‘मुलीचा फोटो छापू नका’, विरुष्काचं मीडियाला निवेदन

| Updated on: Jan 13, 2021 | 3:57 PM

आपल्या मुलीचा फोटो मीडियात येऊ नये, अशी विरुष्काची इच्छा आहे (Virat Kohali and Anushka sharma official letter to Media).

मुलीचा फोटो छापू नका, विरुष्काचं मीडियाला निवेदन
Follow us on

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या घरी 11 जानेवारीला एका चिमुकलीने जन्म घेतला. विराट आणि अनुष्काचं हे पहिलं बाळ आहे. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. मात्र, आपल्या मुलीचा फोटो मीडियात येऊ नये, अशी विरुष्काची इच्छा आहे. याबाबत त्यांनी मीडियाला निवेदन देत सहकार्य करण्याची विनंती केली आहे (Virat Kohali and Anushka sharma official letter to Media).

काही दिवसांपूर्वी अनुष्काने स्वत: आपल्या बाळाला मीडियाच्या लाईमलाईटपासून दूर ठेवणार असं सांगितलं होतं. मुलीच्या जन्मानंतर विराटने सोशल मीडियावर मुलीच्या आगमनाची गोड बातमी देताना मीडियाने याबाबत प्रायव्हसी ठेवावी, अशी विनंती केली होती. याबाबत अनुष्का आणि विराटने ऑफिशिअल स्टेटमेंट जारी केलं आहे.

“या वर्षात तुम्ही दिलेल्या प्रेमासाठी खूप धन्यवाद, आपल्यासोबत हा खास क्षण सेलिब्रेट करुन आम्हाला आनंद होत आहे. पालक म्हणून आमची एक छोटीशी विनंती आहे. आम्ही आमच्या बाळाची प्रायव्हसी सुरक्षित ठेवू इच्छितो. यासाठी आम्हाला आपल्या मदत आणि पाठिंब्याची आवश्यकात आहे”, असं निवेदनात म्हटलं आहे.

सर्व ताज्या बातम्यांचे अपडेट्स, पाहा गुड मॉर्निंग महाराष्ट्र, दररोज सकाळी 7 वा. @TV9Marathi वर

“आम्ही नेहमी या गोष्टीकडे लक्ष देतो की, आमच्याकडून तुम्हाला मिळणारा जो कंटेंट आहे तो मिळत राहावा. आम्ही तुम्हाला विनंती करतो की, असा कोणताही कंटेट नसावा ज्यात आमच्या मुलीचा फोटो असेल. आम्हाला माहित आहे की, तुम्ही समजू शकतात आणि याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत”, असं विराट आणि अनुष्काने निवेदनात म्हटलं आहे (Virat Kohali and Anushka sharma official letter to Media ).

हेही वाचा : विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या घरी ‘लक्ष्मी’चे आगमन