Raksha Bandhan 2024: अनुष्का – विराटच्या मुलांची पहिली रक्षाबंधन, अभिनेत्रीने दाखवली खास झलक

Raksha Bandhan 2024: अनुष्का - विराटच्या मुलांची परदेशात रक्षाबंधन... अभिनेत्रीने वामिका कोहलीसोबत मुलगा अकायच्या पहिल्या रक्षाबंधनाची दाखवली खास झलक, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त वामिका - अकाय यांच्या रक्षाबंधनची चर्चा...

Raksha Bandhan 2024: अनुष्का - विराटच्या मुलांची पहिली रक्षाबंधन, अभिनेत्रीने दाखवली खास झलक
| Updated on: Aug 20, 2024 | 9:40 AM

देशात प्रत्येकाने मोठ्या उत्साहात रक्षाबंधन सण साजरा केला. सर्व सामान्य व्यक्तींपासून सेलिब्रिटी देखील रक्षाबंधन सण साजरा करताना दिसले. तर अनेक सेलिब्रिटींच्या मुलांची तर पहिली रक्षाबंधन होती. अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटपटू विराट कोहली यांच्या मुलांनी देखील पहिल्यांना रक्षाबंधन साजरी केली. अनुष्का शर्मा हिने 2024 मध्ये मुलाल जन्म दिला. आता अभिनेत्रीने मुलांच्या रक्षाबंधनची एक झलक दाखवली आहे. सध्या अभिनेत्रीने पोस्ट केलेला फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सांगायचं झालं तर, अनुष्का शर्मा हिने मुलगी वामिका कोहली आणि मुलगा अकाय कोहली यांचा चेहरा दाखवलेला नाही. पण अभिनेत्रीने पोस्ट केलेला फोटो प्रचंड क्यूट आहे. अनुष्काने मुलांच्या राख्यांचा फोटो पोस्ट केला आहे. ज्यामध्ये कारच्या आकाराच्या राख्या दिसत आहेत. एक राखी हिरव्या रंगाची आणि दुसरी राखी नारंगी रंगाची आहे. फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये ‘हॅप्पी रक्षाबंधन’ आणि दोन गुलाबी हार्टवाले इमोजी शेअर केले आहेत.

ही पहिली वेळ नाही, जेव्हा अनुष्का शर्माने मुलांचे फोटो पोस्ट केले आहेत. याआधी देखील अनुष्काने वामिका – अकाय यांचा फोटो पोस्ट केला होता. ज्यामध्ये कोहली भावंड पॉप्सिकल्सचा आनंद घेताना दिसले. ज्यामध्ये अकाय याची एक झलक पाहायला मिळाली. अमुष्काने अकाय याच्या हाताचा फोटो पोस्ट केला होता. तेव्हा देखील फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता.

 

अनुष्का शर्मा – विराट कोहली यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, दोघे मुलांसोबत लंडन याठिकाणी राहत आहे. एवढंच नाहीतर, विराट – अनुष्का कायमचे परदेशात शिफ्ट होतील… अशी देखील चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर देखील दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.

अनुष्का – विराट यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी 2017 मध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतर अनुष्का हिने 11 जानेवारी 2021 मध्ये मुलगी वामिका हिला जन्म दिला. त्यानंतर 15 फेब्रुवारी 2024 मध्ये अभिनेत्री अकाय याला जन्म दिला. सध्या अभिनेत्री तिच्या खासगी आयुष्यात व्यस्त आहे.

आज अनुष्का बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. अनुष्का हिने ‘रब ने बना दी जोडी’, ‘फिल्लौरी’, ‘एनएच10’, ‘मटरू की बिजली का मंडोला’ आणि अन्य सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं.