषदेतून ते नेमकी कोणती भूमिका मांडतात हे पाहावे लागणार आहे.

Follow Us
शरद पवार तसेच DMKची समजूत काढण्याचा प्रयत्न करणार; इंडिया आघाडीची...
INDIA Alliance Meeting : शरद पवार तसेच DMKची समजूत काढण्याचा प्रयत्न करणार; इंडिया आघाडीची पुढील वाटचाल काय?
दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये NCB ची धडक कारवाई; अमली पदार्थ सेवन...
दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये NCB ची धडक कारवाई; अमली पदार्थ सेवन केल्याप्रकरणी दोघे ताब्यात
अहिल्यादेवी होळकर कॅन्सर हॉस्पीटलमधून शरद पवार पुन्हा ब्रीच कॅन्डी...
Sharad Pawar Heath Update : अहिल्यादेवी होळकर कॅन्सर हॉस्पीटलमधून शरद पवार पुन्हा ब्रीच कॅन्डी रुग्णालयात
पवारांच्या राष्ट्रवादीवर पुन्हा निशाणा; NCP ने डिलिमिटेशनला पाठिंबा..
राज ठाकरेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर पुन्हा निशाणा; NCP ने डिलिमिटेशनला पाठिंबा देताच जुनी पोस्ट केली शेअर!
शरद पवारांची प्रकृती आता कशी? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची हेल्थ अपडेट
Sharad Pawar : शरद पवारांची प्रकृती आता कशी? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची हेल्थ अपडेट
डीलिमिटेशनमुळे संघराज्य व्यवस्थेला धोका? ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उल्हास...
डीलिमिटेशनमुळे संघराज्य व्यवस्थेला धोका? ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न!
मोदी सरकारला पाठिंबा द्या'; परिणय फुके यांचे उद्धव ठाकरेंना आवाहन
मोदी सरकारला पाठिंबा द्या'; परिणय फुके यांचे उद्धव ठाकरेंना आवाहन
हुंड्यासाठी विवाहितेला मानसिक आणि शारीरिक त्रास; सोलापुरात सासरच्या...
Solapur : हुंड्यासाठी विवाहितेला मानसिक आणि शारीरिक त्रास; सोलापुरात सासरच्या चौघांविरोधात गुन्हा दाखल
डिलिमिटेशन विधेयकावरून एकनाथ शिंदेंचं मोठं विधान; म्हणाले....
Eknath Shinde : डिलिमिटेशन विधेयकावरून एकनाथ शिंदेंचं मोठं विधान; म्हणाले....
शरद पवारांना ब्रीच कँडी रुग्णालयातून कॅन्सर रुग्णालयात हलवलं
Sharad Pawar : शरद पवारांना ब्रीच कँडी रुग्णालयातून कॅन्सर रुग्णालयात हलवलं; नेमकं काय कारण? सुप्रिया सुळेंनी सांगितलं...