WAVES 2025: ‘पुष्पा 2’ नंतर किती बदललं अल्लू अर्जुनचं आयुष्य ? पुष्पा ने थेट सांगितलं…

'पुष्पा2' चित्रपटाद्वारे बॉक्स ऑफिसवर इतिहास रचणारा पॅन इंडिया सुपरस्टार अल्लू अर्जुन हा मुंबईत झालेल्या वेव्हज समिट (WAVES 2025) मध्ये सहभागी झाला. टीव्ही 9 चे सीईओ आणि एमडी बरुण दास यांनी अल्लू अर्जुन याच्याशी 'टॅलेनेट बियॉन्ड बॉर्डर्स' या विषयावर संवाद साधला.

WAVES 2025: ‘पुष्पा 2’ नंतर किती बदललं अल्लू अर्जुनचं आयुष्य ? पुष्पा ने थेट सांगितलं...
टीव्ही 9 चे सीईओ आणि एमडी बरुण यांनी साधला अल्लू अर्जुनशी संवाद
Image Credit source: TV9
| Updated on: May 01, 2025 | 7:16 PM

मुंबईत वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल आणि एंटरटेनमेंट समिट सुरू झाले आहे. या चार दिवसांच्या कार्यक्रमात अनेक मोठे स्टार सहभागी होणार असून विविध विषयांवर आपले विचार व्यक्त करतील. पॅन इंडिया सुपरस्टार अल्लू अर्जुन हा या समिटच्या पहिल्या दिवशी उपस्थित होता. टीव्ही 9 सीईओ आणि एमडी बरुण दास यांनी त्यांच्याशी संवाद साधला.

अल्लू अर्जुन यांनी ‘टॅलेंट बियॉन्ड बॉर्डर्स’ या विषयावर चर्चा केली. ‘पुष्पा 2’ चित्रपट रिलीज झाल्यानंतर गेल्या 6 महिन्यांत आयुष्य किती बदललं असा सवाल अल्लू अर्जुन याला विचारण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर देण्यापूर्वी, त्यांनी भारत सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे WAVES साठी आभार मानले.

पुढे या प्रश्नाचे उत्तर देताना अल्लू अर्जुन म्हणाला, ” आता सगळे जण माझा चेहरा, मला ओळखतात. मी एक रीजनल अभिनेता आहे, पण ‘पुष्पा’मुळे सगळे मला ओळखतात” अशी भावना त्याने व्यक्त केली.

पंतप्रधानांच्या हस्ते Wavesचे उद्घाटन

वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट (Waves) ची आज मोठ्या उत्साहात सुरूवात झाली आहे. मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज या कार्यक्रमाचे उद्घाटन झालं. शाहरुख खान, आमिर खान, अनिल कपूर, रजनीकांत, रणबीर कपूर यांच्यासह दाक्षिणात्य ते बॉलिवूडपर्यंत अनेक स्टार्सनी या कार्यक्रमात विशेष हजेरी लावली. हे समिट आणखी 4 दिवस चालणार असून 4 मे रोजी त्याचा समारोप होईल. त्या चार दिवसांत आणखी अनेक मोठमोठ कलाकार, सेलिब्रिटी वेगवेगळ्या विषयांवर संवाद साधणार आहेत.