Virat Anushka Daughter | विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या घरी ‘लक्ष्मी’चे आगमन

विरुष्काच्या घरी नन्ही ‘परी’चे आगमन झाले आहे. (Virat Kohli and Anushka Sharma Blessed With A Baby Girl)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 16:25 PM, 11 Jan 2021
anushka sharma Virat Kohli blessing baby girl
अनुश्का-विराटला कन्यारत्न

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा (Indian Cricket Team) कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) या दोघांच्या घरी कन्यारत्नाचा लाभ झाला आहे. विरुष्काच्या घरी नन्ही ‘परी’चे आगमन झाले आहे. विराट आणि अनुष्काचं हे पहिलं बाळ आहे. त्यामुळे त्यांचे चाहते फार आनंदात आहे. (Virat Kohli and Anushka Sharma Blessed With A Baby Girl)

“आम्हाला आज दुपारी मुलगी झाल्याचं जाहीर करताना अतिशय आनंद होत आहे. तुमच्या प्रेम आणि शुभाशीर्वादांसाठी आम्ही मनःपूर्वक आभारी आहोत. अनुष्का आणि आमची मुलगी, दोघींची प्रकृती ठीक आहे. आम्हाला आयुष्याचा हा टप्पा अनुभवायला मिळाला, हे आमचं सुदैवच. आम्हाला या क्षणी प्रायव्हसी जपायची आहे, हे तुम्ही समजून घ्याल, अशी आशा आहे” असे ट्विट विराट कोहलीने केले आहे

 

बंगळुरुच्या एका ज्योतिषीने विराट आणि अनुष्काला मुलगी होईल, असे भाकित वर्तवलं होते. “विराट आणि अनुष्‍का पालक होण्याच्या अत्यंत रंजक प्रवासावर निघाले आहेत. त्यांचं पहिलं बाळ हे मुलगी असेल. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांना पावर कपलमध्ये गणलं जातं. ज्योतिषशास्त्रीय कॅलक्युलेशन आणि फेस रिडिंगच्या आधारे विराट कोहलीला पहिली मुलगी होणार आहे”, असा दावा या ज्योतिषीने केला आहे.

काही दिवसांपूर्वी अनुष्काने वोग (Vogue) या मॅगजिनला दिलेल्या मुलाखतीत बाळाच्या संगोपनाबाबतची माहिती दिली होती. मी प्रगतीशील कुटुंबातून आली आहे. जिथे लहान मुलांचे सर्व लाड पुरवले जातात. त्यासोबतच त्यांना इतरांचा आदर करण्यासही शिकवले जाते. तुम्हाला मुलांसाठी स्वत: हे स्ट्रक्चर तयार करावं लागेल. आम्हाला आमच्या मुलाला मस्तीखोर बनवायचं नाहीये. मी आई होण्यापूर्वीपासूनच याचा विचार करत होते, असे अनुष्का म्हणाली होती.

सोशल मीडियापासून दूर ठेवण्याचा निर्णय

अनुष्काने सांगितलं की विराटने बाळाला सोशल मीडियापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही याबाबत खूप विचार केला. आम्ही आमचं बाळ वाढताना लोकांना दाखवण्याची इच्छा नाही. आम्ही आमच्या मुलांना सोशल मीडियात अडकवू इच्छित नाही. पुढे जाऊन त्याचा निर्णय मुलं घेतील. आजकाल मोठ्यांनाच सोशल मीडिया हँडल करण्यात इतकी समस्या येते. हे थोडं कठीण असेल पण आम्ही हे फॉलो करु.

काही दिवसांपूर्वी तैमुरला (Taimur Ali Khan) मिळणाऱ्या अटेंशनबाबत बोलताना शर्मिला टागोर म्हणाल्या होत्या की, अनुष्का-विराट हे एक लोकप्रिय जोडपं आहे. जेव्हा त्यांच्या मुलाचा जन्म होईल तेव्हा पॅपराजी तैमुरला सोडून त्यांच्या मुलांकडे लक्ष देतील (Virat Kohli and Anushka Sharma Blessed With A Baby Girl)

संबंधित बातम्या :

विराट कोहलीला मुलगी होणार! वाचा कुणी आणि कुठल्या आधारे केला दावा